सुहास पाटील
इंडियन नेव्हीमध्ये विविध एन्ट्रीज ( JAN २०२५ ( ST-२५)) कोर्सकरिता ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स’ पदांची भरती. इंडियन नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला, केरळ येथे जानेवारी, २०२५ पासून सुरू होणाऱ्या एक्झिक्युटिव्ह/एज्युकेशन/ टेक्निकल ब्रँचेसमधील पुढील कोर्सेसकरिता प्रवेश. ब्रँचनुसार रिक्त पदांचा तपशिल –
(I) एक्झिक्युटिव्ह ब्रँच – १३६ पदे.
(ए) जनरल सर्व्हिस (एक्झिक्युटिव्ह) [ GS( X)] – ५० पदे (पुरुष/महिला) (महिलांसाठी जास्तीत जास्त १५ पदे).
पात्रता – बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(बी) एअर ट्रफिक कंट्रोलर ( ATC) – ८ पदे (पुरुष/महिला).
(सी) नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (NAOO) – १८ पदे (पुरुष/महिला) (महिलांसाठी जास्तीत जास्त ५ पदे).
(डी) पायलट – २० पदे (पुरुष/महिला) (महिलांसाठी जास्तीत जास्त ६ पदे).
पात्रता – पद क्र. बी ते डी साठी बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के सरासरी गुणांसह उत्तीर्ण . (१० वी आणि १२ वीला किमान सरासरी ६० टक्के गुण व इंग्रजी विषयात १० वी किंवा १२ वीला किमान ६०टक्के गुण आवश्यक.)
(ई) लॉजिस्टिक्स – ३० पदे (पुरुष/महिला) (महिलांसाठी जास्तीत जास्त ९ पदे).
पात्रता – फर्स्ट क्लास बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) किंवा फर्स्ट क्लास एम.बी.ए. किंवा फर्स्ट क्लास बी.एस्सी./बी.कॉम./ बी.एस्सी. (आयटी) आणि फिनान्स/ लॉजिस्टिक्स/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट इ. मधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा फर्स्ट क्लास एमसीए/एम.एस्सी. (आयटी).
(१० वी आणि १२ वीला किमान सरासरी ६० टक्के गुण व इंग्रजी विषयात १० वी किंवा १२ वीला किमान ६० टक्के गुण आवश्यक.)
(एफ) नेव्हल नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टर कॅडर ( NAIC) – १० पदे (पुरुष/महिला).
पात्रता – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इनस्ट्रूमेंटेशन/ आयटी/कॉम्प्युटर सायन्स/ मेटॅलर्जी/ केमिकल/ एअरोस्पेस/ एअरोनॉटिकल इ. इंजिनीअरिंग पदवी सरासरी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स/ फिजिक्स) किमान सरासरी ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण. (१० वी/१२ वी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि १० वी किंवा १२ वीला इंग्रजी विषयात किमान ६० टक्के गुण.)
( II) एज्युकेशन ब्रँच – १८ पदे (पुरुष/महिला).
(एफ) एज्युकेशन –
( i) फर्स्ट क्लास एम.एस्सी. (मॅथ्स/ ऑपरेशनल रिसर्च) (बी.एस्सी.ला फिजिक्स विषय अभ्यासलेला असावा.) ( ii) ६० टक्के गुणांसह एम.एस्सी. (फिजिक्स/ अॅप्लाईड फिजिक्स) (बी.एस्सी.ला मॅथ्स विषय अभ्यासलेला असावा.) ( iii) ६० टक्के गुणांसह एम.एस्सी. केमिस्ट्री (बी.एस्सी. फिजिक्स विषयासह)
( i) ते ( iii) साठी एकूण रिक्त पदे – ६
( iv) ६० टक्के गुणांसह बी.ई./बी.टेक. (मेकॅनिकल इंजिनीअरिंग)
( v) (६०टक्के गुणांसह) बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)
( vi) ६० टक्के गुणांसह एम. टेक.
(ए) थर्मल/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग/मशिन डिझाईन
(बी) कम्युनिकेशन सिस्टीम इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ VLSI/पॉवर सिस्टीम इंजिनीअरिंग – १ पद.
( iv) ते ( vi) साठी एकूण रिक्त पदे – १२.
एज्युकेशन ब्रँच पद क्र. ( i) ते ( vi) साठी १० वी आणि १२ वी सरासरी किमान ६० टक्के गुणांसह व इंग्रजी विषयात १० वी किंवा १२ वी ६० टक्के गुण असणे आवश्यक.
( III) टेक्निकल ब्रँच – १०० पदे (पुरुष/महिला)
(जी) इंजिनीअरिंग ब्रँच (जनरल सर्व्हिस) (GS) – ३० पदे (पुरुष/महिला) (महिलांकरिता जास्तीत जास्त ९ पदे).
पात्रता – ६० टक्के गुणांसह बी.ई./बी.टेक. (एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस/ऑटोमोबाईल/ कंट्रोल इंजिनीअरिंग/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट/इन्स्ट्रूमेंटेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अॅण्ड कंट्रोल/ मेकॅनिकल/ मरिन/ मेकॅट्रॉनिक्स/मेटॅलर्जी/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग).
(एच) इलेक्ट्रिकल ब्रँच (जनरल सर्व्हिस) (GS) – ५० पदे (पुरुष/महिला) (महिलांकरिता जास्तीत जास्त १५ पदे).
पात्रता – ६० टक्के गुणांसह बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन / अॅप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रूमेंटेशन/ अॅप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रूमेंटेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अॅण्ड कंट्रोल/पॉवर इंजिनीअरिंग/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स).
(जे) नेव्हल कन्स्ट्रक्टर – २० पदे (पुरुष/ महिला).
पात्रता – ६० टक्के गुणांसह बी.ई./बी.टेक. (मेकॅनिकल/ मेकॅनिकल ऑटोमेशनसह/ सिव्हील/ एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस/ मेटॅलर्जी/ नेव्हल आर्किटेक्चर/ ओशन इंजिनीअरिंग/ मरिन इंजिनीअरिंग/ शिप टेक्नॉलॉजी/ शिप बिल्डींग/ शिप डिझाईन).
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म (एम.टेक. पात्रता धारक वगळता) पद क्र. ए, ई, एफ, जी, एच, जे आणि के साठी २ जानेवारी २००० ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.
( iii) एज्युकेशन ब्रँच एम.टेक. पात्रताधारक उमेदवारांसाठी २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००४ दरम्यानचा असावा.
( iv) NAOO/पायलट कॅडरसाठी २ जानेवारी २००१ ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा.
( v) पद क्र. बी, एफ ( i), ( ii), ( iii) साठी २ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ दरम्यानचा असावा.
( vi) एक्झिक्युटिव्ह ब्रँच (जनरल सर्व्हिस व टेक्निकल ब्रँच (इंजिनीअरिंग)) पदांसाठी – मिनिस्ट्री ऑफ शिपिंग अॅण्ड ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी स्टीमरशिप/ फर्स्ट क्लास इंजिनीअर सर्टिफिकेट असलेले मर्चंट नेव्ही पर्सोनेल यांचेसाठी २ जानेवारी १९९५ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.
( vii) पायलट पदांसाठी कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) धारक असल्यास २ जानेवारी २००० ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा. ‘एसएसबी इंटरह्यूकरिता उमेदवार शॉर्ट लिस्ट करताना किमान बी-ग्रेडसह NCC सी सर्टिफिकेट (जे १ जानेवारी २०२२ किंवा त्यानंतर जारी केलेले असेल) धारकांना ५ टक्के गुणांची सवलत दिली जाईल. (किमान पात्रतेची अट पूर्ण करणे आवश्यक.) उमेदवारांनी NCC च्या सिनिअर डिव्हीजनमध्ये किमान २ वर्षांची सेवा दिलेली असावी.
‘पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्यांना INA जॉईन करण्यापूर्वी (२० डिसेंबर २०२४) किमान पात्रतेसह आवश्यक शैक्षणिक अर्हतेचा पुरावा सादर करावा लागेल. (officer@navy. gov. in या ई-मेलवर)
शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.
वजन – उंची आणि वय यांचे प्रमाणात (महिला १५२ सें.मी. उंचीसाठी – ४३-५३ कि.ग्रॅ.; पुरुष – १५७ सें.मी. उंचीसाठी – ४६-५७ कि.ग्रॅ.)
निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील नॉर्मलाईज्ड केलेल्या गुणवत्तेनुसार आणि बी.ई./बी.टेक. पात्रता परीक्षेच्या प्री-फायनल वर्षीच्या गुणवत्तेनुसार एसएसबी इंटरह्यूकरिता शॉर्टलिस्ट केले जातील. एसएसबी इंटरह्यूनंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल. संबंधित कोर्सकरिता उमेदवार एसएसबीमधील गुणवत्तेनुसार निवडले जातील.
ट्रेनिंग – मर्चंट नेव्ही उमेदवार वगळता इतरांना सबलेफ्टनंट रँकवर ट्रेनिंग दिले जाईल. मर्चंट नेव्ही उमेदवारांना अॅक्टींग लेफ्टनंट रँकवर ट्रेनिंग दिले जाईल.
वेतन – सब-लेफ्टनंट पदासाठी मूळ वेतन रु. ५६,१००/- इतर भत्ते.
प्रोबेशन कालावधी – SSC NAIC ऑफिसर्ससाठी ३ वर्षांचा आणि इतर ऑफिसर्स पदांसाठी २ वर्षांचा असेल.
नेमणुकीचा कालावधी – सुरुवातीला निवडलेल्या उमेदवारांना १० वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल. जो उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित आणखी २ अधिक २ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. सर्व पदांसाठी फक्त अविवाहीत पुरुष/महिला पात्र आहेत.
ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर दि. १० मार्च २०२४ पर्यंत करावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.