(१) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) जनरल – ८३ पदे. (अजा – १५, अज – ६, इमाव – १९, ईडब्ल्यूएस् – ८, खुला – ३५) (११ पदे अपंग (डी-एच्एच् – ६(५); एल्डी – १; Au, ID, SLD, MI – ४(३) उमेदवारांसाठी राखीव). कंसात दिलेली पदे बॅकलॉगमधील आहेत.
पात्रता – ( १ सप्टेंबर २०२५ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग – ५० टक्के गुण) किंवा पदव्युत्तर पदवी/समतूल्य टेक्निकल पात्रता परीक्षा किमान सरासरी ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग – उमेदवारांना गुणांची अट नाही).
(२) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च (DEPR) – १७ पदे. (अजा – ४, अज – ४(४), इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६) (५ पदे अपंग कॅटेगरी B/LV – १, LD – १(१); Au, ID, SLD, MI – ३(३) साठी राखीव) कंसात दिलेली पदे बॅकलॉगमधील आहेत.
पात्रता – (ए) इकॉनॉमिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी (जसे की क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स/मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/अॅप्लाईड इकॉनॉमिक्स/फिनान्शियल इकॉनॉमिक्स/बिझनेस इकॉनॉमिक्स/अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स /इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स/इकॉनोमॅट्रिक्स) किंवा (बी) फिनान्स विषयातील पदव्युत्तर पदवी (जसे की क्वांटिटेटिव्ह फिनान्स/मॅथेमॅटिकल फिनान्स/क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स/इंटरनॅशनल फिनान्स/बिझनेस फिनान्स/बँकिंग अँड ट्रेड फिनान्स/इंटरनॅशनल अँड ट्रेड फिनान्स/प्रोजेक्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फिनान्स/ॲग्री बिझनेस फिनान्स) वरील ए व बी परीक्षा किमान सरासरी ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि अजा/अज/अपंग उमेदवारांना किमान ५०टक्के.
इष्ट पात्रता – इकॉनॉमिक्समधील डॉक्टरेट पदवी किंवा रिसर्च/टिचींगचा अनुभव.
(३) ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉरमेशन मॅनेजमेंट (DSIM) – २० पदे. (अजा – २(२), अज – ४(४), इमाव – ३, ईडब्ल्यूएस् – १, खुला – १०) (३ पदे अपंग कॅटेगरी B/LV – २(२); D/HH – १ साठी राखीव). कंसात दिलेली पदे बॅकलॉगमधील आहेत.
पात्रता – (ए) स्टॅटिस्टिक्स/मॅथेमॅटिक्स/अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स/क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स/मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/इकॉनोमॅट्रिक्स/ इन्फॉरमॅटिक्स इ. विषयातील पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण
किंवा (बी) डेटा सायन्स/AI/ML/बिग डेटा अॅनालायटिक्स इ. किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी सरासरी ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण
किंवा (सी) डेटा सायन्स/AI/ML/Big Data Analytics स्टॅटस्टिक्स/ॲप्लाईड स्टॅटिस्टिक्स/क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स/ इकॉनोमॅट्रिक्स/इन्फॉरमेट्रिक्स इ. मधील ४ वर्षं कालावधीची पदवी किमान सरासरी ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण
इष्ट पात्रता – संबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा रिसर्च/टिचिंगमधील अनुभव.
(ए ते सी साठी अजा/अज/अपंग उमेदवारांना पात्रता परीक्षेत किमान सरासरी ५०टक्के गुण)
वयोमर्यादा – ( १ सप्टेंबर २०२५ रोजी) २१ ते ३० वर्षेपर्यंत. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; (अपंग – खुला – १० वर्षे; इमाव – १३ वर्षे; अजा/अज – १५ वर्षे); एम.फिल. पात्रताधारकांसाठी २ वर्षे व पीएचडी पात्रताधारकांसाठी ४ वर्षे.
वेतन – बेसिक पे रु. ७८,४५/- अधिक इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा (एचआरएशिवाय) रु. १,५०,३७४/- (घरभाडे भत्त्याशिवाय) (अकोमोडेशन न घेतल्यास बेसिक पेच्या १५ टक्के घरभाडे भत्ता दिला जाईल.)
निवड पद्धती – सर्व पदांसाठी निवड ऑनलाइन परीक्षा फेज-१ आणि फेज-२ व इंटरव्ह्यू घेवून केली जाईल.
ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) (DEPR) व ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर) (DSIM) पदांसाठी फेज-१ – पेपर-१ ऑनलाईन परीक्षा दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतली जाईल व फेज-२ (पेपर-२ आणि पेपर-३ ऑनलाइन/लेखी परीक्षा) दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी घेतली जाईल. (अभ्यासक्रम आणि निवड पद्धती RBI च्या जाहिरातीमधील Appendix-III मध्ये उपलब्ध आहे.)
फेज-I व फेज-II (DEPR/DSIM) साठी परीक्षा केंद्र – मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे इ.
अर्जाचे शुल्क इंटिमेशन चार्जेससह – रु. ८५०/- (अजा/अज/अपंग यांना फक्त इंटिमेशन चार्जेस रु. १००/- भरावे लागतील.) १८टक्के जीएस्टी भरावा लागेल.
शंकासमाधानासाठी http://cgrs.ibps.in या लिंकवर संपर्क साधावा.
प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग – RBI ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर्) जनरल पदांसाठीच्या अजा/अज/इमाव/अपंग उमेदवारांकरिता विनामूल्य ऑनलाइन प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग फेज-१ व फेज-२ परीक्षांसाठी घेणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ट्रेनिंग प्रोग्रामसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तसे नमूद करणे आवश्यक. तसेच उमेदवारांनी आपल्या सोयीचे सेंटर निवडून वेबसाईटवर Appendix-V मध्ये उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून ई-मेल पुढील पत्त्यावर दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावा.
(i) नवी मुंबई रिजनल सेंटरसाठी cgmbelapur@rbi.org.in
(ii) नागपूर रिजनल सेंटरसाठी rdnagpur@rbi.org.in
(iii) पुणे रिजनल सेंटरसाठी principalcab@rbi.org.in
(iv) पणजी रिजनल सेंटरसाठी gmincpanaji@rbi.org.in
ऑनलाइन अर्ज http://www.rbi.org.in या संकेतस्थळावरून दि. ३० सप्टेंबर २०२५ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.
ऑनलाइन अर्ज कसा करावा याच्या सूचना संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Appendix-I मध्ये दिलेल्या आहेत.
उमेदवार ऑफिसर्स ग्रेड-बी (DR) जनरल आणि ऑफिसर ग्रेड-बी (DR)-DEPR/ऑफिसर ग्रेड-बी (DISM) साठी दोन वेगवेगळे अर्ज करू शकतात.