कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीजीएल २०२० टियर- एकचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासण्यासाठीच्या स्टेप्स आहेत.

सीजीएल टियर- एक परीक्षा कर्मचारी निवड आयोगाने अनेक शिफ्टमध्ये आयोजित केली होती. ज्यामध्ये लाखो उमेदवारांनी हजेरी लावली होती. आता टियर-एक परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना टियर-दोन परीक्षेसाठी बोलावले जाईल. त्याचवेळी टियर-दोन मध्ये यशस्वी झालेल्यांना टियर-दोन परीक्षेसाठी बोलावले जाईल.

‘असा’ तपासा निकाल

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

आपले वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

निकाल तुमच्या समोर असेल.

निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे पुढील प्रक्रीयेसाठी ठेवा.