Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात नोकरी मिळण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाने तब्बल २५४ रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया २४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे; अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२४ आहे. पण, या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, पगार आणि इतर माहिती सविस्तररीत्या जाणून घेऊ…

पदाचे नाव

शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC)

पदसंख्या – २५४

रिक्त पदे

एक्झिक्युटिव्ह ब्रँच

SSC जनरल सर्व्हिस (GS / XI)– ५०
SSC पायलट- २०
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर – १८
SSC एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)- ०८
SSC लॉजिस्टिक्स- ३०
SSC नेव्हल आर्मेंट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)- १०

एज्युकेशन ब्रँच

SSC एज्युकेशन – १८

टेक्निकल ब्रँच

SSC इंजिनियरिंग ब्रँच (GS)- ३०
SSC इलेक्ट्रिकल ब्रँच (GS)- ५०
नेव्हल कन्स्ट्रक्टर- २०

शैक्षणिक पात्रता

१) एक्झिक्युटिव्ह ब्रँच
६० टक्के गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc./B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

२) एज्युकेशन ब्रँच
प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा ५५ टक्के गुणांसह एम.ए. (इतिहास) किंवा ६० टक्के गुणांसह BE/B.Tech.

३) टेक्निकल ब्रँच
६० टक्के गुणांसह BE/B.Tech.

वयोमर्यादा

वय १८ ते २४ वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. (प्रत्येक पदानुसार ते वेगवेगळे आहे.)

अर्ज शुल्क

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

वेतन

उमेदवाराची निवड झाल्यास त्याला दरमहा ५६ हजार १०० रुपये एवढे वेतन मिळणार आह

महत्त्वाच्या तारखा

२४ फेब्रुवारी २०२४ – अर्ज प्रक्रियेला सुरुवात
१० मार्च २०२४ – अर्ज करण्याची शेवटची तारीख

अधिकृत संकेतस्थळ

www.indiannavy.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा.