भारतीय गुप्तचर विभागासाठी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (SA/EXE) आणि मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS/GEN) या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवार mha.gov.in किंवा ncs.gov.in या दोन बेवसाईटवर उमेदवार आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ साठीची ऑनलाइन भरती प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू होणार असून ती १७ फेब्रुवारीला बंद होईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज शुल्क ५० तर भरती प्रक्रिया शुल्क ४५० रुपये आहे.

हेही वाचा- मायक्रोसॉफ्टनंतर IBM कंपनीला पण आर्थिक मंदीचा फटका, करणार ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांची कपात

इंटेलिजन्स ब्युरो भरतीसाठी जागा –

IB भरती २०२३ मध्ये सहाय्यक/कार्यकारी (SA/EXE) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/GEN) या पदांसाठीच्या १६७५ जागा भरण्यात येणार आहेत.

निवड प्रक्रिया –

इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ मधील २७७ पदांसाठीच्या उमेदवारांची अंतिम निवड दोन-स्तरीय परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये वैयक्तिक मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी असेल. तर सहाय्यक/कार्यकारी (SA/EXE) पदासाठी, उमेदवारांना स्पोकन अॅबिलिटी टेस्ट द्यावी लागणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ निवड प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी, उमेदवार mha.gov.in किंवा ncs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

हेही पाहा- आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हवेत उडणाऱ्या बाईकचा Video; म्हणाले, “जगभरातील पोलीस दलात…”

भरतीसाठी पात्रता –

IB भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक पात्रता – दहावी पर्यंतचं शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
  • MTS साठी वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे
  • SA/SXE साठी वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • अधिवास – उमेदवाराने अर्ज केलेल्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेच आहे.
  • प्रत्येक SIB विरुद्ध वरील सारणी ‘A’ मध्ये नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलींपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटीफिकेशन डाउनलोड करणयासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education intelligence bureau recruitment 2023 registration starts from 28th january check vacancy selection process jap
First published on: 26-01-2023 at 13:36 IST