Indian Bank Specialist Recruitment 2023: इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या विविध पदांसाठी भरती काढली आहे. इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट indianbank.in वर जाऊ ऑनलाईन अर्ज करू शकतात. या प्रक्रियेंतर्गत १८ पदांची भरती केली जाईल. इंडियन बँकेमध्ये या भरतीतंर्गत उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. यानंतर रजिस्ट्रेशन केले जाणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Indian Bank Specialist Recruitment 2023: पदांची संख्या

एकूण पदे- १८
प्रॉडक्ट मॅनेजर – ५ पदे
टीम लीड – ७ पदे
चार्टर्ड अकाउंटंट – ६ पदे

Indian Bank Specialist Recruitment 2023: पात्रता आणि अनुभव

इच्छूक उमेदवार आपल्या पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट indianbank.in वर जाऊन ऑनलाईनवर जाऊन पाहू शकतात. विविध पदांसाठी वेगवेगळ्या अनुभवाची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी अधिसुचना काळजीपूर्वक वाचा.

हेही वाचा – सॅलरी कितना लोगे भैय्या? Amazon, Infosys सारख्या कंपनीत मुलाखतीची मिळू शकते संधी, इंजिनिअरने दिल्या भन्नाट आयडिया

Indian Bank Specialist Recruitment 2023: निवड प्रक्रिया

इंडियन बँकेमध्ये भरती होण्यासाठी निवड प्रकियेतून जावे लागेल. यमध्ये निवड पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारावर होईल. यामध्ये उमेदवारांची कामगिरीही पाहायला मिळणार आहे. मुलाखतीसाठी एक किंवा अधिक व्यक्ती असू शकतात. अर्ज शुल्कबाबत सांगायचे झाल्यास, उमेदवाराला अर्ज करण्यासाठी १००० रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

हेही वाचून – १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सशस्त्र सीमा दलात ‘या’ पदांची मोठी भरती, पगार किती?

Indian Bank Specialist Recruitment 2023: येथे अर्ज करा

मुख्य महाव्यवस्थापक (CDO आणि CLO), इंडियन बँक कॉर्पोरेट ऑफिस, HRM विभाग, भरती विभाग २५४- २६०,अव्वई शुनमुगम सलाई, रोयापेट्टा, चेन्नई, तमिळनाडू. परान-६०००१४. सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी एकदा त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि त्याची अधिसूचना वाचावी.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bank specialist recruitment 2023 apply for 18 posts selection will be through interview know eligibility criteria snk
First published on: 24-05-2023 at 11:01 IST