विक्रांत भोसले

विद्यार्थी मित्रहोआज आपण सामाजिक मानसशास्त्र या विषयातील वृत्ती या घटकावर केंद्रीय नागरी सेवा आयोगाच्या (UPSC) नितीशास्त्राच्या ( Ethics) पेपरमध्ये कसे प्रश्न येतात आणि त्यासाठी काय तयारी करावे लागते, याची चर्चा करणार आहोत.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Sanjay raut on narendra modi
“मोदींना एकदा लहर आली आणि…”, मोदींच्या १० वर्षांतील कार्यकाळावरून ठाकरे गटाची टीका
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

सामाजिक मानसशास्त्र हा विषय एक व्यापक विषय आहे. यामध्ये अनेक घटक विषयांचा समावेश असतो. परंतु यातील फक्त दोनच विषयांचा समावेश आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. ते म्हणजे वृत्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयातील मुख्य संकल्पनांचे आकलन असणे आणि त्यांचे चालू घडामोडींच्या संदर्भात ज्ञान असणे आणि त्यांचे उपयोजन माहिती असणे अपेक्षित असते. वृत्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता या घटकांच्या तयारीची सुरुवात ही NCERT च्या ११ वी आणि १२ वी च्या मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांपासून करणे कधीही उपयुक्त राहते. मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या ११ वी आणि १२ वी च्या मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांपासून तयारीची सुरुवात करावी. यातून संकल्पना स्पष्ट होतात आणि सुसंगत उदाहरणे कशी द्यायची याचीही समज येते.

या घटक विषयांवर दरवर्षी आलटून पालटून प्रश्न येतात. २०२३ च्या मुख्य परीक्षेमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व विचारणारा प्रश्न आला होता. तर २०२२ मध्ये वृत्ती या घटकावर प्रश्न आला होता. आज आपण या प्रश्नाची चर्चा करणार आहोत.

हेही वाचा >>> माझीस्पर्धा परीक्षा : प्रत्येकाने स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक

Q. The Rules and Regulations provided to all civil servants are same, yet there is a difference in performance. Positive minded officers are able to interpret the Rules and Regulations in favour of the case and achieve success, whereas negative minded officers are unable to achieve goals by interpreting the same Rules and Regulations against the case. Discuss with illustrations. (150 words, 10 marks)

प्र. नागरी सेवकांना दिलेले नियम जरी सारखे असले तरी त्यांच्या कामगिरीमध्ये फरक असतो. सकारात्मक वृत्ती असणारे अधिकारी केसच्या बाजूने नियमांचा अर्थ लावतात आणि यश मिळवतात. तर नकारात्मक वृत्ती असणारे अधिकारी केसच्या विरुद्ध जाणारा नियमांचा अर्थ लावतात आणि उद्दिष्ट साध्य करू शकत नाहीत. स्पष्टीकरण देऊन चर्चा करा. (१५० शब्द, १० गुण)

(उत्तरासाठीची सूचना – या प्रश्नाचे अचूक आणि समर्पक उत्तर लिहिण्यासाठी वृत्तीचा व्यक्तीच्या वर्तनावर नेमका कसा प्रभाव पडतो याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी वृत्तीची कार्ये माहिती असणे आवश्यक आहे. वृत्तीच्या अनेक कार्यांपैकी एक कार्य आहे – तीव्र वृत्तींचे ठोस वर्तनात रुपांतर करणे. म्हणजे जेव्हा वृत्ती तीव्र होतात तेव्हा व्यक्तीचे वर्तन त्यानुसार व्हायला लागते. अशा वर्तनाद्वारे व्यक्ती स्वत:च्या मूल्यांना व्यक्त करत असते. आणि यामुळे जरी परिस्थिती सारखी असली तरीही व्यक्तीपरत्वे मूल्ये वेगळी असल्यामुळे त्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद सारखा असत नाही. हीच बाब विद्यार्थ्यांना वर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना अधोरेखित करावी लागते. आणि या युक्तिवादाचे समर्थन देताना संयुक्तिक उदाहरणे देणे आवश्यक ठरते.)

उत्तर – सर्वच नागरी सेवक एकाच हेतूने नागरी सेवांमध्ये प्रवेश करत नाहीत. बऱ्याचदा प्रवेश परीक्षांदरम्यान त्यांची मूल्ये तपासण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरेलच असे नाही. प्रशिक्षणाद्वारे देखील त्यांना सकारात्मक वृत्ती कशी ठेवावी याचे धडे दिले जातात. परंतु जेव्हा खरेखुरे काम करण्याची वेळ येते तेव्हा सर्वजण सकारात्मक वृत्तीने आपल्या कामाकडे पाहतीलच असे नाही.

हेही वाचा >>> महाविद्यालयांसाठी मोठी बातमी, नॅक मूल्यांकनातून आता श्रेणी पद्धत हद्दपार

प्रत्येक नागरी सेवकाची मूलभूत मूल्यव्यवस्था त्यांना एखाद्या घटनेकडे वा नियमांकडे कसे बघावे आणि कसा प्रतिसाद द्यावा यासाठी प्रेरित करत असते. उदाहरणार्थ एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काही नागरीसेवक ही एक शिकण्याची संधी आहे असे मानून धैर्याने सामोरे जातील आणि प्रयत्न करतील तर काहीजण व्यवस्थेतील कमतरता शोधून तिला दोष देत बसतील आणि प्रयत्न करणार नाहीत. या वर्तनातील फरकाच्या मुळाशी मूल्यांतील फरक आणि त्यामुळे आकार घेणाऱ्या वृत्तीतील फरक दिसून येतो.

उदाहरणार्थ महिलांना सूर्यास्त झाल्यानंतर अटक करता येत नाही. फक्त अपवादात्मक स्थितीमध्ये ते ही न्यायदंडाधिकाऱ्याकडून परवानगी घेऊन महिला अधिकारी अटक करू शकतात. एखादा पोलीस अधिकारी या नियमामुळे टाळाटाळ करून अटक करणे पुढे ढकलू शकतो. पण एखादा पोलीस अधिकारी योग्य ती पाऊले उचलून, परवानगी मिळवून आणि महिला अधिकारी उपस्थित नसतील तर दुसऱ्या महिला अधिकाऱ्याची मदत घेऊन तो हेच कार्य पूर्ण करून घेऊ शकतो.

नकारात्मक वृत्ती ही सकारात्मक वृत्तीमध्ये बदलण्यासाठी वर्तनाद्वारे वृत्ती बदलण्याच्या योग्य तंत्रांचा वापर करणे सयुक्तिक ठरते. जसे की भूमिका वठवल्याने होणारे बदल, पुनरुच्चाराचे सामर्थ्य, छोट्या कृतीतून होणारे मोठे बदल. तसेच अशा अधिकाऱ्यांच्या कामाचे नैतिक आदर्श असणाऱ्या वरिष्ठांकडून मूल्यमापन करण्यात यावे आणि त्यांना मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था करावी. यातून मूल्यांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण होते आणि वृत्तीही बदलू शकते. या पुढील लेखामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्ता या घटकावरील प्रश्नांची चर्चा करणार आहोत.