सुहास पाटील
संशोधनात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ( IISER) (भारत सरकार, मानव संसाधन आणि विकास मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था) बेरहामपूर, भोपाळ, कोलकता, मोहाली, पुणे, तिरूअनंथपूरम, तिरूपती या ७ कॅम्पसमधील ‘ BS- MS दुहेरी पदवी प्रोग्रॅम २०२४’ आणि BS डिग्री प्रोग्राम (फक्त IISER, भोपाळ येथे) मधील प्रवेशासाठी IISER Aptitude Test ( IAT-२०२४) दि. ९ जून २०२४ रोजी घेणार आहे.
बॅचलर ऑफ सायन्स – मास्टर ऑफ सायन्स BS- MS ( Dual Degree) हा एक ५ वर्षं कालावधीचा दुहेरी पदवी शिक्षणक्रम आहे. (८ सेमिस्टर्स ज्यात लॅबोरेटरी, लेक्चर्स आणि प्रोजेक्ट्सचा समावेश असेल. त्यानंतर २ सेमिस्टर्स मध्ये मास्टर्स रिसर्च प्रोजेक्टचा समावेश असेल.) बायोलॉजी/ बायोलॉजिकल सायन्सेस, केमिस्ट्री/ केमिकल सायन्सेस, मॅथेमॅटिक्स/ मॅथेमॅटिकल सायन्सेस आणि फिजिक्स/ फिजिकल सायन्सेस विषयातील बीएस-एमएस दुहेरी पदवी शिक्षणक्रमासाठी बहुतेक सर्व IISER मध्ये प्रवेश दिला जातो. अर्थ अँड इन्व्हिरॉन्मेंटल सायन्सेस विषयातील अभ्यासक्रमासाठी IISER, भोपाळ मध्ये प्रवेश दिला जातो. अर्थ अँड क्लायमेट सायन्ससाठी IISER, पुणेमध्ये प्रवेश दिला जातो. IISER, तिरूपतीमध्ये BS- MS in Science कोर्ससाठी प्रवेश दिला जातो. एकूण प्रवेश क्षमता – १,९३३.
प्रवेश क्षमता – ( i) BS- MS प्रोग्राम – एकुण १८१८. (बेरहामपूर – १८०, भोपाळ – २५५, कलकत्ता – २५०, मोहाली – २५०, पुणे – २८८, तिरूअनंतपुरम् – ३२०, तिरूपती – २७५).
IISER मधील सर्व जागा IAT-२०२४ मधील गुणवत्तेनुसार भरल्या जातील.
हेही वाचा >>> सरकारी नोकरी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, ‘या’ विभागात ६७९ पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज
पात्रता – १२ वी (विज्ञान) शाखेतील २०२२ किंवा २०२३ किंवा २०२४ मधील परीक्षा (बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स यापैकी तीन विषयांसह) किंवा समतूल्य परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी ५५ टक्के गुण) उत्तीर्ण.
उमेदवारांना फक्त एका चॅनेलमधून प्रवेश दिला जाईल.
(ज्या उमेदवारांचा १२ वीचा रिझल्ट लागावयाचा बाकी असेल अशा उमेदवारांनी Result Awaited Option मधून अर्ज करावा.) IISER मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना (९ जून २०२४ रोजी होणाऱ्या) कॉम्प्युटर बेस्ड IISER Apptitude Test ( IAT-२०२४) द्यावी लागेल.
फक्त IISER, भोपाळ येथे ४ वर्षे कालावधीच्या BS प्रोग्रॅम इन इंजिनीअरिंग सायन्सेस (केमिकल इंजिनीअरिंग/डेटासायन्स अँड इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स) आणि इकॉनॉमिक सायन्सेससाठी प्रवेश दिला जातो. बी.एस. (इंजिनीअरिंग सायन्सेस – जागा) आणि बी.एस. (इकॉनॉमिक्स सायन्सेस – ४२ जागा).
IISER, भोपाळ येथील BS प्रोग्रामसाठी पात्रता – १२ वी (विज्ञान) मॅथेमॅटिक्स विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक. IISER, भोपाळ येथे डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंगमधील बी.एस. प्रोग्रॅम हा इंटरडिसिप्लीनरी स्वरूपाचा असून यात अॅप्लिकेशन ओरिएंटेड विविध टॉपिक्सचा समावेश असेल. (जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स इ.) यातून शैक्षणिक क्षेत्रात आणि इंडस्ट्रीमध्ये उज्ज्वल कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल.
अर्जाचे शुल्क – रु. २,०००/- (अजा/अज/अपंग यांना रु. १,०००/-).
शंकासमाधानासाठी ई-मेल askjac2024 @acadsiiserb. ac. in ( The ChairpersonJAC2024 यांना ई-मेल करावा.)
हेल्प डेस्क फोन नं. ०७५५२६९१७९८ (कामाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार १४.०० ते १७.०० वाजेपर्यंत)
आयआयएसईआर अॅप्टिट्यूड टेस्ट ( IAT-२०२४) – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्याची स्वरूपाची २४० गुणांसाठी कालावधी १८० मिनिटे. (१) बायोलॉजी, (२) केमिस्ट्री, (३) मॅथेमॅटिक्स, (४) फिजिक्स प्रत्येक विषयातील १५ प्रश्न (एकूण ६० प्रश्न) प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. २४० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार रँक लिस्ट बनविली जाईल.
परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील – अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे. गोव्यातील – मडगाव, पणजी. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात कोणत्याही ५ परीक्षा केंद्रांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे.
IAT-२०२४ प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन http://www.iiseradmission.in या संकेतस्थळावर दि. १३ मे २०२४ (१७.०० वाजे) पर्यंत करावे. वेगवेगळ्या IISER साठी पसंतीक्रम IAT २०२४ चा निकाल लागल्यानंतर द्यावयाचे आहेत.
