UPSC Prelims 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) १४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा पूर्वपरीक्षेसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार प्रशासकीय सेवेतील १०५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट ( upsc.gov.in ) वर जाऊन अधिसूचना तपासू शकतात. दरम्यान upscinline.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना नागरी सेवांमध्ये सहभागी व्हायचे आहे, ते ५ मार्च २०२४ पूर्वी अर्ज करू शकतात.

दरम्यान, यूपीएससी पूर्वपरीक्षा २६ मे २०२४ रोजी होणार आहे; पण उमेदवार ६ मार्च ते १२ मार्चदरम्यान अर्जामध्ये सुधारणा करू शकता. यावेळीही यूपीएससी परीक्षा केंद्रासाठी फर्स्ट एप्लॉई फर्स्ट अलॉट पॉलिसी लागू करण्यात आली आहे. त्याचा अर्थ तुम्ही जितक्या लवकर अर्ज कराल तितके तुम्हाला तुमच्या इच्छित शहरात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण, यावेळीदेखील अर्ज मागे घेण्याचा पर्याय नसेल. तुम्ही एकदा अर्ज केल्यानंतर फॉर्म मागे घेऊ शकणार नाही. तसेच अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

Election Commissions eye on the content of Paid News and Social Media here is Regulations
सावधान! ‘पेडन्यूज’ व ‘सोशल मीडिया’वरील मजकुरावर आयोगाची नजर, जाणून घ्या नियमावली
maharashtra police bharti 2024 recruitment application deadline extended till 15th april for 17311 post in all Over maharashtra
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
Civil Services Exam
UPSC Prelims 2024 : यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलली, आयोगाने दिलं ‘हे’ कारण…

UPSC CSE अधिसूचनेनुसार उमेदवाराला अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) करावे लागेल. त्यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे फार महत्त्वाचे आहे.

या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा ( IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS)सह इतर अखिल भारतीय सेवांसाठी अधिकारी निवडले जातील. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिसूचनेनुसार २० सप्टेंबर रोजी मुख्य परीक्षा होणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेली अधिकृत अधिसूचना

UPSC 2024 परीक्षेसाठी अर्ज कसा कराल?

१) अर्ज करण्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या.
२) आता होमपेजवर जा आणि UPSC CSE Application 2024 लिंकवर क्लिक करा.
३) आता क्रेडेन्शियल भरून लॉग इन करा.
४) लॉग इन केल्यानंतर अर्जावर क्लिक करा.
५) उमेदवारांनी सर्व माहिती नीट भरावी.
६) त्यानंतर उमेदवाराने आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत.
७) त्यानंतर उमेदवाराने अर्ज शुल्क भरावे.
८) आता सर्व अर्ज नीट वाचून सबमिट करा.
९) त्यानंतर उमेदवारांनी भरलेला अर्ज डाउनलोड करावा.
१०) शेवटी उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट घ्यावी.

वयोमर्यादा

कट ऑफ तारखेनुसार उमेदवाराचे किमान वय २१ ते ३२ वर्षांदरम्यान असावे. त्याच वेळी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यातून सवलत देण्यात आली आहे. अधिक तपशिलासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

उमेदवारांच्या मदतीसाठी…

उमेदवाराला अर्ज किंवा कोणतेही मार्गदर्शन / माहिती / स्पष्टीकरण हवे असल्यास ते UPSC कॅम्पसच्या गेट ‘C’जवळील फॅसिलिटेशन काउंटर येथे वैयक्तिकरीत्या जाऊन माहिती घेऊ शकतात किंवा ते अधिक माहितीसाठी ०११-२३३८५२७१ / ०११-२३३८११२५ / ०११-२३०९८५४३ या क्रमांकांपैकी एका क्रमांकावर संपर्क साधू शकतात.