● डिपार्टमेंट ऑफ स्पेस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO). इस्रो सेंट्रलाईज्ड् रिक्रूटमेंट बोर्ड ( ICRB) मार्फत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअर्सची इस्रोच्या घटक केंद्रांमध्ये ‘सायंटिस्ट/इंजिनीअर एससी’ पदांवर ग्रुप-ए (गॅझेटेड) पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ३०३.

(१) सायंटिस्ट/इंजिनीअर एससी (इलेक्ट्रॉनिक्स) ( Post Code BE००१/ अ) – ११३ पदे (२२ पदे अपंग (कॅटेगरी A-२, B-१६, C-३, D-१, E-१) उमेदवारांसाठी राखीव) ( Post Code BE००१ अ) २ पदे (स्वायत्त संस्था PRL साठी)

पात्रता – B. E./ B. Tech. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग) सरासरी ६५टक्के गुणांसह ( CGPA ६.८४/१०) उत्तीर्ण.

(२) सायंटिस्ट/इंजिनीअर एस्सी (मेकॅनिकल) ( Post Code BE००२) – १६० पदे (२० पदे अपंग (कॅटेगरी A-४, B-९, C-५, E-२) साठी राखीव).

पात्रता – B. E./ B. Tech. (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) सरासरी ६५टक्के गुणांसह ( CGPA ६.८४/१०) उत्तीर्ण.

(३) सायंटिस्ट/इंजिनीअर एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) ( Post Code BE००३) – ४४ पदे (८ पदे अपंग (कॅटेगरी A-५, B-१, C-१, D-१) साठी राखीव) ( Post Code BE००३ अ) १ पद (स्वायत्त संस्था PRL साठी)

पात्रता – B. E./ B. Tech. (कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग) सरासरी ६५ टक्के गुणांसह ( CGPA ६.०४/१०) उत्तीर्ण.

डिग्रीच्या अंतिम परीक्षेस २०२४-२५ मध्ये बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. निकाल दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावा लागेल.

वरील सर्व पदांसाठी संबंधित इंजिनीअरिंग पदवीबरोबर अलाईड इंजिनीअरिंग पदवीधारकसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत. ( ISRO च्या वेबसाइटवरील FAQ सेक्शनमध्ये अलाईड इंजिनीअरिंग पदवीची लिस्ट उपलब्ध आहे.)

वयोमर्यादा – (दि. १६ जून २०२५ रोजी) २८ वर्षे (अपंग/माजी सैनिक/शासकीय कर्मचारी यांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.)

वेतन – पे-मॅट्रिक्स लेव्हल-१० रु. ५६,१००/- अधिक इतर भत्ते अंदाजे वेतन दरमहा रु. १.१३ लाख.

अर्जाचे शुल्क – रु. ७५०/-. (अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख १८ जून २०२५ आहे.) (अर्जाचे शुल्क भरण्यासाठी लिंक ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर ISRO च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.) लेखी परीक्षेस बसलेल्या अजा/अज/माजी सैनिक/अपंग/महिला उमेदवारांना रु. ७५०/- परत केले जातील. इतर उमेदवारांना रु. ५००/- परत केले जातील. त्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सिस्टीम जनरेटेड ई-मेलद्वारे पेमेंटची पावती मिळाल्याची खात्री करून घेणे आवश्यक.

निवड पद्धती – लेखी परीक्षा अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, मुंबई, हैद्राबाद, नवी दिल्ली इ. ११ केंद्रांवर घेतली जाईल.

लेखी परीक्षा १२० मिनिटांसाठी एक पेपर ज्यात पार्ट-ए विषयाशी संबंधित ८० ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.

पार्ट-बी – अॅप्टिट्यूड/अॅबिलिटी टेस्ट ज्यात २० गुणांसाठी १५ टउद प्रश्न विचारले जातील. न्यूमरिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, Diagrammatic Reasoning, अॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग यावर आधारित. यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

पार्ट-सी – मुलाखत – मुलाखतीमधील गुणांची विभागणी (१) टेक्निकल नॉलेज – ४० गुण, (२) स्पेशलायझेशनशी संबंधित जनरल अवेअरनेस – २० गुण, (३) प्रेझेंटेशन/कम्युनिकेशन स्किल – २०, (४) कॉम्प्रिहेन्शन – १० गुण, (५) अॅकॅडेमिक अचिव्हमेंट्स – १० गुण, एकूण १०० गुण. लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित रिक्त पदांच्या ५ पट उमेदवार इंटरव्ह्यूकरिता निवडले जातील.

लेखी परीक्षेतील गुणांना ५०टक्के वेटेज व मुलाखतीमधील गुणांना ५०टक्के वेटेज देऊन अंतिम निवड यादी बनविली जाईल.

शंकासमाधानासाठी उमेदवारांनी ISRO च्या वेबसाइटवरील फ्रीक्वेंटली आस्क्ड् क्वेश्चन (FAQ) चे अवलोकन करावे. FAQ मध्ये उत्तर न मिळाल्यास rmt- icrb@isro.gov.in वर मेल पाठवावा.

लेखी परीक्षेनंतर ३ कामकाजाच्या दिवसांनंतर करफड च्या वेबसाइटवर उत्तरतालिका प्रसिद्ध केल्या जातील. ज्यावरील आक्षेप उमेदवारांना ५ दिवसांच्या आत लेखी परीक्षेनंतर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमधून घेता येतील.

ऑनलाइन अर्ज www.isro.gov.in या संकेतस्थळावर १६ जून २०२५ पर्यंत करावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237@gmail.com