● मला दहावीला ९१ टक्के आणि बारावीला ६५ टक्के गुण आहेत. मी आता बीए दुसऱ्या वर्षाला राज्यशास्त्र शिकत असून एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यास करत आहे. मी पहिल्या वर्षाला असताना शालेय अभ्यासक्रमाचे पूर्ण वाचन जवळपास तीन वेळा झाले. राज्यसेवेच्या बदलेल्या अभ्यासक्रमात मला माझ्या विषयात मराठीत पुस्तके उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पुस्तकांविषयी मार्गदर्शन करावे.- पल्लवी डवांगे

– दहावीच्या ९१ चे बारावीला ६५ का झाले याचे आत्मपरीक्षण प्रथम करावेस. या आत्मपरीक्षणातच तुझ्या यशाची सगळी बीजे दडलेली आहेत. मराठीत पुस्तके उपलब्ध नसतील तर इंग्रजी पुस्तके वाचून, समजावून घेऊन मराठीत नोट्स काढणे हा त्यावरचा एकमेव सोपा उपाय असतो. लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने राज्यशास्त्रीय विविध विश्लेषणे छापून येत आहेत,त्यावरील अग्रलेख येत आहेत. ते वाचलेस का? ते तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या बीएचा अभ्यास आणि ७५ टक्के गुण मिळवणे यावर लक्ष केंद्रित करावे.

● मी बीए पहिल्या वर्षात आहे. मी राज्य मंडळाच्या पुस्तकांतून नोट्स काढतोय व लोकसेवाच्या प्रश्नसंचातून प्रश्न सोडवत आहे. अजून कशा प्रकारे मी नोट्स काढू? बीएनंतर कोणत्या संधी उपलब्ध होतात?- जय जाधव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

— केवळ बीए पदवीनंतर चांगल्या संधी नसतात. आता बीएचा अभ्यास उत्तम करून पदव्युत्तर पदवी घेतली तर स्पर्धा परीक्षेत यशाची शक्यता निर्माण होईल. बीएच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष द्यावे त्याच वेळी रोज करिअर वृत्तांतचे वाचन करावे एवढेच सध्या पुरे. आजवरचे तुझे कोणत्याही परीक्षेतील गुण कळवले नसल्यामुळे हे मोघम उत्तर देत आहे.