सुहास पाटील
बीईएमएल लिमिटेड (BEML Ltd) (भारत सरकारचा उपक्रम), बेंगळूरु (Advt.No.KP/ S//०६/२०२३ dt. २७.०९.२०२३). बीईएमएल लिमिटेड आपल्या देशभरात स्थित असलेल्या विविध मॅन्युफॅक्चिरग युनिट्स (म्हैसूर आणि बंगलोर) आणि मार्केटिंग डिव्हीजन्समध्ये ग्रुप-सी च्या एकूण ११९ पदांची भरती.
(१) डिप्लोमा ट्रेनी-मेकॅनिकल – ५२ पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २०).
(२) डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल – २७ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०).
(३) डिप्लोमा ट्रेनी-सिव्हील – ७ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ४).
पात्रता : (दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ३ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण).
(४) आयटीआय ट्रेनीज-मशिनिस्ट – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).
हेही वाचा >>> भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या २२४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु
(५) आयटीआय ट्रेनीज-टर्नर – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७)
पद क्र. ४ व ५ साठी पात्रता : संबंधित ट्रेडमधील फर्स्ट क्लाससह (६० टक्के) आयटीआय नॅशनल अॅप्रेंटिस सर्टिफिकेटसह उत्तीर्ण. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण)
(६) स्टाफ नर्स – १ पद (खुला). कामाचे ठिकाण – म्हैसूर, कर्नाटकमधील इएटछ चे मॅन्युफॅक्चिरग युनिट.
पात्रता : बी.एस्सी. (नर्सिग) किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा इन नर्सिग अॅण्ड मिडवायफरी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण)
कमाल वयोमर्यादा : (दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ५ साठी २९ वर्षे, पद क्र. ६ साठी ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे)
वेतन श्रेणी : डिप्लोमा ट्रेनीजसाठी (रु. २३,९१० – ८५,५७०); आयटीआय ट्रेनीजसाठी (रु. १६,९०० – ६०,६५०); स्टाफ नर्ससाठी (रु. १८,७८० – ६७,३९०).
डिप्लोमा ट्रेनिजना – १ वर्षांचे ट्रेनिंग आणि २ वर्ष कराराने काम करावे लागेल. ट्रेनिंग कालावधी दरमहा रु. १५,०००/- एकत्रित स्टायपेंड दिले जाईल. २ वर्षांच्या कराराच्या कालावधीत पहिल्या वर्षी दरमहा रु. १७,०००/- आणि दुसऱ्या वर्षी दरमहा रु. १९,५००/- स्टायपेंड दिले जाईल. यशस्वीरित्या ट्रेनिंग आणि कराराचा कालावधी पूर्ण केल्यावर आवश्यकता असल्यास त्यांना Wage Group Sr (वेतन श्रेणी रु. २३,९१० – ८५,५७०) वर कायम केले जाईल.
आयटीआय ट्रेनीज – २ वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान पहिल्या वर्षी रु. १४,०००/- आणि दुसऱ्या वर्षी रु. १५,०००/- दरमहा एकत्रित स्टायपेंड दिले जाईल. २ वर्षांच्या करार कालावधीमध्ये पहिल्या वर्षी रु. १६,५००/- आणि दुसरम्या वर्षी रु. १८,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग आणि कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास BEML च्या आवश्यकतेनुसार Wage Group B (वेतन श्रेणी रु. १६,९०० – ६०,६५०) वर कायम केले जाईल.
स्टाफ नर्स पहिले २ वर्ष कराराने काम करतील. पहिल्या वर्षी रु. १६,५००/- व दुसऱ्या वर्षी रु. १८,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास त्यांना आवश्यकतेनुसार Wage Group C (वेतन श्रेणी रु. १८,७८० – ६७,३९०) वर कायम केले जाईल.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : आठव्या पंचवार्षिक योजनेपूर्वी सुरू झालेली ‘स्वावलंबन योजना’ काय होती? ती का सुरू करण्यात आली?
निवड पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा ज्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी/ अॅप्टिटय़ूड, जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझिनग अॅबिलिटी, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज (बेसिक नॉलेज) आणि सब्जेक्ट/ ट्रेड टेस्ट) विषयांवर आधारित असतील.
लेखी परीक्षा मुंबई, दिल्ली, बेंगळूरु आणि कोलकत्ता केंद्रांवर घेतली जाईल.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रांसाठी आपला पसंतीक्रम अर्ज करताना देणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज http://www.bemlindia.in या संकेतस्थळावर दि. १८ ऑक्टोबर २०२३ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.
ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती, अर्जासोबत अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी BEML च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.suhassitaram@yahoo.com