● भारतीय नौदलामध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविण्यासाठी जून २०२६ पासून सुरू होणारा स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्सकरिता इंडियन नेव्हल अॅकॅडमी, ( INA) इझिमाला, केरळ येथे प्रवेश.

पदाचे नाव – SSC Executive ( Information Technology) – एकूण रिक्त पदे – १५.

पात्रता – एम.एस्सी./ बी.ई./बी.टेक . /एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर सिस्टीम / सायबर सिक्युरिटी / सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्कींग/कॉम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्कींग /डेटा अॅनालिटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा एम.सी.ए. (कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील बी.सी.ए./ बी.एस्सी. पदवीसह) आणि १० वीला किंवा १२ वीला इंग्लिश विषयात किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत. तसेच पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक.

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

वजन – उंची आणि वय यांचे प्रमाणात वजन असावे. (पुरुष व महिला) ज्यांचे वय २० ते ३० वर्षे दरम्यानचे आहे आणि

( i) उंची १५२ सें.मी. असलेले उमेदवारांसाठी किमान वजन ४३ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५३ कि.ग्रॅ.

( ii) १५७/१५८ सें.मी. उंचीसाठी – किमान वजन ४६ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५७ कि.ग्रॅ. असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००१ ते १ जुलै २००६ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती – SSB इंटरव्ह्यूकरिता उमेदवार शॉर्टलिस्ट करताना (१) बी.ई./बी.टेक. पात्रता धारकांचे/अंतिम वर्षाच्या उमेदवारांचे 5 व्या सेमिस्टरपर्यंतचे सरासरी गुण पाहिले जातात. (२) पदव्युत्तर पदवीधारकांचे M. Sc./ M. C. A./ M. Tech. सर्व सेमिस्टर्सचे सरासरी गुण पाहिले जातील. पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवारांचे प्री-फायनल वर्षाची गुणवत्ता पाहिली जाईल.

उमेदवारांची निवड सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ( SSB) इंटरव्ह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरॅक्टर व्हेरिफिकेशननंतर मेडिकल एक्झामिनेशनमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नेमणूक दिली जाईल.

१ जानेवारी २०२३ किंवा त्यानंतर मिळविलेले नेव्हल/आर्मी/एअर विंगचे NCC- C सर्टिफिकेट (किमान बी ग्रेडसह) उमेदवारांना SSB साठी निवडताना किमान ५ टक्के गुणांची सूट दिली जाईल.

SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल. SSB इंटरह्यूची विस्तृत माहिती इंडियन नेव्हीच्या www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रशिक्षण – निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर ६ आठवड्यांचे नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग नेव्हल शिप्स आणि ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट्समध्ये दिले जाईल. फक्त अविवाहित उमेदवारच ट्रेनिंगसाठी पात्र आहेत.

वेतन – मूळ वेतन रु. ५६,१००/- इतर भत्ते मिळून अंदाजे वेतन दरमहा रु. १,२५,०००/-.

प्रोबेशन कालावधी – २ वर्षे.

नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान करता येईल.

suhaspatil237 @gmail. com