प्रस्तुत लेखामध्ये ‘मानवी भूगोल’ या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आíथक भूगोल या घटकांची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी याची  माहिती करून घेऊयात. अभ्यासक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे, म्हणून ‘मानवी भूगोल’ विषयाची तयारी करताना जगाचा मानवी भूगोल आणि भारताचा मानवी भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकांची माहिती असणे महत्त्वाचे असते. गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणावरून सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर विचारण्यात आलेले आहेत याची माहिती मिळते. पहिल्या लेखामध्ये मानवी भूगोलामध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकांचा तसेच या घटकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो, याची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेखामध्ये या घटकांचे परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन कशा प्रकारे करावे याचबरोबर या घटकावर गेल्या तीन मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०१५) कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करून चर्चा करणार आहोत.

सर्वप्रथम उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, यातील बहुतांश प्रश्न हे भारताच्या आíथक भूगोलशी संबंधित आहेत तसेच यातील काही प्रश्न भारत व जगाचा मानवी भूगोल यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी मानवी भूगोल या घटकाचा सर्वप्रथम परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करावा लागतो.

वरील प्रश्नांचे अधिक बारकाईने निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की, यातील काही प्रश्न विचारताना

या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. या विषयावरील प्रश्न हे मुखत्वे उपलब्ध नसíगक साधनसंपत्ती व त्याचे वितरण, शहरीकरण व पर्यटन इत्यादी मुद्दय़ांना अनुसरून आहे.

या घटकावरील प्रश्न विचारण्याचा कल हा चालू घडामोडींशी अधिक संबंधित आहे. तसेच या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी आघाडीचे इंग्रजी वर्तमानपत्र उदा. द िहदू आणि योजना, कुरुक्षेत्र यांसारख्या मासिकांचा अभ्यास करावा.

हा विषय परीक्षेच्या दृष्टीने तयार करताना या विषयाची सरळ व सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या संदर्भग्रंथांची योग्य निवड करावी लागते. त्यातल्या त्यात विशेषकरून भारताचा मानवी भूगोल हा अधिक सखोल व र्सवकष पद्धतीने अभ्यासावा लागतो, पण याचबरोबर जगाच्या मानवी भूगोलाचेही मूलभूत ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते. या विषयाच्या सर्व घटकांची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी, ज्यासाठी आपल्याला ‘एनसीईआरटी’च्या फंडामेंटल्स ऑफ ह्य़ुमन जिओग्राफी (बारावी), इंडियन पीपल अ‍ॅण्ड इकोनॉमी (बारावी) या  क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो. ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकते. ही माहिती अधिक विस्तारण्यासाठी- सर्टिफिकेट फिजिकल अ‍ॅण्ड ह्य़ुमन जिओग्राफी   (by Goe Cheng Leong), इंडिया- कॉम्प्रिहेन्सिव्ह जिओग्राफी (डी. आर. खुल्लार), वर्ल्ड जिओग्राफी (माजिद हुसेन)   यांसारख्या  संदर्भग्रंथांचा आधार घेता येऊ शकतो.

या संदर्भग्रंथांतून ‘मानवी भूगोल’ या विषयाचे पारंपरिक स्वरूप, यातील अंतर्भूत संकल्पना, या घटकाची महत्त्वाची वैशिष्टय़े इत्यादीचा मूलभूत पद्धतीने अभ्यास सर्वप्रथम करून घ्यावा. याचबरोबर गतवर्षीच्या प्रश्नांचा अभ्यास करून या विषयाची परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने विभागणी सर्वप्रथम करावी. महत्त्वाच्या मुद्दय़ाच्या स्वत:च्या भाषेत संक्षिप्त पद्धतीने नोट्स तयार कराव्यात, ज्यामुळे कमी वेळात या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य पद्धतीने उजळणी करता येईल.

थोडक्यात ‘मानवी भूगोल’ या विषयाच्या मूलभूत ज्ञानाची परिभाषा अधिक मुद्देसूदपणे समजून घेऊन तयारी करणे अपेक्षित आहे.

मानवी भूगोलया घटकावर २०१३ मध्ये तीन, २०१४ मध्ये पाच आणि २०१५ मध्ये सहा प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील बहुतांश प्रश्न हे आíथक भूगोल या घटकाशी संबंधित होते. यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा आपण घेऊ.

२०१३ मुख्य परीक्षा

  • भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठीच्या घटकांचे विश्लेषण करा.
  • दक्षिण भारतातील राज्यांमध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा.
  • जीवाश्म इंधनाच्या वाढत्या तुटवडय़ाच्या कारणामुळे, भारतामध्ये आण्विक ऊर्जेचे महत्त्व अधिकाधिक वाढत आहे.
  • भारतामध्ये आणि जगामध्ये आण्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेची चर्चा करा.

२०१४ मुख्य परीक्षा

  • पूर्व भारतामध्ये सुपीक जमीन आणि चांगल्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असूनही भारतातील हरितक्रांती या भागाला सोडून पुढे गेली, याचे कारण काय आहे?
  • नसíगक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेमधील आíथक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो?
  • जगामधील लोखंड आणि पोलाद उद्योगामधील स्थानिक प्रारूपातील बदलांचे स्पष्टीकरण द्या.

२०१५ मुख्य परीक्षा

  • आíक्टक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आíथक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात?
  • मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीमधील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे?
  • भारतातील स्मार्ट शहरे स्मार्ट खेडय़ांशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत. या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा.
  • जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये पर्यटनामुळे पर्यावरणीय वहनक्षमतेच्या मर्यादेच्या सीमांपर्यंत येऊन पोहोचली आहेत, याचे समीक्षात्मक मूल्यमापन करा.