Success Story Of Ex IPS officer Rajan Singh : एखादे स्वप्न पूर्ण करण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. काहींना यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत तर काहींना वेगवेगळ्या करिअरच्या पर्यायांचा प्रयोग करावा लागतो. काही जण अपयशापोटी मध्येच प्रवास सोडून देतात, तर काही जण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतात. तर आज आपण अशाच एका माजी भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांनी आतापर्यंत आठ वेगवेगळ्या कारकिर्दी अनुभवल्याचा खुलासा केला आहे.

लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये त्यांनी हा प्रवास शेअर केला आणि भविष्यात त्यांना आणखी करिअर मार्गांचा अनुभव घेण्याची आशा आहे असेही म्हटले आहे. कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) चे माजी विद्यार्थी असलेले राजन सिंग (Rajan Singh) यांनी गुन्हेगारांचा पाठलाग करण्यापासून ते गुंतवणूक बँकर्सना शिकवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सांगितला आहे. राजन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे याची यादीसुद्धा दिली आहे, ती पुढीलप्रमाणे…

१. चार वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी
२. आठ वर्षांसाठी आयपीएस अधिकारी
३. मॅककिन्से येथे स्ट्रॅटेजी कन्सल्टंट
४. प्रायव्हेट इक्विटी फंडमध्ये गुंतवणूकदार
५. वित्त शिक्षक (गुंतवणूक बँकर्सना शिकवण्याचे काम केले)
६. शिक्षण उत्पादनांवर काम करणारे तंत्रज्ञान उद्योजक
७. भौतिकशास्त्राचे शिक्षक आणि उद्योजक
८. हॅबिटस्ट्राँग येथे उत्पादकता, लक्ष केंद्रित करणे, डिजिटल व्यसनमुक्तीसाठी मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स-आधारित प्रशिक्षण.

पोस्ट वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.linkedin.com/posts/rajansingh96_till-now-i-have-experienced-almost-eight-activity-7317876073315086336-5lSn?utm_source=li_share&utm_content=feedcontent&utm_medium=g_dt_web&utm_campaign=copy

प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो (Success Story) :

या पोस्टनेच लोकांना त्यांची संपूर्ण गोष्ट वाचायला भाग पाडले. तसेच पोस्टमध्ये ते पुढे असेही म्हणाले की, ‘आणि जर मला आणखीन जगण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली, तर मला अजून ८-१० करिअर मार्ग अनुभवण्याची इच्छा आहे. ही चांगली गोष्ट आहे की वाईट आहे हे तर आपल्यावर अवलंबून आहे. तसेच फक्त एकच काम केल्याने तुम्हाला तुमच्या कलेमध्ये खोलवर जाता येते आणि ‘कंपाउंडिंग’चा फायदा होतो.

एकाच मार्गावर टिकून राहिल्याने प्रभुत्व अधिक गहन होते आणि दीर्घकालीन फायदा निर्माण होतो, तर विविध अनुभव स्वतःला एक बक्षीस देऊन जातो. जसे की, वेगवेगळ्या गोष्टी जोडण्यास, नवीन अंतर्दृष्टी निर्माण करण्यास मदत करतात, ज्या अशक्य असतात. कॉलेजमध्ये एखादी गोष्ट शिकली की पुढची ३५ वर्षे तेच शिकत राहण्याचे वय आता संपले. आपण सर्वांनी पुढे जात राहायचं आणि काहीतरी नवीन शिकत राहायचे. कारण याच गोष्टी जीवनाला रोमांचक बनवतात, कारण प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो आणि प्रत्येक दिवशी जीवनाचा खेळ पुन्हा सुरू होतो; असे सांगत राजन यांनी त्यांची पोस्ट पूर्ण केली.