● १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहीत पुरुषांना इंजिनिअर होऊन पर्मनंट कमिशन मिळविण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जुलै, २०२६ पासून सुरू होणाऱ्या १० + २ Technical Entry Scheme (TES) – ५५’ कोर्ससाठी जेईई मेन्स २०२५ च्या स्कोअरवर आधारित प्रवेश. प्रवेश क्षमता – ९०.

पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांत (पीसीएम) किमान सरासरी ६०टक्के गुण आवश्यक आणि जेईई मेन्स २०२५ परीक्षेस बसलेले असावेत.

वयोमर्यादा – १६ १/२ ते १९ १/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००७ ते १ जानेवारी २०१० दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.

उंची – किमान १५७ सें.मी. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात. छाती – ८१-८६ सें.मी.

निवड पद्धती – जेईई मेन्स २०२५ मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रयागराज (उत्तर प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), बंगलोर (कर्नाटक), जालंदर (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एसएसबी इंटरव्ह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. फेब्रुवारी/मार्च, २०२६ मध्ये एस्एस्बी इंटरव्ह्यू दोन टप्प्यात घेतला जाईल. (कालावधी ५ दिवस) फेज-१ मधून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठविले जाईल. एसएसबी इंटरव्ह्यूमधील कामगिरीवर गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड वैद्याकिय तपासणी नंतर केली जाते.

हेही वाचा

ज्या उमेदवारांना एसएसबी साठी निवडले आहे, त्यांनी संबंधित कॅडेट्स ट्रेनिंग विंग्सच्या ३ नावांना पसंतीक्रम द्यावा लागेल. (कॅडेट्स ट्रेनिंग विंग – CTW, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग – CME, पुणे; CTW, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग – MCTE, Mhow आणि CTW- मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग MCEME, सिकंदराबाद)

खालील CTWs मध्ये पुढील स्ट्रीममधील इंजिनीअरिंग ट्रेनिंग देतात.

(१) CTW, CME, पुणे ( Corps of Engineering) – सिव्हील अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग

(२) CTW, MCTE Mhow ( Corps of Signals) – आयटी अँड टेलिकॉम इंजिनीअरिंग

(३) CTW, MCEME, सिकंदराबाद ( Corps of Electronics Mechanical Engineers) – इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग

ट्रेनिंग – एकूण ४ वर्षं कालावधीसाठी ट्रेनिंग दिले जाईल.

शंकासमाधानासाठी Rtg वेबसाईट www.joinindianarmy.nic.in वर उमेदवारांना Feedback/ Queries Option वापरता येईल. ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १३ नोव्हेंबर २०२५ (१२.०० वाजे) पर्यंत करावेत.