India Post Jobs 2024: भारतीय टपाल विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागातर्फे भरतीची अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे ज्यासाठी उमेदवार ऑफलाई पद्धतीने अर्ज करून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. या भरती मोहिमेंतर्गात अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. १४ मे नंतर पोहचलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिसूचनेनुसार या भरतीमोहिमेंतर्गत एकूण २७ कार चालकांची भरती केली जाणार आहेय एन. के. रीजनमध्ये ४ पदे आणि बी.जी. (हेडक्वार्टर) रीजनमध्ये ८ पद रिक्त आहेत. या भरती मोहिमेकरिता अर्ज करणाऱ्यासाठी पात्र उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डातून १०वी उतीर्ण होणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जड आणि अवडज वाहन चालवण्यासाठी वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे.

Is strength training really easier for women with PCOS?
PCOS आहे? करा ‘हे’ व्यायाम अन् पीसीओएस नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा
bosses and co workers for sale in china
ई-कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस आणि सहकर्मचारी काढले विकायला? काय आहे हा प्रकार?
Counseling Schedule Soon Ministry of Health Disclosure for NeetUG
समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच; ‘नीटयूजी’साठी आरोग्य मंत्रालयाचा खुलासा
Video school principal forcibly removed over paper leak allegations
“मी खुर्ची सोडणारच नाही”, म्हणत शाळेची मुख्याध्यापिका बसली अडून! कर्मचारी ऑफिसमध्ये शिरले अन्.. पाहा Video
CET will provide well equipped verification center for admission process
सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी सुसज्ज पडताळणी केंद्र उपलब्ध करणार
Hearing today before the Electricity Regulatory Commission on the tender of Mahavitaran
बड्या कंपनीकडून वीजखरेदीसाठी लगबग? ‘महावितरण’च्या निविदेवर वीज नियामक आयोगासमोर आज सुनावणी
Hindustan Copper Limited Recruitment 2024 hcl junior manager 56 post bharati 2024 notification how to apply online
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘या’ विभागांत ५६ पदांसाठी भरती सुरू, पगार एक लाखांच्यावर, असा करा अर्ज
Additional CET, registration,
अतिरिक्त सीईटीची नोंदणी प्रक्रिया आजपासून, ३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज निश्चिती

India Post Jobs 2024: वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष ते जास्ती जास्त २७ वर्षा दरम्यान असावे.

हेही वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार

India Post Jobs 2024: किती मिळेल पगार
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १९,९००रुपये ते ६३,२०० रुपये प्रति महिना पगार मिळू शकतो.

India Post Jobs 2024: अशी होईल निवड
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना थिअरी टेस्ट/ड्रायव्हिंग टेस्ट आणि मोटर मेकॅनिझम टेस्टमध्ये हजर राहावं लागेल. यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवाराची या पदांवर निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवाराला २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पार करावा लागेल.

अधिकृत अधिसूचना – https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_19042024_MMS_English.pdf

हेही वाचा – SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…

India Post Jobs 2024: येथे करा अर्ज
अर्ज करण्यासाठी, उमेदवार अर्ज भरू शकतात आणि आवश्यक कागदपत्रांसह “व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू – ५६०००१” या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवू शकतात, आवश्यक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात करू शकता