HAL Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या वतीने इंजिनिअरिंग, टेक्नलॉजीमध्ये पदवी असलेल्या तरुणांसाठी डिझाइन ट्रेनी (DT) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) या पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू झाली आहे, जी २२ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार HAL च्या अधिकृत वेबसाइट hal-india.co.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे.

Design & Management Trainee Vacancy 2023: भरतीची प्रक्रिया

एकूण १८५ पदे भरण्यासाठी ही भरती करण्यात आली आहे. यामध्ये डिझाईन ट्रेनी (DT) च्या ९५ पदे आणि मॅनेजमेंट ट्रेनी (तांत्रिक) च्या ९० पदांची भरती केली जाणार आहे. या HAL च्या विविध विभाग/संशोधन आणि डिझाइन केंद्रे/कार्यालयांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाईल.

हेही वाचा – IBPBमध्ये स्पेशल आणि प्रोबेशनरी ऑफिसरची भरती, जाणून घ्या वयोमर्यादा अन् पात्रता निकष

HAL Recruitment 2023:काय असावी पात्रता

एचएएल डिझाइन ट्रेनी (DT) आणि मॅनेजमेंट ट्रेनी भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमध्ये पूर्ण वेळ इंजनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये पदवी असणे आवश्यक आहे. पात्रता आणि वयोमर्यादेबाबत सविस्त माहिती उमेदवार HAL ऑफिशिअर वेबसाइटवर भेट देऊ शकतात करु शकतात.

अधिसुचना – https://cbexams.com/halreg2023/Inc/Final%20Detailed%20Advertisement%20-2.8.2023%20(English).pdf

हेही वाचा – BELमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदावर निघाली भरती, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

HAL Recruitment 2023: अर्जाची प्रक्रिया

या भरतीमध्ये २ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत hal-india.co.in च्या करिअर विभागात जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, अर्ज भरणे केवळ ऑनलाइन माध्यमातूनच करता येईल, इतर कोणत्याही माध्यमातून भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटवर दिलेली तपशीलवार सूचना पहा.