– डॉ. मिलिंद आपटे

● मला १० वीला ८५ गुण मिळाले (२०२२). पुढे ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स) ८५.५ गुणांसह पूर्ण केले (२०२४). टेक्निकल सायन्समध्ये बारावी उत्तीर्ण झालो. (७५). सध्या मी टाटा मोटर्स (पुणे) मध्ये एक वर्षाची अॅप्रेंटीसशिप करत आहे. सोबतच मी APCOERPune येथे BVoc. ( बॅचलर्स इन व्होकेशनल इन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिक सर्व्हिसेस) ला प्रवेश घेतला आहे. या कोर्सचा भविष्यात नेमका काय स्कोप आहे? तसेच पदवीनंतर पुढील शिक्षणाचे कोणते पर्याय आहेत? सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या कोणकोणत्या संधी आहेत याविषयी कृपया मार्गदर्शन करावे.

– राजवर्धन तायडे

– खरे तर हे प्रश्न तुम्ही APCOER येथे विचारले असते तर जास्त बरे झाले असते. असो वरील बी.व्होक हा यूजीसी मान्यताप्रत पदवी कोर्स आहे, त्यामुळे पुढील सर्व शिक्षणासाठी उपयुक्त आहे म्हणजेच GATE वगैरे परीक्षा देवून तुम्ही पीजी करू शकता , तसेच हा कौशल्य आधारित कोर्स असल्याने उत्पादन क्षेत्रात संधी मिळतील, सरकारी क्षेत्रातील सर्व संधी आहेतच. यूजीसीची मान्यता असलेली पदवी असल्याने तिथे अडचण नाही , तसेच APCOER, Pune सुद्धा ७ लेवल पूर्ण झाल्यावर संधी उपलब्ध करून देतात असे दिसतेय. त्यामुळे उत्तमरित्या हा कोर्स पूर्ण करा.

२) मला दहावीला ९३ टक्के होते, नंतर मी सिव्हील इंजिनीअरिंग मधून तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण (९३.११ टक्के) केला. मी सध्या अमरावती शासकीय महाविद्यालयातून सिव्हील इंजिनीअरिंग करत आहे आणि येथेही माझा सीजीपीए ९.२ आहे. सध्या मी पदवीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. मला सिव्हील इंजिनीअरिंग मध्ये करिअर करायचे आहे. मला एमपीएससीची ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा’ परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. तर मी वेळेच नियोजन आणि परीक्षेची तयारी कशी करू?

– आदित्य भेंडे

– एकूण तुम्ही एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहात, त्यामुळे आयईएससाठी सुद्धा प्रयत्न करावा. त्याचा किंवा ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवे’चा अभ्यास हा पूर्णत: अभियांत्रिकी विषयाला धरूनच असतो . GATE ची तयारी पण सोबत करावी कारण या दोन्ही परीक्षा एकमेकांना पूरक अशा आहेत. याची तयारी तिसऱ्या वर्षापासून सुरू करावी. तज्ञांचे मार्गदर्शन आणि साहित्य महत्त्वाचे आहे. खूप शुभेच्छा

careerloksatta@gmail.com