सुहास पाटील

ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवून संशोधन करण्यासाठी दरमहा रु. ४७,०००/- ची स्टायपेंड मिळवून  Ph.D. करावयाची आहे किंवा असिस्टंट प्रोफेसर व्हावयाचे आहे? भारतीय विद्यापीठ आणि कॉलेजेसमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर’ पद भरतीकरिता पात्रता निश्चित करण्यासाठी ८३ विषयांमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC )- नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ( NET December 2023) परीक्षा नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे.  UGC- NET परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाते. (जून आणि डिसेंबर)

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Educational Opportunity Admission to Doctorate of Philosophy
शिक्षणाची संधी: डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी करण्यासाठी प्रवेश
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

पात्रता : ह्युमॅनिटिज आणि सोशल सायन्स (लँग्वेजेससह), कॉम्प्युटर सायन्स आणि अ‍ॅप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स इ. (Appendix- V मध्ये नमूद केलेल्या) विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ तृतीय पंथी उमेदवारांना ५० टक्के गुण आवश्यक) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार  NET  NET परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना NET  2023 चा निकाल जाहीर होणाऱ्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत पात्रता परीक्षा आवश्यक त्या गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक. उमेदवारांनी ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या विषयासाठीची  NET परीक्षा लिहिणे आवश्यक. जर पदव्युत्तर पदवीचा विषय  NET विषयांच्या यादीत (Appendix- V) नसल्यास त्या विषयाशी संबंधित विषय  NET परीक्षेसाठी निवडावा.

वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ३० वर्षेपर्यंत. (इमाव (केंद्रीय यादीत असलेल्या जातींसाठी)/ अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीय पंथी आणि महिला उमेदवारांसाठी – ३५ वर्षेपर्यंत)

असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी – कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.

आरक्षण : १५ टक्के जागा अजासाठी, ७५ टक्के जागा अजसाठी, २७ टक्के जागा इमावसाठी, १० टक्के जागा जनरल इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स (General EWS) साठी, ५ टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

परीक्षा पद्धती : लेखी परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न – दोन पेपर्स. पेपर-१ – ५० प्रश्न, १०० गुण (टिचिंग/रिसर्च अ‍ॅप्टिटय़ूड जाणून घेण्यासाठी टेस्ट ऑफ रिझिनग अ‍ॅबिलिटी, रििडग, कॉम्प्रिहेन्शन, डायव्‍‌र्हजट थिंकिंग आणि जनरल अवेअरनेस विषयांवर आधारित). पेपर-२ – १०० प्रश्न, २०० गुण निवडलेल्या विषयावर आधारित डोमेन नॉलेज तपासण्यासाठी.

परीक्षेचा कालावधी ३ तास, १८० मिनिटे. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.  UGC NET Dec.  2023 साठीची विषयांची यादी (Appendix- II) आणि त्यांचे कोड नंबर जाहिरातीच्या   Appendix- IV मध्ये उपलब्ध आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम   https:// www. ugcnetonline. in/ syllabus. new. Php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदूी असेल. (भाषा (लँग्वेजेस वगळता))

ऑनलाइन अर्जात निवडलेल्या माध्यमातूनच प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

‘असिस्टंट प्रोफेसर’ किंवा ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी पात्रता उमेदवारांच्या  वॅउ NET परीक्षेतील दोन्ही पेपर्समधील सरासरी गुणवत्तेवर आधारित निश्चित केली जाईल.

जे उमेदवार फक्त ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरलेले आहेत, त्यांना  JRF पुरस्कारासाठी ( award) विचारात घेतले जाणार नाहीत.

जे उमेदवार  JRF पुरस्कारासाठी पात्र ठरतील त्यांना त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात किंवा संबंधित विषयात रिसर्च संशोधन करता येईल. तसेच ते ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरतील.

परीक्षा केंद्र : उमेदवारांनी आपल्या पसंतीची ४ परीक्षा केंद्रे निवडावीत (Appendix- III) मध्ये सिटी कोड नंबर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा यवतमाळ.

परीक्षा शुल्क :  खुला प्रवर्ग – रु. १,१५०/-; जनरल ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. ६००/-; अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीय पंथी – रु. ३७५/-. परीक्षा शुल्क दि. २९ ऑक्टोबर २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत भरता येईल.

पीएच.डी. फेलोशिप स्टायपेंड  JRF साठी (३७,०००+२७ टक्के एचआरए) रु. ४६,९९०/- दरमहा २ वर्षांनंतर  रफा साठी (रु. ४२,०००/- +२७ टक्के एचआरए) रु. ५३,३४०/- दरमहा दिले जाते.

UGC- NET 2023परीक्षा ६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान घेतली जाईल. NAT वेबसाईटवरून अ‍ॅडमिट कार्ड डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवडय़ापासून डाऊनलोड करता येतील.

ऑनलाइन फॉर्ममध्ये काही सुधारणा/ बदल करावयाच्या असल्यास दि. ३०/३१ ऑक्टोबर २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत करेक्शन विंडो उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज   https:// ugcnet. nta. ac. in/;  या संकेतस्थळावर दि. २८ ऑक्टोबर २०२३ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत. ( Registration-;  Application Form-;  Payment of Fees)