Harsh Gupta Success Story In Marathi : दरवर्षी जेव्हा आयआयटी-जेईईचे निकाल जाहीर होतात. तेव्हा त्यांचे गुण पाहून एवढं हुशार कोण असतं? हे विद्यार्थी नेमका कसा अभ्यास करत असतील असे असंख्य प्रश्न आपल्या मानतात येतात. तर अशीच एक कहाणी महाराष्ट्रातील कल्याण येथील १९ वर्षीय हर्ष गुप्ताची आहे; ज्याने गंभीर आरोग्य समस्या आणि आर्थिक संघर्षांवर मात करून भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या आयआयटी रुरकीमध्ये आपले स्थान मिळवले.

हर्ष गुप्ताचे पालक संतोष आणि रीता गुप्ता, एक लहान पाणीपुरीचा स्टॉल चालवतात. पाणीपुरीच्या स्टॉलवर ते दिवसाला ६०० ते १००० रुपये कमवतात. एवढे मर्यादित उत्पन्न असूनही, त्यांना नेहमीच त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, त्यांचे भविष्य चांगले असावे असे वाटत होते. हर्षने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले आणि त्याच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत ९०.८ टक्के गुण मिळवले.

हर्ष कॉलेजमध्ये (Model College) गेला तेव्हा परिस्थिती थोडी बदलली. त्याला प्रोलॅप्स रेक्टम (गुदभ्रंश म्हणजे प्रोलॅप्स रेक्टम) हा वैद्यकीय आजार झाल्याचे निदान झाले. त्यामुळे परीक्षा देणे त्याच्याकडून राहिले. त्याच वर्षी त्याच्या दोन काकूंचे निधन झाले, ज्यामुळे कुटुंबावर भावनिक आणि आर्थिक दबाव वाढला. हर्ष ११ वीत नापास झाला आणि त्याच्या आजूबाजूच्या अनेक लोकांना त्याच्या क्षमतेवर शंका येऊ लागली.

पैसे कमवण्यासाठी फ्रीलान्सिंग, व्हिडीओ एडिटिंग केलं (Success Story)

कोविड-१९ महामारीच्या काळात, हर्षला कोटा येथील मोशन एज्युकेशनचे संस्थापक नितीन विजय यांचा एक इन्स्टाग्राम व्हिडीओ दिसला. प्रेरणा घेऊन त्याने कोटा येथे जेईईचे शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न आहे असे आपल्या पालकांना सांगितले. पालकांनीही त्याला मनापासून पाठिंबा दिला. त्यांनी पैशांची व्यवस्था केली आणि २०२३ मध्ये त्याला कोटा येथे पाठवले. हर्ष विज्ञान नगरमधील एका पीजीमध्ये राहिला, जिथे परिस्थिती पाहून दयाळू मालकाने भाडेही कमी केले.

दुर्दैवाने ऑगस्ट २०२४ मध्ये, हर्षची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्याला घरी परतावे लागले. आजारी पडल्यामुळे मॉक टेस्टमध्ये गुण कमी पडले. पण, त्याने हार मानली नाही. त्याने जेईई मेन्समध्ये ९८.५९% गुण मिळवले. पण, तो ॲडव्हान्स्डसाठी पात्र होऊ शकला नाही. काही शिष्यवृत्तीच्या पाठिंब्याने आणि दृढ निश्चयाच्या जोरावर, त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि २०२५ च्या जेईई मेन्समध्ये ९८.९४% गुण मिळवले. यावेळी, त्याने जेईई ॲडव्हान्स्ड देखील उत्तीर्ण केले आणि १६,१५५ चा रँक मिळवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्षकडे अभ्यासासाठी लॅपटॉपही नव्हता. तो मोबाईल फोनवर सर्व काही शिकत होता. पैसे कमवण्यासाठी त्याने फ्रीलान्सिंग, व्हिडीओ एडिटिंग सारख्या छोट्या नोकऱ्या करत होता आणि सुट्टीच्या काळात पाणीपुरीच्या दुकानात त्याच्या वडिलांना मदत करत होता. हर्ष गुप्ता आयआयटीमध्ये प्रवेश घेणारी कुटुंबातील सगळ्यात पहिला व्यक्ती ठरली आहे. पदवीधर झाल्यानंतर, त्याला यूपीएससीची तयारी करून, इतरांना मदत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करण्याची त्याची इच्छा आहे. तर हर्षची कहाणी एका गोष्टीची आठवण करून देतो की, धैर्य, कुटुंबाचा पाठिंबा आणि कधीही हार न मानल्यास, कोणतेही स्वप्न सत्यात उतरू शकते.