बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट (बार्टी), पुणे तर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एम.फिल व पीएच.डी करण्यासाठी संशोधनपर शिष्यवृत्ती दिली जाते. त्याकरता खाली नमूद केल्यानुसार पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या १०१ असून यापैकी ३०% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर ३% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार अनुसूचित जातींपैकी असावेत. त्यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ वा शिक्षण संस्थेतून पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनपर एम.फिल अथवा पीएच.डी करण्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीसाठी संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल.
वरील शिष्यवृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप स्वरूपात देण्यात येईल व त्याचे स्वरूप आणि रूपरेषा राजीव गांधी नॅशनल फेलोशिपच्या धर्तीवर असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, पुणेच्या https://barti.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्टर्ड टपालाने डायरेक्टर जनरल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, २८ क्वीन्स गार्डन, कँप, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१४.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2014 रोजी प्रकाशित
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट (बार्टी), पुणे तर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एम.फिल व पीएच.डी करण्यासाठी संशोधनपर शिष्यवृत्ती दिली जाते.

First published on: 28-07-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special scholarships for sc students