सुहास पाटील
कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिझाईन्स अॅण्ड ट्रेड मार्क्स ( CGPDTM)) मुख्यालय, मुंबई (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटर्नल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, भारत सरकार). ‘एक्झामिनर ऑफ पेटंट अॅण्ड डिझाईन ग्रुप-ए (गॅझेटेड)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ५५३. (Advt. No. QCI/ CGPDTM /००१/२०२३)
वेतन श्रेणी – पे-लेव्हल – १० (रु. ५६,१०० – १,७७,५००) अंदाजे वेतन दरमहा रु. १.०५ लाख.
रिक्त पदांचा डिसिप्लिननुसार आणि कॅटेगरीनुसार तपशील –
(१) बायो-टेक्नॉलॉजी – ५० पदे
(अजा – ७, अज – ३, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २१).
पात्रता – बायो टेक्नॉलॉजी/ मायक्रो बायोलॉजी/ मॉलिक्युलर बायोलॉजी/ बायो फिजिक्स विषयातील किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी.
(२) बायो-केमिस्ट्री – २० पदे
(अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९).
पात्रता – बायो-केमिस्ट्री विषयातील किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी.
(३) फूड टेक्नॉलॉजी – १५ पदे
(अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).
पात्रता – फूड टेक्नॉलॉजी/ इंजीनिअरींग किंवा समतुल्य पदवी.
(४) केमिस्ट्री – ५६ पदे
(अजा – ८, अज – ३, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २४).
पात्रता – M. Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल टेक्नॉलॉजी/ इंजीनिअरींग किंवा समतूल्य पदवी.
(५) पॉलिमर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी – ९ पदे (अजा – १,
इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता – पॉलिमर सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पॉलिमर टेक्नॉलॉजी/इंजीनिअरींग पदवी किंवा समतूल्य.
(६) बायो-मेडिकल इंजिनिअरींग – ५३ पदे (अजा – ८, अज – ३, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २२).
पात्रता – बायो-मेडिकल टेक्नॉलॉजी/ इंजीनिअरींग पदवी किंवा समतुल्य.
(७) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन – १०८ पदे (अजा – १५, अज – ६, इमाव – ३०, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ४६).
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी/ इंजीनिअरींग पदवी किंवा समतूल्य.
(८) इलेक्ट्रिकल इंजीनिअरींग – २९ पदे (अजा – ४, अज – १, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३).
पात्रता – इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी/ इंजीनिअरींग पदवी किंवा समतुल्य.
(९) कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड आयटी – ६३ पदे (अजा – ९, अज – ३, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २८).
पात्रता – M. Sc (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा E./ B. Tech . (कॉम्प्युटर सायन्स/आयटी).
(१०) फिजिक्स – ३० पदे
(अजा – ४, अज – १, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १४).
पात्रता – M. Sc. (फिजिक्स).
(११) सिव्हील इंजीनिअरींग – ९ पदे (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
(१२) मेकॅनिकल इंजीनिअरींग – ९९ पदे (अजा – १४, अज – ५, इमाव – २७, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४३).
(१३) मेटॅलर्जिकल इंजीनिअरींग –
४ पदे (इमाव – १, खुला – ३).
(१४) टेक्स्टाईल इंजिनिअरींग –
८ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पद क्र. ११ ते १४ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजीनिअरींग/ टेक्नॉलॉजी पदवी किंवा समतूल्य.
एकूण ५५३ पदांपैकी ३३ पदे दिव्यांग कॅटेगरी LD – ७, इ/ B/ VH- १०, HH – ९, MD – ७ साठी राखीव.
वयोमर्यादा – दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी २१ ते ३५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज/ केंद्र सरकारी कर्मचारी – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).
निवड पद्धती –
(१) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन – ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप – १५० MCQ प्रश्न, वेळ २ तास. यातून रिक्त पदांच्या २० पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील.
(२) मुख्य परीक्षा – ऑफलाईन मोडने पेपर-१ – १०० गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप टउद प्रत्येकी १ गुणासाठी आणि पेपर-२ (डिस्क्रिप्टिव्ह टाईप) ३०० गुणांसाठी वेळ ३ तास. मुख्य परीक्षा पेपर-२ चा अभ्यासक्रम जाहिरातीतील Annexure मध्ये उपलब्ध आहे. यातून रिक्त पदांच्या
५ पट उमेदवार इंटरह्यूकरिता निवडले जातील.
(३) इंटरह्यू – प्रीलिमिनरी आणिमुख्य परीक्षेतील टॉपिक्सवर आधारित इंटरह्यू १०० गुणांसाठी/ प्रीलिमिनरी/ मुख्य परीक्षा/ इंटरह्यूसाठी फक्त इंग्रजी माध्यम असेल.
अंतिम निवड यादी बनविताना मुख्य परीक्षेतील पेपर-१ व पेपर-२ मधील गुणांना ८० टक्के वेटेज आणि इंटरह्यूकरिता २० टक्के वेटेज देवून बनविली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना त्यांची गुणवत्ता व त्यांनी दिलेला पदांचा पसंतीक्रम पाहून त्यांना नियुक्ती दिली जाईल.
परीक्षा शुल्क – खुला गट आणि इमाव उमेदवारांसाठी रु. १,०००/-.
इतर उमेदवारांसाठी रु. ५००/-.
प्रीलिमिनरी परीक्षेचे ई-अॅडमिट कार्ड
दि. १४ ऑगस्ट २०२३ पासून जारी केले जातील.
प्रीलिमिनरी परीक्षा दि. ३ सप्टेंबर २०२३.
प्रीलिमिनरी परीक्षेचा निकाल
दि. १३ सप्टेंबर २०२३.
मुख्य परीक्षेसाठी ई-अॅडमिट कार्ड
दि. १८ सप्टेंबर २०२३ पासून जारी केले जातील.
मुख्य परीक्षा दि. १ ऑक्टोबर २०२३.
मुख्य परीक्षेचा निकाल दि. १६ ऑक्टोबर २०२३.
इंटरह्यूकरिता ई-अॅडमिट कार्ड २२ ऑक्टोबर २०२३ पासून जारी केले जातील.
इंटरह्यू दि. ११ आणि १२ नोव्हेंबर २०२३.
निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी
दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
ऑनलाइन अर्ज www. qcin. Org या संकेतस्थळावर दि. ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत करावेत.