scorecardresearch

Premium

ओळख शिक्षण धोरणाची: मुक्त आणि दूरस्थ शिक्षणपद्धती

नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने एकूण अभ्यासक्रमांच्या चाळीस टक्क्यांपर्यंत अध्यापन हे दूरस्थ पद्धतीने म्हणजे ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता, अशी सूचना केली आहे

Open Education and Distance Education
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

प्रा. रवींद्र कुलकर्णी

दर शुक्रवारी जमतात तसे सर्व प्राध्यापक एकत्र जमले. सर्वाच्या मनात आज रमेश कोणता विषय मांडणार याची उत्सुकता होती. सर म्हणाले, ‘‘आज आपण मुक्त आणि दूरस्थ पद्धतीच्या शिक्षणाबद्दल बोलू या. नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने एकूण अभ्यासक्रमांच्या चाळीस टक्क्यांपर्यंत अध्यापन हे दूरस्थ पद्धतीने म्हणजे ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता, अशी सूचना केली आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना, याचा वापर करता येणे शक्य आहे.’’ सर पुढे सांगू लागले, ‘‘मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धती (Open and Distant Education-  ODL – ODL) विविध माध्यमांचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थी हे एकमेकांत असलेल्या अंतराच्या अडचणीवर मात करत, लवचिक शिक्षणाच्या संधी प्रदान करते, यामध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाइन आणि अधूनमधून शिकणाऱ्यांशी संवाद साधण्याचा किंवा विद्यार्थी साहाय्यक सुविधांतर्गत अध्यापक-विद्यार्थ्यांनी, समोरासमोर बसून केलेल्या चर्चाचा- बैठकांचा समावेश आहे. ऑनलाइन पद्धतीने ते सहजशक्य होतं. कोविड काळात आपण सर्वानी याचा अनुभव घेतला आहे. यावेळी अध्यापक व विद्यार्थी हे एकमेकांशी चर्चा करताना परस्परांचे व्यावहारिक किंवा कामाच्या अनुभवांसह शिकण्याचे अनुभव शेअर करू शकतात. 

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

सर सांगत होते,  ODL मुळे आंतरमहाजाल (इंटरनेट), ई-लर्निग मटेरिअल्स, तंत्रज्ञान सहाय्य यंत्रणा आणि अन्य संसाधने वापरून इंटरनेटद्वारे बराचसा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना शिकवता येणे शक्य आहे, ही लवचिकता अध्ययन-अध्यापनात आल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होऊ शकते.  NEP 2020 च्या कलम १२.५ नुसार,  ODL आणि ऑनलाइन शिक्षण हे दर्जेदार उच्च शिक्षणात प्रवेश वाढवण्यासाठी एक नैसर्गिक मार्ग उपलब्ध करून देते. गुणवत्तेच्या स्पष्टपणे नमूद केलेल्या मानकांचे पालन सुनिश्चित करताना विद्यापीठे/HEI यांनी ठोस, पुराव्यावर आधारित प्रयत्नांद्वारे  ODL च्या संभाव्यतेचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे. आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की  ODL अभ्यासक्रम, हे सर्वत्र उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या, प्रत्यक्ष वर्गात शिक्षण देण्या-घेण्याइतकेच समतुल्य आहेत. त्यामध्ये कोणतेही अंतर नाही, वा त्यात दर्जाचा फरक नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाचा नियम ( ODL अभ्यासक्रम आणि ऑनलाइन शिक्षण) २०२० नुसार  ODL अध्ययन-अध्यापन पद्धतीनुसार आणि ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतल्यावर; पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अध्ययनानंतर मिळाणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर पदविका ((Post Graduate Diploma) प्रदान करण्यासाठी काही निर्देशांची किमान मानके निश्चित केली आहेत.’’

रमेश सरांनी स्वयम् पोर्टलसंबंधी माहिती द्यायला प्रारंभ केला, ‘‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या  UGC ( SWAYAM द्वारे ऑनलाइन पद्धतीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी श्रेयांकांचे फ्रेमवर्क) नियम, २०२१ च्या अनुसार एका सत्रात,  एका विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या एकूण अभ्यासक्रमांपैकी ४० टक्क्यांपर्यंत हे  SWAYAM (Study Webs of Active- Learning for Yound Aspiring Minds) द्वारे देऊ केलेल्या ऑनलाइन पद्धतीचे अभ्यासक्रम असू शकतात.’’

चर्चा गटात नव्यानेच सामील झालेल्या महेश सरांनी विचारले, ‘‘सर,  SWAYAM वर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांवद्दल थोडी माहिती द्याल का?’’ रमेश सर म्हणाले, ‘‘जरूर सांगतो. मंडळी,  SWAYAM वर असलेले अभ्यासक्रम चार गटांत उपलब्ध आहेत:

१. ई-टय़ूटोरियल ज्यामध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ सामग्री एका संघटित स्वरूपात, अ‍ॅनिमेशन, सिम्युलेशन, आभासी प्रयोगशाळा;

२. ई-पुस्तके किंवा शब्दकोष, केस स्टडी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ), लिखित रूपातील दृक् श्राव्य व्याख्याने (Transcriptions of video lectures) आणि डाउनलोड किंवा मुद्रित केले जाऊ शकणारे इतर कोणतेही खास तयार केलेले वाचन किंवा अभ्यास साहित्य असलेली ई-सामग्री;

३. अभ्यासक्रमांचे संयोजक आणि इतर सहभागी विद्यार्थी वा तज्ज्ञ यांच्यातील चर्चासाठी, शंकानिरसनासाठी तयार केले गेलेले चर्चा मंच

४. बहुपर्यायी प्रश्न, समस्या, प्रश्नमंजुषा, अभिहस्तांकने (वर्गात दिलेल्या assignment) आणि त्यांची निराकरणे असलेली स्व-मूल्यांकन प्रक्रिया

‘‘मित्रांनो, SWAYAM वर आधारित ऑनलाइन अभ्यासक्रमांचे श्रेयांकांचे वेळापत्रक हे पारंपरिक शैक्षणिक सत्रांसोबत संरेखित (जोडले) केले जाईल. विद्यापीठाची विद्या परिषद (Academic Council) ही विद्यार्थ्यांने त्यांच्या पालक संस्थेत मिळवलेल्या श्रेयांकाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवील. विद्यापीठांची विद्या परिषद ही संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांना SWAYAM प्लॅटफॉर्मवरील ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या श्रेयांकांच्या हस्तांतरणासाठी, संबंधित विषयांच्या विभागप्रमुख आणि अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार मान्यता देऊ शकते. मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास, गुवाहाटी आणि रुरकी येथील सात भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी
(IIT) एकत्र येऊन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निग (NPTEL) द्वारे अभियांत्रिकी आणि भौतिक विज्ञानांच्या सर्व प्रमुख शाखांमध्ये अत्यंत दर्जेदार असे अध्ययनाचे मुक्त ऑनलाइन अभ्यासक्रम (MOOC-  Massive Open Online Courses) उपलब्ध करून दिले आहेत. हे अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर अभियांत्रिकी व भौतिक विज्ञानाचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि  IIT मधून  PG स्तरावरील व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत.’’

‘‘आता उशीर होतोय,’’ असं म्हणून रमेश सर थांबले व म्हणाले, ‘‘पुढच्या वेळेस आपण MOOC च्या मूल्यमापन पद्धतीविषयी आणि त्याच्या प्रमाणपत्रांविषयी अधिक बोलू या.’’ अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 05:58 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×