विक्रांत भोसले

विद्यार्थी मित्रहोआज आपण मागच्या लेखामध्ये चर्चा केलेल्या प्रकरण अभ्यासावरील (केस स्टडीज) प्रश्नाचे नमुना उत्तर कसे असावे, हे पाहणार आहोत. या सर्व चर्चेचा फायदा विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रश्नांच्या तयारीसाठी करून घ्यावा हा या लेखमालेचा हेतू आहे.

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?
Loksatta kutuhal The power of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचं सामर्थ्य

प्र. तुम्ही राष्ट्रीयीकृत बँकेत अनेक वर्षे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहात. एके दिवशी तुमची जवळची एक सहकारी तुम्हाला सांगते की तिचे वडील हृदयविकाराने त्रस्त आहेत आणि त्यांना शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. ती तुम्हाला सांगते की, तिच्याकडे कोणताही विमा नाही आणि ऑपरेशनसाठी सुमारे १० लाख रुपये खर्च येऊ शकतो. तुम्हाला याची कल्पना आहे की, तिच्या पतीचे यापूर्वी निधन झालेले आहे, शिवाय ती कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. तिच्या परिस्थितीबद्दल तुम्ही सहानुभूती दर्शवता. परंतु, सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे तुमच्याजवळ तिला आर्थिक मदत देण्यासाठी संसाधने नाहीत.

हेही वाचा >>> UPSC च्या नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील अधिसूचना जारी; रिक्त जागा, पात्रतेसह जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

काही आठवड्यांनंतर, तुम्ही तिच्याकडे तिच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल विचारणा करता. तेव्हा ती तुम्हाला त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल आणि ते बरे होत असल्याची माहिती देते. ती तुम्हाला गोपनीयपणे सांगते की, बँक मॅनेजरने गोपनीयता बाळगण्याच्या व लवकरतात लवकर पैसे परत करण्याच्या अटीवर ऑपरेशनसाठी मदत व्हावी म्हणून बँकेतील एका निष्क्रिय खात्यातून १० लाख रूपये उपलब्ध करून दिले आहेत. तिने ते रुपये परत करणे सुरू केले आहे, तसेच ती सर्व रक्कम हळूहळू जमा करत राहिल.

(अ) यात कोणत्या नैतिक समस्या समाविष्ट आहेत?

(ब) नैतिक दृष्टिकोनातून बँक व्यवस्थापकाच्या व्यवहाराचे मूल्यमापन करा.

(क) या परिस्थितीवर तुमची काय प्रतिक्रिया असेल? २०२३ (२० गुण /२५० शब्द)

उत्तर –

● व्यापक मुद्दा – बँकेच्या व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि बँक व्यवस्थापकाच्या कृती आणि निर्णयांवर नजर ठेवणाऱ्या यंत्रणेचा अभाव असणे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजू कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी उपयोगी पडणाऱ्या सामूहिक संसाधनांची कमतरता असणे.

● नैतिक द्विधा – एकीकडे संस्थेच्या नियमांशी बांधलकी ठेवून सचोटीने काम करणे तर दुसरीकडे अडचणीत असलेल्या सहकार्याच्या विरुद्ध तक्रार करणे.

● विविध नैतिक समस्या –

१. बँक व्यवस्थापकाचा नियमबाह्य आणि मनमानी कारभार.

२. स्वहितासाठी इतरांच्या निधीचा त्यांची परवानगी न घेता केलेला वापर.

३. बँकेच्या आणि विशेषत: बँक व्यवस्थापकाच्या कारभारातील अपारदर्शकता.

४. बँक कर्मचाऱ्याच्या घरगुती अडचणीमुळे आणि कोणताही इतर व्यवस्थात्मक पाठिंबा नसल्यामुळे निर्माण झालेली असहायता.

● नैतिक दृष्टिकोनातून बँक व्यवस्थापकाच्या व्यवहाराचे मूल्यमापन

१. बँक व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याला मदत करण्याचा घेतलेला निर्णय जरी वरकरणी चांगल्या हेतूने घेतलेला असला तरी त्याचे दूरगामी परिणाम नकारात्मक होऊ शकतात. यामुळे चुकीची कार्य संस्कृती निर्माण होऊ शकते वा चुकीचा पायंडा पडू शकतो. हे सर्व उघडकीस आल्यावर ग्राहकांचा संस्थेवरचा विश्वास उडू शकतो. यामुळे भविष्यात बँकेच्या कारभारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. येथे साध्य आणि साधन यांचा संघर्ष दिसून येतो आहे. साध्य जरी चांगले असले तरी साधन अयोग्य असून चालणार नाही.

२. निष्क्रिय खातेधारकाच्या पैशांचा परस्पर वापर केल्यामुळे त्या खातेधारकाचा विचार केलेला दिसून येत नाही. त्याचा केवळ साधन म्हणून विचार केलेला दिसून येतो. मग कोणतीही विवेकी व्यक्ती अशा बँक व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवून पैसे संचित करणार नाही.

३. तसेच नियमबाह्य वर्तन करून कोणत्याही सद्गुणांची निर्मिती होत नाही. पण यातून चुकीच्या सवयी लागू शकतात आणि भविष्यात ते बँकेसाठी घातक ठरू शकते.

म्हणून हे जरी खरे असले की त्या बँक कर्मचाऱ्याला पैशाच्या मदतीची गरज आहे तरी ती मदत करण्याचा निवडलेला मार्ग योग्य वा नैतिक नाही.

● माझी प्रतिक्रिया – बँक व्यवस्थापक आणि गरजू कर्मचारी या दोघांना एकत्रितरित्या त्यांनी केलेल्या अनैतिक व्यवहाराबद्दल समज देणे. तसेच कर्मचाऱ्याला कर्ज घेऊन ते पैसे निष्क्रिय खात्यात ताबडतोब टाकण्याचा सल्ला देणे. हे न झाल्यास वरिष्ठांकडे रीतसर तक्रार केली जाईल याबद्दल कल्पना देणे. या सर्वांमुळे बँकेच्या नियमांचे फार काळ उलंघन होणार नाही तसेच गरजू कर्मचाऱ्याला मदत पण होईल अशी तरतूद करता येईल.

विद्यार्थी मित्रहो, आज आपण नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता या पेपरची तयारी आणि प्रश्नांची उत्तरे याबद्दलच्या लेखमालेची सांगता करत आहोत. या विषयाची तयारी ही जर अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन असेल तर साधारणपणे २ ते ३ महिन्यांमध्ये दररोज ३ ते ४ तास अभ्यास करून करता येते. परंतु त्यासाठी सातत्य आणि अभ्यासाप्रती वचनबद्धता ( commitment) असायला हवी. या सर्व तयारीचा उद्देश हा फक्त परीक्षा पास होणे हा नसून स्वत:च्या मूल्यव्यवस्थेमध्ये, वृत्तींमध्ये आणि एकंदरीतच चारित्र्यामधे सुयोग्य बदल घडवणे आणि ते नागरीसेवेसाठी पूरक राहील याची काळजी घेणे हा असायला हवा. अयोग्य मूल्यव्यवस्था घेऊन जर कोणी नागरी सेवेमध्ये जात असेल तर ती व्यक्ती समाजाची आणि स्वत:ची देखील फसवणूक करत आहे. कारण महात्मा गांधी म्हणतात तसे ‘‘ Deceivers ultimately deceive themselves.’’ म्हणजेच इतरांची फसवणूक करणारे शेवटी स्वत:लाच फसवत असतात.

यापुढील लेख हे निबंध या विषयाबद्दल असतील याची नोंद घ्यावी.

तुम्हा सर्वांना या विषयाच्या तयारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!