scorecardresearch

पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी! सेंट्रल बॅंकेमध्ये ५००० जागांसाठी सुरु झालीये मेगा भरती; जाणून घ्या अर्ज करण्यासाठीचे निकष

Central Bank of India Recruitment 2023: सविस्तरपणे जाणून घ्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या मेगा भरतीबद्दल..

central bank of india recruitment 2023
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मेगा भरती २०२३ (फोटो – संग्रहित)

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. या भरतीमार्फत एकूण अपरेंटिसच्या (Apprentice) ५००० रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. २० मार्च २०२३ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ३ एप्रिल २०२३ हा अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. centralbankofindia.co.in. या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी असणे आवश्यक आहे. भरतीसाठी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असायला हवे. पात्रता व निकषाशी निगडीत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उमेदवार वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

किती पगार मिळणार?

ही भरती देश पातळीवर आयोजित केली जाणार आहे. व्यक्तीच्या निवड कोणत्या पदासाठी झाली आहे यावरुन त्याच्या वेतनासंबंधित निर्णय घेतले जातील. ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये नोकरी करणाऱ्यांना प्राथमिक १०,००० रुपये मासिक वेतन दिले जाईल. शहरी भागातील नोकरदारांना १५,००० रुपये पगार असेल. मेट्रो ब्रांचमधील लोकांना एका महिन्याला २०,००० रुपये पगार मिळेल.

आणखी वाचा – Rural Electrification Corporation Limited मध्ये होतेय भरती; ‘ही’ आहे या अर्ज करायची शेवटची तारीख

निवड प्रक्रियेची माहिती

अर्ज केल्यानंतर भरतीच्या प्रक्रियेला खऱ्या सुरुवात होईल. ही निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखत यांमध्ये विभागली आहे. भरतीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. पुढे परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची मुलाखती घेतल्या जातील. त्यातून त्यांची निवड केली जाईल.

आरक्षित वर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवार यांना भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्जासह ६०० रुपये भरावे लागतील. तर पीडब्लूबीडी उमेदवारांकडून यासाठी ४०० रुपये आकारले जातील. अन्य सर्व उमेदवारांना अर्ज करण्याकरिता ८०० रुपये प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागतील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:43 IST

संबंधित बातम्या