ESIC GROUP ‘C’ Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळांतर्गत(Employees State Insurance Corporation) विविध राज्यांमध्ये पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी बंपर भरती होणार आहे.या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करु इच्छितात ते ESICच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर निश्चित केली आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत १०३८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाईल. या भरतीसाठी अधिकृत अधिसुचना जाहीर करण्यात आली असून ESIC तर्फे १ ऑक्टोबरपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे जी ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू राहील.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

अधिसुचना – https://www.esic.gov.in/recruitments/index/page:2

ESIC Various Vacancy 2023:असा करा अर्ज

  • या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ESICच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवर Submit Online Application for Recruitment to the Paramedical Posts in ESIC क्लिक करा.
  • आता नवीन पेजवर New Registration वर क्लिक करा आणि नोंदणी करा
  • त्यानंतर आवश्यक माहिती नोंदवा आणि फोटो आणि सही जोडा
  • आता निश्चित अर्ज शुल्क जमा करा
  • शेवटी संपूर्ण अर्जाची प्रिंट काढा
  • अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत निश्चित केली गेली आहे.

अर्ज करण्याची थेट लिंक – https://ibpsonline.ibps.in/esicjan23/

ESIC Recruitment 2023: रिक्त पदांचा तपशील:

विविध क्षेत्रांमधील १०३५ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

  • बिहार प्रदेश -६४ पदे
  • चंदीगड आणि पंजाब प्रदेश – २९ पदे
  • छत्तीसगड प्रदेश – २३ पदे
  • दिल्ली NCR प्रदेश – २७५ पदे
  • गुजरात प्रदेश – ७२पदे
  • हिमाचल प्रदेश प्रदेश – ६पदे
  • जम्मू आणि काश्मीर प्रदेश – ९ पदे
  • झारखंड प्रदेश – १७ पदे
  • कर्नाटक प्रदेश – ५७ पदे
  • केरळ प्रदेश – १२ पदे
  • मध्य प्रदेश प्रदेश – १३ पदे
  • महाराष्ट्र प्रदेश – ७१ पदे
  • ईशान्य प्रदेश – १३ पदे
  • ओडिशा प्रदेश – २८पदे
  • राजस्थान प्रदेश – १२५ पदे
  • तामिळनाडू प्रदेश – ५६ पदे
  • तेलंगणा प्रदेश – ७०पदे
  • उत्तर प्रदेश प्रदेश – ४४ पदे
  • उत्तराखंड प्रदेश – ९ पदे
  • पश्चिम बंगाल प्रदेश – ४२ पदे

ESIC Recruitment 2023: अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज भरताना अर्ज शुल्क जमा करणे अनिवार्य आहे. अर्ज शुल्क जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस श्रेणीच्या वर्गासाठी ५०० रुपये आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएसएम/ महिला/ डिपार्टमेंटचे उमेदवारांसाठी ३५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. शुल्क वाढ ऑनलाइन माध्यमातून केले जाऊ शकते.

Story img Loader