मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत वेबसाईटद्वारे incometaxmumbai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील २९१ पदे भरण्यात येणार आहेत. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.
या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील २९१ पदे भरण्यात येणार आहेत. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.
रिक्त जागा तपशील
टॅक्स इंस्पेक्टर : १४ पदे
स्टेनोग्राफर : १८ पदे
टॅक्स असिस्टंट : ११९ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ : १३७ पदे
कॅन्टीन अटेंडंट: ३ पदे
पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
अधिसुचना – https://www.incometaxmumbai.gov.in/pdf/sports-recruitment.pdf
पगार – निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार मिळेल. जो १८,००० रुपयांपासून १,४२,४०० पर्यंत असू शकतो.

निवड प्रक्रिया
गुणवंत खेळाडूंच्या नियुक्तीसाठी विचार केला जाईल. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल आणि ट्रेनिंग (Department of Personnel and Training) प्राधान्यक्रमानुसार गुणवंत खेळाडूंची निवड केली जाईल.
हेही वाचा – GIC Recruitment 2023: ८५,००० महिना पगाराची नोकरी शोधत आहात? मग उशीर न करता ताबडतोब करा अर्ज
अर्ज फी
सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी ₹२००/- आहे. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे आणि अर्जासोबत पेमेंटचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार आयकराची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.