scorecardresearch

Premium

ओळख शिक्षण धोरणाची: पीएच.डी. संशोधन, नवोपक्रमता

युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी, सुप्रतिष्ठित वरिष्ठ प्राध्यापकांना किंवा प्रख्यात संशोधक शास्त्रज्ञांना आमंत्रित करावे.

phd in information
पीएच.डी. संशोधन,

प्रा. रवींद्र कुलकर्णी

जमलेल्या बहुतेक सर्व शिक्षकांना आता GR क्रमांक NEP-2022/CR09/VISHI-3,, १६ मे २०२३, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अंमलात येत असलेल्या पाच वर्षांच्या एकात्मिक/ दोन वर्षे/ एक वर्षांच्या  PG (M.A./M.Sc./M.Com.)  च्या अभ्यासक्रमांची रचना व्यवस्थित कळलेली होती, ते आता त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम होत होते. त्यामुळे त्यांनी प्राध्यापक रमेश यांना, आम्हाला आता पीएच.डी. संशोधन कार्यक्रम आणि विद्यापीठे आणि संलग्न संशोधन केंद्रांमधील संशोधन आणि नवोपक्रम संस्कृती यावर अधिक तपशीलवार माहिती देण्याची विनंती केली.

student , Mahatma Jotiba Phule Research and Training Institute , financial aid scheme
‘आर्थिक साहाय्य योजने’कडे ‘महाज्योती’चे दुर्लक्ष; शेकडो विद्यार्थी लाभापासून वंचित
Mahatma Gandhi Jayanti Bapu Educational Background Why He Was Criticized For Going London From Porbunder after marriage
महात्मा गांधी यांचे शिक्षण किती होते? पोरबंदर ते लंडन कसा झाला बापूंचा प्रवास..
National level selection
ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती
muslim student beating
“धर्माच्या आधारावर विद्यार्थ्याला शिक्षा दिली जात असेल तर…”, सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल

प्रा. रमेश सर माहिती देताना म्हणाले, ‘‘सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी निवडलेल्या संशोधन विषयाशी संबंधित अध्यापन/ शिक्षण/ त्यासाठी आवश्यक असलेली शिक्षणपद्धती/ लेखनाच्या प्रशिक्षणासंबधी आवश्यक गोष्टींबद्दल तपशीलवार बोलू या. सर सांगत होते, राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मधील कलम १५.९ नुसार सर्व नव्या पीएच.डी. प्रवेशकर्त्यांना त्यांच्या पीएच.डी. प्रशिक्षण कालावधी दरम्यान, त्यांनी ज्या विषयात संशोधन करायचे आहे, त्या विषयाशी सुसंगत असे अध्यापन/ शिक्षण/ अध्यापनशास्त्रीय पद्धती/ लेखनात श्रेयांकाधारित अभ्यासक्रम घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना अध्यापनशास्त्रीय पद्धती, अभ्यासक्रमाची रचना, विश्वासार्ह मूल्यमापन प्रणाली, संप्रेषण आणि अशाच गोष्टींचा परिचय होईल. महाराष्ट्र राज्य  ठएढ टास्क फोर्सने सुचविल्याप्रमाणे, सर्व पीएच.डी. लेखन श्रेयांक (थिअरी क्रेडिट्स TCs) आणि भूमिकाधारित श्रेयांक (रोल-बेस्ड क्रेडिट्स – RBCs) कडे नेणारी ही श्रेयांक व्यवस्था देखील असू शकते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या सर्व बाबी, सर्व पीएच.डी.च्या अभ्यासाच्या अभ्यासक्रमात आणि भविष्यात विविध अध्यापन पद्धती जोडण्यास सक्षम करेल, याबरोबरच पीएच.डी. विद्यार्थ्यांना सहाय्यक अध्यापकपदे आणि इतर माध्यमांमध्ये एकत्रित केलेले प्रत्यक्ष अध्ययन अनुभवाचे किमान तास देखील असतील. यामुळे त्यांची भविष्यातील कारकीर्द ही उच्च शिक्षणाशी जोडली जाऊ शकेल.

रमेश सर सांगत होते की, देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. अभ्यासक्रम या दृष्टिकोनातून पुनर्गठीत केले जातील. अशा प्रकारे, डॉक्टरेट विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिकण्याच्या अनुभवांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून शिकवण्यात गुंतले पाहिजे. त्यांनी किमान एक-सेमिस्टर सिद्धांत / प्रयोगशाळा अभ्यासक्रम शिकवले पाहिजे.’’

रमेश सरांनी यानंतर ‘नजिकच्या भविष्यात भारताला ज्ञान निर्मिती, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता यामध्ये आघाडीवर राहावे लागेल; या संदर्भात राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता चौकट (नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क: NHEQF) ही डॉक्टरेट पात्रता (स्तर ८.०) कशी निर्दिष्ट करते?’ असा प्रश्न स्वत:च उपस्थित केला व त्याचे उत्तरही द्यायला प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘‘जे विद्यार्थी संशोधन विषयासंबंधी नवनवे प्रश्न उपस्थित करतात, त्या संबंधित गंभीर चिकित्सा करू शकतात आणि नवीन ज्ञान आणि नवीन डेटा संच तयार करण्याच्या प्रयत्नात माहिती गोळा करण्यासाठी योग्य पद्धती आणि साधने विकसित करू शकतात; संशोधन, शिष्यवृत्ती किंवा व्यावसायिक सराव या एक किंवा अधिक क्षेत्रांमध्ये नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी संशोधन आणि तपास करण्यासाठी भरपूर ज्ञानाचा वापर करू शकतात असे विद्यार्थी डॉक्टरेट संशोधनातून तयार होणे अपेक्षित आहे. पीएच.डी. (स्तर ८.०) मधील संशोधन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि/किंवा व्यावसायिक सरावाच्या प्रगतीसाठी शिक्षणाच्या जटिल क्षेत्राची पद्धतशीर आणि गंभीर समज आणि विशेष संशोधन कौशल्ये असणे अपेक्षित आहे; त्यांनी त्यांच्या अध्ययनाच्या किंवा व्यावसायिक सराव क्षेत्राच्या संदर्भात नवीन ज्ञानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण आणि मूळ योगदान देणेही अपेक्षित आहे. मित्रहो, अशाप्रकारे  NEP 2020 मध्ये उच्च शिक्षण प्रणालीमध्ये दर्जेदार संशोधनाला चालना देण्याची कल्पना आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी, उच्च शिक्षण संस्था (HEIs) द्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढवण्यासाठी संशोधन, नवकल्पना आणि विकास हे महत्त्वाचे पैलू आहेत.’’

रमेश सर सांगत होते, ‘‘संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासावर भर देणारी उच्च शिक्षण संस्थाची  Research Ecosystem मजबूत असेल तरच आपल्या देशासमोरील विविध सामाजिक आव्हाने हाताळली जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून, उच्च शैक्षणिक संस्थांमधील ‘संशोधन आणि विकास कक्षा’च्या (RDC) स्थापनेसाठी UGC ने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊ या. ही तत्वे आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा पाया म्हणून संशोधन, नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान विकासाच्या एकात्मतेसाठी संशोधन परिसंस्थेचा विकास आणि बळकटीकरण करण्यासाठी मजबूत अशा यंत्रणेची कल्पना करते. NEP-2020  च्या तरतुदी या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी संरेखित आहेत. उच्च शिक्षण संस्थांमधील  फऊउ विश्वसनीय, प्रभावी आणि शाश्वत संशोधन उत्पादनासाठी संशोधन परिसंस्था तयार करण्यात मदत करेल. अशा इकोसिस्टमचे काही आवश्यक घटक आहेत, उदा. ज्ञानाची निर्मिती आणि संशोधन, नवकल्पना आणि औद्योगिक आणि सामाजिक फायद्यांसाठी तंत्रज्ञानाचा विकास, निष्णात मानवी संसाधने (संशोधक आणि शिक्षक), प्रगल्भ बौद्धिक भांडवल (ज्ञान आणि कौशल्ये), प्रशासनाद्वारे परिभाषित केली जाणारी नियमन आणि धोरणे, मजबूत आर्थिक संसाधने (निधी आणि अनुदान) इ. RDC चे सातत्याने चाललेले नियमित उपक्रम हे संशोधकांना सातत्य आणि नैतिकतेचे महत्त्व समजले आहे, संस्थात्मक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर संशोधन आणि प्रकाशन पद्धतींच्या नैतिक नियमांचे पालन केले आहे हे सुनिश्चित करतील. यासाठीचे एक मानक म्हणजे ‘संशोधन चौर्य तपासणी’ (plagiarism test) हे आहे. या चाचणीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे व त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर सहजगत्या उपलब्ध करून दिले पाहिजे.

रमेश सर म्हणाले, ‘‘याखेरीज, RDC ने  संदिग्ध संशोधन, संदिग्ध प्रकाशन संस्था आणि  Predatory Journals बद्दल संशोधक समुदायाला संवेदनशील करणे अभिप्रेत आहे. संस्थेच्या संशोधन धोरणांशी संबंधित संशोधन-केंद्रित माहिती, डेटाबेस, प्रकाशने, संशोधन प्रकल्प, फेलोशिप, सहयोग, पेटंट, संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची क्षेत्रे, नवकल्पना इत्यादी बाबी संकलित आणि व्यवस्थापित करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी संशोधन माहिती व्यवस्थापन प्रणाली (Research Information Management  System) स्थापित केली पाहिजे.’’

रमेश सर सांगत होते, ‘‘प्रत्येक  HEI ने संस्थात्मक संशोधन माहिती आणि संस्थात्मक भांडारासाठी ब्लॉग किंवा पोर्टल तयार करणे आणि शोध गंगा, शोध गंगोत्री, शोध सिंधू, शोध शुद्धी आणि शोध चक्राद्वारे संशोधन माहिती मिळवण्यासाठी आणि वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी  UGC-  INFLIBNET सह सामंजस्य करार करणे आवश्यक आहे.  HEI च्या  R&D सेलने हे सुनिश्चित केले पाहिजे की संस्थेतील सर्व संशोधन प्रयोगशाळा चांगल्या प्रयोगशाळा पद्धती (Good Laboratory Practices) आणि जैव आणि रासायनिक सुरक्षितता उपायांचे निकष पूर्ण करतील, ज्यांना  QIP  केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे आणि जिथे शक्य असेल तिथे प्रयोगशाळाना  NABL ( National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories मान्यता घेणे अशाप्रकारे  RDC  संसाधनांची जमवाजमव सुलभ करू शकते आणि संशोधन आणि विकासासाठी सरकार, उद्योग आणि इतर निधी संस्थांकडून एक सुरक्षित निधी निर्माण करू शकते. तसेच, संशोधन क्रियाकलापांना टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचे साहाय्य घेऊ शकते. युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी, सुप्रतिष्ठित वरिष्ठ प्राध्यापकांना किंवा प्रख्यात संशोधक शास्त्रज्ञांना आमंत्रित करावे.

विद्यापीठांमधील  RDC ने उद्योग, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि इतर भागधारकांकडील संशोधक आणि संबंधित संशोधन निधी संस्था यांच्यातील सहकार्य आणि समन्वयात्मक भागीदारी आणि संपर्कासाठी संभाव्य साहचर्य ओळखलं पाहिजे. त्यासाठी प्रकल्प प्रस्ताव तयार करणे, सादर करणे आणि अनुदान मंजूर केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. या जोडीनेच दिलेल्या कालमर्यादेचे पालन करण्यावर लक्ष ठेवले पहिजे. भारतातील विद्यार्थी व तरुणांसाठी, नवीन करिअर व उद्योजकतेच्या संधी खुल्या करण्याच्या वचनासह स्टार्ट-अप इकोसिस्टमचा महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांमध्ये स्थापन केलेल्या इनक्युबेशन केंद्रांद्वारे चांगला प्रचार केला जावा. HEI मध्ये संशोधनासाठी महत्त्वाची क्षेत्रे ओळखली जावीत, ज्यात सामाजिक गरजा आणि मुख्य संसाधनांची उपलब्धता, ज्यामध्ये इन-हाउस मानव संसाधने, फॅकल्टी संशोधन क्षमता आणि समर्थन प्रणाली यांचा समावेश आहे. हे  ऌएकना संशोधनाच्या या ओळखलेल्या समकालीन क्षेत्रांमध्ये प्रकर्ष केंद्र (Centre of Excellence- CoE) स्थापन करण्याचा विचार करण्यास सक्षम करेल. सदर प्रकर्ष केंद्रे ही विद्यापीठांच्या  RDC द्वारे प्रशासित व देखरेख केलेल्या प्रक्रिया आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचे उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी नवोपक्रम केंद्र (Incubation Centre) म्हणून काम करू शकतात. थोडक्यात दर्जेदार संशोधनांद्वारे ज्ञानाच्या सीमांना पुढे ढकलण्यासाठी आणि सामाजिक गरजांशी संबंधित तांत्रिक घडामोडींमध्ये योगदान देण्यासाठी विविध विषयांमधील नवीनतम प्रगतीच्या अनुषंगाने संशोधन समस्या हाताळण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची क्षमता निर्माण करण्यात  RDC महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.’’

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Education policy phd in information phd research topics phd thesis topics zws

First published on: 02-06-2023 at 11:05 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×