मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि आपण व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी पात्र ठरलो की मग व्यक्तिमत्त्व चाचणीची तयारी करायची असं नसतं. नागरी सेवा परीक्षा द्यायचा निर्णय घेतल्यापासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे सगळे लहान-मोठे बदल महत्त्वाचे असतात. यशाची टक्केवारी व्यक्तिमत्त्व चाचणीच्या टप्प्यावर सर्वात जास्त असते आणि त्यामुळे त्याची पद्धतशीर तयारी खूप महत्वाची असते.

२०२५ वर्षाच्या नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा येत्या रविवारी म्हणजे २५ मे रोजी होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना मन:पूर्वक शुभेच्छा. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणार की नाही याची खात्री नसली तरी पूर्व आणि मुख्य परीक्षेदरम्यान खूपच कमी अंतर असल्याने उमेदवारांनी वेळ न दवडता मुख्य परीक्षेसाठी तयारी त्वरित सुरू करावी. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करत १००० गुणांच्या जनरल स्टडीज चे पेपर १ ते ४, ५०० गुणांसाठी वैकल्पिक विषय पेपर १ आणि २, २५० गुणांसाठी निबंध २ विषय या सर्व विषयांचा गेल्या दहा वर्षांच्या प्रश्न पत्रिकांचे विवेचन करत अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांचा सखोलपणे अभ्यास आवश्यक आहे हे उमजून घ्यावे. या व्यतिरिक्त सक्तीचे इंग्रजी आणि regional language चे २ पेपर या विषयी तुम्ही दुर्लक्ष न करता उत्तीर्ण व्हायलाच हवे नाहीतर तुमचे मुख्य परीक्षेचे १७५० गुणांचे इतर पेपर तपासले जाणार नाहीत.

आता पूर्व परीक्षा देणाऱ्यांपैकी किमान १५००० हून अधिक उमेदवार हे मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील आणि शेवटी अंदाजे तीन हजार उमेदवार हे पुढच्या वर्षीच्या व्यक्तिमत्त्व चाचणीच्या टप्प्यावर पोहोचतील. आमच्या या लेखमालेचा त्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त फायदा होईल. पूर्व परीक्षा ही गाळणी स्वरूपाची परीक्षा आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना याच टप्प्यावर मागे राहावं लागतं आणि पुढच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेच्या तयारीला लागावं लागतं. यशाची टक्केवारी व्यक्तिमत्त्व चाचणीच्या टप्प्यावर सर्वात जास्त असते आणि त्यामुळे त्याची पद्धतशीर तयारी खूप महत्वाची असते.

या लेखमालेत आत्तापर्यंत आपण डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, व्यक्तिमत्त्व चाचणीला जाताना कशा प्रकारचे कपडे घालायचे याबद्दल माहिती घेतली आहे. नंतर अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये जी वैयक्तिक माहिती आहे त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहिलं. गेल्या काही लेखांमध्ये आपण वेगवेगळ्या वैकल्पिक विषयांवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलं आहे. हे सगळे संभाव्य प्रश्न असतात. याचा उमेदवारांना तयारी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे प्रश्न तयारीची दिशा ठरवण्यासाठी उपयोगी पडू शकतात.

नागरी सेवा परीक्षा ही जशी ज्ञानाची परीक्षा आहे तशीच ती चिकाटीची आणि संयमाची पण परीक्षा आहे. परीक्षेची प्रक्रिया १२ ते १५ महिने चालते, प्रत्येक टप्प्यावर अनिश्चितता असते कारण एखाद्या टप्प्यावर उमेदवार यशस्वी झाला नाही तर त्याला परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागते. परीक्षेतल्या यशाची टक्केवारी पाहता पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्या कमीच असते. त्यामुळे कमीतकमी २/३ वर्ष या परीक्षेसाठी उमेदवारांना द्यावीच लागतात. हा सुद्धा एक प्रकारचा ताण असतो आणि त्याचा उमेदवारांना सामना करावा लागतो. ज्या उमेदवारांची घरची आर्थिक स्थिती चांगली नसते त्यांच्यावर तर अधिकच ताण येतो कारण लवकरात लवकर त्यांनी पैसे कमवायला सुरुवात करावी अशीच घरच्यांची इच्छा असते. परीक्षेच्या प्रक्रियेतूनही उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत असतात. मर्यादित आर्थिक मदत असताना अभ्यास करायचा, ग्रामीण भागातली मुलं आपलं गाव सोडून पुणे, दिल्ली अशा शहरांमध्ये अभ्यास करायला किंवा कोचिंग घ्यायला येतात. त्या नवीन शहराशी, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेता घेता अभ्यास करायचा असतो, अभ्यास करताना जे ताण येतात त्याचा सामना करायचा असतो, नवीन शहरात कोणी मित्र मैत्रिणी असतातच असं नाही अशावेळी एकटेपणाचा सामना करावा लागतो. ही सगळी आव्हानं पेलत उमेदवार परीक्षेच्या प्रक्रियेत पुढे जात असतो. या आव्हानांचा चांगला उपयोग उमेदवारांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या जडण घडणीसाठी करून घ्यायचा असतो.

मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि आपण व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी पात्र ठरलो की मग व्यक्तिमत्त्व चाचणीची तयारी करायची असं नसतं. दोन-चार दिवसांच्या तयारीने व्यक्तिमत्त्व घडत नाही. व्यक्तिमत्त्व हळूहळू घडत असतं. म्हणूनच नागरी सेवा परीक्षा द्यायचा निर्णय घेतल्यापासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे सगळे लहान-मोठे बदल महत्त्वाचे असतात. मुद्देसूद उत्तरं लिहिण्याची तयारी मुख्य परीक्षेच्या तयारीच्या वेळी होत असते. त्याचा फायदा व्यक्तिमत्त्व चाचणीतही विचारलेल्या प्रश्नांना नेमकी आणि मुद्देसूद उत्तरं द्यायला होतच असतो. काही उमेदवारांना लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते. लेखी परीक्षेत काय कागदावर उत्तरं लिहायची असतात कोणासमोर बोलायचं नसतं. व्यक्तिमत्त्व चाचणीत एक नव्हे तर पाच वरिष्ठ मंडळी बसलेली असतात आणि त्या ताणाखाली उमेदवार दबून जाण्याची भीती असते. म्हणूनच व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागते.

या लेखमालेतुन उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीच्या सर्व बाजूंबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यामधून जे लेखन आम्ही करत आहोत त्याचा एकूणच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना उपयोग होईल अशी आम्हाला आशा आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दरम्यान काही गमतीजमती सुद्धा होत असतात. मजेशीर प्रश्न, त्याला उमेदवारांनी दिलेली वेगवेगळी उत्तरं याचे काही किस्से आम्ही तुम्हाला पुढच्या काही लेखांमध्ये सांगू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mmbips@gmail. Com/ supsdk@gmail. com