Indian Coast Guard Recruitment 2024 : इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २०२४ मध्ये भारतीय तटरक्षक दलात नाविक या पदांसाठी भरती सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक नाविक (जनरल ड्युटी) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०२४ ही आहे.

Indian Coast Guard Recruitment 2024 : या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त पदे, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

रिक्त पदे आणि अर्ज प्रक्रिया :
भारतीय तटरक्षक दलाच्या अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी) च्या २६० पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार आयसीजीच्या (ICG) अधिकृत भरती पोर्टलवर joinindiancoastguard.cdac.in ऑनलाइन भरती प्रक्रियेसाठी नोंदणी करू शकणार आहेत .

शैक्षणिक पात्रता :
पदाच्या पात्रतेनुसार उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून (भौतिकशास्त्र/गणित विषयांसह) १०+२ (बारावी) उत्तीर्ण असावेत. तसेच उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांच्या गुणपत्रिकेशिवाय नमूद केलेल्या सर्व विषयांसाठीचे गुण अचूकपणे भरले पाहिजेत. चुकीचे किंवा अपूर्ण गुण भरल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ शकते याची नोंद घ्यावी.

हेही वाचा…UBI Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ६०६ ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

वयोमर्यादा :
अधिसूचनेनुसार या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ते २२ वर्षे यादरम्यान असावे. अर्ज करताना उमेदवारांचा जन्म ०१ सप्टेंबर २००२ ते ३१ ऑगस्ट २००६ (दोन्ही समावेशी) दरम्यान झालेला असावा. त्याशिवाय फक्त पुरुष भारतीय उमेदवारांनी इथे अर्ज करायचा आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.