सुहास पाटील
पनवेल महानगरपालिकेच्या (Panvel Corporation), आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’मधील रिक्त पदांची सरळसेवा प्रवेशाने भरती. (जाहिरात क्र. ०१/२०२३ दि. १२ जुलै २०२३)
एकूण रिक्त पदे – ३७७. (क) माळी, गट-ड – ८ पदे (अजा – १, विजा-अ – भज-क – १, इमाव – २, खुला – ३) (वेतन श्रेणी – एस -१ १५,००० – ४७,६००).
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला माळी व्यवसायाचा १ वर्षांचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. (१ पद दिव्यांग D/ HH साठी राखीव)
(कक) गट-क मधील पदे –
(१) उद्यान पर्यवेक्षक, गट-क – ४ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – १) (१ पद दिव्यांग D/ HH साठी राखीव).
पात्रता : बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स/ अॅग्रिकल्चर/ फॉरेस्ट्री/ वनस्पतीशास्त्र).
(२) वाहन चालक (हलके वाहन) – ९ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – २).
पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण, (२) हलके वाहन चालविण्याचा RTO वैध परवाना व बॅज, (३) वाहन चालविण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव, (४) वाहन दुरुस्ती देखभालीचे कामासंबंधी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र धारकास प्राधान्य.
(३) वाहन चालक (जड वाहन) – १० पदे (अजा – १, अज – १, भज-ब – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – ४).
पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण, (२) जड वाहन चालविण्याचा RTO वैध परवाना व बॅज, (३) परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव, (४) वाहन दुरुस्ती देखभालीचे कामासंबंधी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र धारकास प्राधान्य.
(४) लिपिक टंकलेखक – ११८ पदे (अजा – १३, अज – १२, विजा-अ – ४, भज-ब – ३, भज-क – ४, भज-ड – ३, इमाव – २५, विमाप्र – ३, आदुघ – १२, खुला – ३९) (५ पदे दिव्यांग B/ LV – १, D/ HH – १, OA/ BA/ OL – २ पदे, ASD/ ID/ MI – १ पद राखीव).
पात्रता : (१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, (२) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाचे ४० श.प्र.मि. वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र.
(५) कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) – ३ पदे (अजा – १, विजा-अ – १, खुला – १).
पात्रता : (१) वाणिज्य शाखेची पदवी, (२) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र.
(६) कनिष्ठ लिपिक (लेखा) – ५ पदे (अजा – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, खुला – १) (१ पद दिव्यांग LV साठी राखीव).
पात्रता : (१) वाणिज्य शाखेची पदवी, (२) मराठी टंकलेखनाचे ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाचे ४० श.प्र.मि. वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र.
(७) स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) – ८ पदे (अजा – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – २).
पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
(८) आरेखक (ड्राफ्ट्समन/ स्थापत्य/ तांत्रिक) (Draftsman Civil) – ३ पदे (अजा – १, विजा-अ – १, खुला – १).
पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समन (सिव्हील) ट्रेडमधील आयटीआय कोर्स.
(९) सव्र्हेअर/भूमापक (Surveyor)) – ४ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – १).
पात्रता : सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा १० वी उत्तीर्ण आणि सर्वेक्षक (Surveyor)) ट्रेडमधील आय्टीआय् कोर्स.
(१०) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Jr. Engineer (Civil) – १६ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ३, आदुघ – १, खुला – ६) (१ पद दिव्यांग SLD/ MI साठी राखीव).
(११) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ६ पदे (अजा – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, खुला – २).
(१२) कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) – ७ पदे (विजा-अ – १, भज-क – १, इमाव – २, खुला – ३).
(१३) कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर/ नेटवर्किंग) (कॉम्प्युटर/ आय्टी) – १ पद (खुला).
(१४) कनिष्ठ अभियंता (संगणक) – १ पद (खुला).
पात्रता : पद क्र. १० ते १४ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी उत्तीर्ण.
(१५) परिचारिका (ए.एन्.एम्.) – २५ पदे (अजा – ३, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ५, आदुघ – २, खुला – ९) (२ पदे दिव्यांग LV- १, SLD/ MI – १ साठी राखीव).
पात्रता : (१) १२ वी उत्तीर्ण, (२) अ. ठ.ट. अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, (३) महाराष्ट्र नर्सिग काऊन्सिलची वैध नोंदणी प्रमाणपत्र. (संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
(१६) अधिपरिचारिका (जी.एन.एम.) – ७ पदे (अजा – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग छश् साठी राखीव).
(१७) सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन.) (Public Health Nurse) – २ पदे (अजा – १, खुला – १).
पात्रता : (१) १२ वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिग काऊन्सिलची जनरल नर्सिग अॅण्ड मिडवायफरी पदविका (G.N.M.) उत्तीर्ण, (२) महाराष्ट्र नर्सिग काऊन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र, (३) परिचारिका म्हणून संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव. (बी.एस्सी. (नर्सिग) पदवीधारक उमेदवारास प्राधान्य)
(१८) चालक यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) (फायर सव्र्हिसेस) – ३१ पदे (अजा – ४, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ५, विमाप्र – १, आदुघ – ३, खुला – १२). वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
(१९) अग्निशामक (फायरमन) – ७२ पदे (अजा – ९, अज – ६, विजा-अ – २, भज-ब – ३, भज-क – २, भज-ड – १, इमाव – १४, विमाप्र – १, आदुघ – ७, खुला – २७) (अनाथ उमेदवारांसाठी १ पद राखीव).
१२ ते ३० दिवसांचा प्रशिक्षण प्रमाणपत्र असलेल्या माजी सैनिकांना नियुक्तीस पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात ६ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येईल.
(२०) प्रमुख अग्निशामक विमोचक (लिडींग फायरमन) – ८ पदे (अजा – १, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – २, खुला – ३). संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पात्रता : पद क्र. १८ ते २० साठी (१) १० वी उत्तीर्ण, (२) राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
(२१) उप अग्निशमन केंद्र अधिकारी (सेमी फायर स्टेशन ऑफिसर) – ४ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – १).
पात्रता : (१) पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), (२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचेकडील स्टेशन ऑफिसर व इन्स्ट्रक्टर पाठय़क्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका) उत्तीर्ण किंवा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठय़क्रम उत्तीर्ण, (३) संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
शारीरिक पात्रता : पद क्र. १८ ते २१ साठी उंची – पुरुष – १६५ सें.मी.; महिला – १५७ सें.मी. छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी. वजन – पुरुष – ५० कि.ग्रॅ.; महिला – ४६ कि.ग्रॅ. दृष्टी – चांगली विना चष्म्याने ६/६ आणि गट-क मधील, गट-ब मधील व गट-अ मधील इतर पदे कृपया www. panvelcorporation. com या वेबसाईटवरील जाहिरात अर्ज करण्यापूर्वी नीट वाचून उमेदवारांनी आपली पात्रता तपासून पहावी.
वयोमर्यादा : दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि उपअग्निशमन केंद्र अधिकारी – ४० वर्षेपर्यंत. प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक व चालक यंत्र चालक – ३० वर्षे; इतर पदांसाठी – १८ ते ४० वर्षे; अमागास (खुला) – १८-४५ वर्षे; मागासवर्गीय/ अनाथ/ खेळाडू – ४५ वर्षे; दिव्यांग/ माजी सैनिक – ४७ वर्षे.
निवड पद्धती : वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी (KYC vertification) मुलाखत घेतली जाईल. अग्निशमन सेवेतील पदांकरिता ऑनलाइन परीक्षेकरिता १०० गुण व मैदानी क्षमता चाचणी परीक्षेकरिता १०० गुण अशी एकूण २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा असेल. इतर सर्व पदांसाठी २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा असेल.परीक्षा शुल्क : गट-अ व गट-ब पदांसाठी खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, मागासप्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – रु. ९००/-; गट-क पदांसाठी खुला प्रवर्ग – रु. ८००/-, मागासप्रवर्ग/अनाथ – रु. ७००/-; गट-ड पदांसाठी खुला प्रवर्ग – रु. ६००/-; मागासप्रवर्ग/अनाथ – रु. ५००/-. परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – परीक्षेच्या ७ दिवस आधी ऑनलाइन परीक्षेचा दिनांक पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल www. panvelcorporation. comऑनलाइन अर्ज ६६६. www. panvelcorporation. com तसेच https:// mahadma. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. १७.०८.२०२३ (रात्री ११.५५ वाजे)पर्यंत करावेत.
इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) आपल्या ११ सहयोगी बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या सन २०२४-२५ करिता भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP PO/ MT- XIII) अंतर्गत ऑनलाइन एक्झामिनेशन (प्रीलिमिनरी/मेन्स) सप्टेंबर/ ऑक्टोबर/ नोव्हेंबर, २०२३ मध्ये घेणार आहे.
११ सहयोगी बँकांमधून ५ बँकांमधील एकूण रिक्त पदे ३,०४९. (अजा – ४६२, अज – २३४, इमाव – ८२९, ईडब्ल्यूएस् – ३००, खुला – १२२४) (दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण १४३ पदे राखीव – (एचआय – ४४, ओसी – ३०, व्हीआय – ३१, आयडी – ३८).रिक्त पदांचा तपशील : बँक ऑफ इंडिया – २२४ पदे, पंजाब अॅण्ड सिंध बँक – १२५ पदे, कॅनरा बँक – ५०० पदे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया – २००० पदे, पंजाब नॅशनल बँक – २०० पदे. (बँक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसिज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, यूको बँक यांनी रिक्त पदे कळविली नाहीत.) पात्रता : (दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी २० ते ३० वर्षे (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४० वर्षेपर्यंत). निवड पद्धती : कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस – ऑनलाईन एक्झामिनेशन्स – प्रीलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू. (अ) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन – १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे (इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – ३५ प्रश्न, रिझिनग अॅबिलिटी – ३५ प्रश्न, वेळ प्रत्येकी २० मिनिटे) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची.
(ब) मेन एक्झामिनेशन – (i) ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न एकूण १५५, गुण २००, वेळ ३ तास. (१) रिझिनग अॅण्ड कॉम्प्युटर अॅप्टिटय़ूड – ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटे; (२) जनरल/ इकॉनॉमि/ बँकिंग अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; (३) इंग्लिश लँग्वेज – ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटे; (४) डेटा अॅनालिसिस अॅण्ड इंटरप्रिटेशन – ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. (ii) डिस्क्रीप्टिव्ह टाईप – इंग्लिश लँग्वेज (लेटर अॅण्ड एस्से रायटिंग) २ प्रश्न, २५ गुण, वेळ ३० मिनिटे.
ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील.
(क) इंटरव्ह्यू – ऑनलाइन मेन एक्झाममधून निवडलेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र : प्रीलिमिनरी एक्झाम – अहमदनगर, अकोला, आंबेजोगाई, अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे, नागपूर, नांदेड, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, गोवा – पणजी, मडगाव, मापुसा.
मेन एक्झामकरिता – औरंगाबाद, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे, नागपूर, पुणे, गोवा-पणजी.अर्जाचे शुल्क : अजा/ अज/ अपंग यांचेसाठी रु. १७५/-, इतरांसाठी रु. ८५०/-.प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग (PET) – अजा/ अज/ इमाव/ अल्पसंख्यांक उमेदवारांना नोडल बँकांमार्फत विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण (परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी) मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर दिले जाईल. अर्ज भरताना उमेदवारांनी तसे नमूद करावे. प्रवास खर्च, राहण्या/ खाण्याचा खर्च उमेदवारांना स्वत: करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी फोटोग्राफ (४.५ बाय ३.५ सें.मी. आकाराचा), सिग्नेचर, डावा अंगठा निशाणी आणि स्वहस्ते लिहिलेले सेल्फ डिक्लेरेशन) आणि para J(ix) मध्ये नमूद केलेली प्रमाणपत्रे (Annexure- III मध्ये दिल्याप्रमाणे) योग्य प्रकारे स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक.
पूर्व परीक्षेसाठीचे कॉल लेटर्स परीक्षेच्या ठिकाणी गोळा केले जाणार नाहीत. परंतु ते परीक्षा केंद्रावरील स्टाफ विधीवत प्रमाणित करून (duly authenticated/ stamped) परत देतील. जे ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या वेळी मुख्य परीक्षेसाठीच्या कॉल लेटरसोबत सादर करणे आवश्यक आहे. कॉल लेटरवर चिकटविलेल्या फोटोग्राफसारखा आणखी एक फोटोग्राफ उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर घेवून जाणे आवश्यक आहे.ऑनलाइन अर्ज www. ibps. in या संकेतस्थळावर दि. २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत करावेत (Home Page – CRP PO/ MT/ Click here to apply online for CRP PO/ MT- XIII) शंकासमाधानासाठी https:// cgrs. ibps. in/ या वेबसाईटवर संपर्क करा.