AIIMS recruitment 2024 : ‘एम्स’ म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये सध्या नर्सिंग अधिकारी या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवाराने अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते जाणून घ्या. तसेच अर्जाची अंतिम तारीख आणि शैक्षणिक पात्रतादेखील समजून घ्या.

AIIMS recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

नर्सिंग अधिकारी इच्छुक उमेदवाराकडे

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

अ. बीएस्सी नर्सिंग ऑनर्स हे शिक्षण असणे आवश्यक आहे. अथवा बीएस्सी भारतीय नर्सिंग कौन्सिल / स्टेट नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाकडून मिळालेले नर्सिंगचे पोस्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

बी. राज्य / भारतीय नर्सिंग कौन्सिलमध्ये परिचारिका आणि मिडवाइफ म्हणून नोंदणी असणे आवश्यक.

हेही वाचा : मी कुठल्या क्षेत्रात नोकरी शोधू, असा प्रश्न पडलाय? मग २०२४ मधील नोकरीचे उत्तम पर्याय पाहा

AIIMS recruitment 2024 – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अधिकृत वेबसाइट –
https://www.aiimsexams.ac.in/index.html

AIIMS recruitment 2024 – अधिसूचना –
https://docs.aiimsexams.ac.in/sites/Norcet-6/1_Advertisement%20NORCET%20-6%20Ver%203.0.pdf

AIIMS recruitment 2024 – ऑनलाइन अर्जाची लिंक
https://norcet6.aiimsexams.ac.in/

AIIMS recruitment 2024 : वेतन

नर्सिंग अधिकारी पदासाठी उमेदवारास ९,३०० – ३४,८०० + ४,६००/- रुपये ग्रेड वेतन [स्तर सातवा] दिले जाईल.

AIIMS recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे करावा?

नर्सिंग अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करताना भरावे लागणारे शुल्क पुढीलप्रमाणे –
१. सामान्य/ओबीसी उमेदवार – ३,०००/- रुपये
२. एस्सी/एसटी/ईडब्ल्यूएस उमेदवार – SC/ST उमेदवार/EWS – २,४००/- रुपये
३. अपंग व्यक्तींसाठी कोणतेही शुल्क नाही.
प्रत्येक उमेदवारास वरील अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असेल.

अर्ज भरताना त्यामध्ये योग्य माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
इच्छुक उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेआधी भरावा.
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२४ अशी आहे.
अर्ज करण्याआधी उमेदवाराने नोकरीसंबंधीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

नर्सिंग अधिकारी या पदासंबंधी इच्छुक उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या [AIIMS] अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना, तसेच अर्ज करण्यासाठी लिंक वर नमूद केलेली आहे.