● इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ( IOCL) (रिफायनरिज डिव्हीजन – गुजरात, मथुरा, हल्दिया, पानिपत, गुवाहाटी, बरौनी, दिग्बोई, बोंगायगाव, पॅरादिप) मध्ये ट्रेड अॅप्रेंटिसेसची भरती.

एकूण रिक्त पदे – १,७७०.

(१) ट्रेड अॅप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) केमिकल (कोड – १०१) एकूण ४२१ पदे (गुजरात – ५८).

(२) ट्रेड अॅप्रेंटिस – बॉयलर (मेकॅनिकल) (कोड – १०३) एकूण ७६ पदे (गुजरात – ९).

पद क्र. १ व २ साठी पात्रता – (दि. ३१ मे २०२५ रोजी) इ. रू. (फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (किमान सरासरी ५० टक्के गुण (अजा/अज – ४५ टक्के गुण)).

(३) ट्रेड अॅप्रेंटिस – (फिटर) मेकॅनिकल (कोड – १०२) एकूण २०८ पदे (गुजरात – ४२). पात्रता – आय्टीआय फिटर कोर्स.

(४) टेक्निशियन अॅप्रेंटिस – केमिकल (कोड – १०४) एकूण ३५६ पदे (गुजरात – ५८).

(५) टेक्निशियन अॅप्रेंटिस – मेकॅनिकल (कोड – १०५) एकूण १६९ पदे (गुजरात – ३९).

(६) टेक्निशियन अॅप्रेंटिस – इलेक्ट्रिकल (कोड – १०६) एकूण २४ पदे (गुजरात – ४९).

(७) टेक्निशियन अॅप्रेंटिस – इन्स्ट्रूमेंटेशन (कोड – १०७) एकूण १०८ पदे (गुजरात – २५).

पद क्र. ४ ते ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनिअरींग डिप्लोमा (किमान सरासरी ५० टक्के गुण (अजा/अज – ४५ टक्के गुण)).

(८) ट्रेड अॅप्रेंटिस – अकाऊंटंट (कोड – १०९) एकूण ३८ पदे (गुजरात – ७).

पात्रता – B. Com. (किमान सरासरी ५० टक्के गुण (अजा/अज – ४५ टक्के गुण)).

(९) ट्रेड अॅप्रेंटिस – सेक्रेटरियल असिस्टंट (कोड – १०८) एकूण ६९ पदे (गुजरात – ११).

पात्रता – B. A./ B. Sc./ B. Com. (किमान सरासरी ५० टक्के गुण (अजा/अज – ४५ टक्के गुण)).

(१०) ट्रेड अॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (फ्रेशर अॅप्रेंटिस) (कोड – ११०) एकूण ५३ पदे (गुजरात – ८).

(११) ट्रेड अॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर) (कोड – १११) एकूण ३२ पदे (गुजरात – ७).

पद क्र. १० व ११ साठी पात्रता – १२ वी उत्तीर्ण (किमान सरासरी ५० टक्के गुण (अजा/अज – ४५ टक्के गुण)).

पद क्र. ३ व ५ ते ११ साठी दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी – पद क्र. १, ३ ते ८, १० व ११ साठी १२ महिने. पद क्र. २ साठी २४ महिने; पद क्र. ९ साठी १५ महिने. उमेदवारांना दरमहा नियमानुसार स्टायपेंड दिले जाईल.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी (दि. ३१ मे २०२५ रोजी) १८२४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

ऑनलाइन अर्ज www. iocl. com/ www. iocrefrecruit. in या संकेतस्थळावर दि. २ जून २०२५ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com