सुहास पाटील
१) इंडियन आर्मी, इंडियन मिलिटरी ॲकॅडमी ( IMA), डेहराडून येथे जानेवारी, २०२५ पासून सुरू होणाऱ्या इंडियन आर्मीमध्ये परमनंट कमिशन मिळवून देणाऱ्या ‘१४० वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC)’ साठी इंजिनीअरिंग पदवीधर अविवाहित पुरुष उमेदवारांना प्रवेश. इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार एकुण ३० रिक्त पदांचा तपशील –
(१) सिव्हील इंजिनीअरिंग/ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – ७ पदे.
(२) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी – ७ पदे.
(३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन – ३ पदे.
(४) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ फायबर ऑप्टिक्स/ टेली कम्युनिकेशन इ. – ४ पदे.
(५) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ एअरोनॉटिकल/ एरोस्पेस/ एव्हिऑनिक्स/ प्रोडक्शन/ इंडस्ट्रियल/इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट/ वर्कशॉप टेक्नॉलॉजी – ७ पदे.
(६) Misc. Engg. Stream आर्किटेक्चर/ केमिकल इंजिनीअरिंग/ फूड टेक्नॉलॉजी/ ॲग्रिकल्चर इंजिनीअरिंग/ बायोटेक इ. – २ पदे.
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण. इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार मान्यताप्राप्त समतूल्य पात्रता पदवी यांची यादी www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये para ३ vacancies मध्ये दिलेली आहे. (अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम निकाल १ जानेवारी २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक.) (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग आणि आय्टी स्ट्रीममधील पदांसाठी एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) उमेदवारसुद्धा पात्र आहेत.)
वयोमर्यादा – १ जानेवारी २०२५ रोजी २० ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००५ दरम्यानचा असावा.)
उंची – किमान १५७.५ सें.मी. वजन – उंची व वय यांच्या प्रमाणात.
ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना प्रोबेशनवर लेफ्टनंट रँकवर शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल. १२ आठवड्यांचे ट्रेनिंग इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, डेहराडून येथे दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना विवाह करण्यास मनाई आहे.
वेतन – डिफेन्स पे-मॅट्रिक्स लेव्हल-१० वर मूळ पगार रु. ५६,१००/- अधिक एमएसपी रु. १५,५००/- व इतर भत्ते. जेटलमेंट कॅडेट्सचा १ कोटीचा ऑर्मी ग्रुप इंशुरन्स उतरवला जाईल.
स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्स पूर्ण वेतन व इतर भत्ते मिळण्यास पात्र आहेत. परंतु ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच पूर्ण वेतन व इतर भत्ते दिले जातील. जेंटलमन कॅडेट्सचा रु. १ कोटीचा विमा उतरविला जाईल.
निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार एसएसबी इंटरह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि M. Sc. पात्रताधारक उमेदवारांचे अंतिम वर्षापर्यंतचे सरासरी गुण पाहून प्रत्येक स्ट्रीमसाठी कट ऑफ परसेंटेज ठरविले जातील. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथाला यापैकी एक सिलेक्शन सेंटरचे वाटप केले जाईल. त्यांना तसे ई-मेलवरून व एसएमएसद्वारा सूचित केले जाईल. सिलेक्शन सेंटरचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर लॉगइन करून SSB साठीची तारीख प्रथम येणाऱ्याऱ्यस प्रथम प्राधान्य या नियमाने निवडता येईल. (अंतिम वर्षाच्या उमेदवारांचे इंजिनीअरिंग पदवीच्या – सरासरी ६ व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण, आर्किटेक्चरसाठी सरासरी ८ व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण, एम.एस्सी.साठी सरासरी दुसऱ्या सेमिस्टरपर्यंतचे गुण कटऑफसाठी निश्चित केलेल्या गुणांपेक्षा कमी नसावेत.)
TGC-१४० वा कोर्सकरिता शिफारिश झालेल्या उमेदवारांना संबंधित इंजिनीअरिंग स्ट्रीममध्ये रिक्त पदे उपलब्ध न झाल्यास त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) कोर्स (एप्रिल, २०२५) करिता पर्याय उपलब्ध राहील. मेडिकली फिट असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड SSB मधील गुणवत्तेनुसार केली जाईल. SSB इंटरह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल. उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या २ स्टेजना सामोरे जावे लागेल. जे उमेदवार स्टेज-१ मधून उत्तीर्ण होतील, त्यांनाच स्टेज-२ साठी पाठविले जाईल. स्टेज-२ नंतर उमेदवारांना मेडिकल एक्झामिनेशनसाठी पाठविले जाईल.
पहिल्यांदा SSB इंटरह्यूकरिता येणारे उमेदवार प्रवास भत्ता मिळण्यास पात्र असतील. (रेल्वेच्या AC- III टियर चे भाडे किंवा बस भाडे)
प्रमोशन – निवडलेल्या इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सना १ वर्ष सेवापूर्व सेवा ज्येष्ठता (Ante Date Seniority) लेफ्टनंट पदावर दिली जाईल. लेफ्टनंट पदावरील कमिशनिंगनंतर २ वर्षांनी कॅप्टन रँकवर, ६ वर्षं पूर्ण झाल्यावर मेजर, १३ वर्षं पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल २६ वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल ( TS) रँकवर पदोन्नती दिली जाईल. यापुढील कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इ. रँकवरील प्रमोशन सिलेक्शन पद्धतीने दिली जातात.
ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. ९ मे २०२४ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत. ( Officer Entry Apply/ Login & gt; Registration & gt; Apply online (Officers Selection Eligibility) & gt; Apply against TGC))
एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियात पदभरती
१) एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया ( AAI) (भारत सरकारचा उपक्रम), नवी दिल्ली ( Advt. No. ०२/२०२४/ CHQ dt. १६.०२.२०२४) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांवर इंजिनीअर पदवीधर उमेदवारांची GATE २०२४ स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – ४९०.
(१) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (GATE Paper Code EC) (इलेक्ट्रॉनिक्स) (टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलायझेशनसह) – २७८ पदे (अजा – ४१, अज – १२, इमाव – ६१, ईडब्ल्यूएस – २७, खुला – १३७) (१० पदे दिव्यांग कॅटेगरी ‘सी’साठी राखीव).
(२) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनीअरिंग – इलेक्ट्रिकल) ( GATE Paper Code EE) – १०६ पदे (अजा – १६, अज – ७, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ५२) (२१ पदे दिव्यांग कॅटेगरी ( B – ८, C – ३, D & E – १०) साठी राखीव).
(३) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनीअरिंग – सिव्हील) (GATE Paper Code CE) – ९० पदे (अजा – १५, अज – ७, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ४०) (१६ पदे दिव्यांग कॅटेगरी ( B – ६, C – २, D & E – ८) साठी राखीव).
(४) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आयटी) ( GATE Paper Code CS) (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी) – १३ पदे (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी ‘A’ साठी राखीव).
पद क्र. १ ते ४ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित विषयातील GATE २०२४ स्कोअर पद क्र. ४ साठी MCA पात्रताधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
(५) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) – ३ पदे (खुला) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी ‘ B व D & E’ साठी प्रत्येकी १ राखीव).
पात्रता – आर्किटेक्चर पदवी आणि आर्किटेक्चर ॲण्ड प्लॅनिंग (AR) विषयातील GATE २०२४ स्कोअर.
वयोमर्यादा – (दि. १ मे २०२४ रोजी) २७ वर्षेपर्यंत (इमाव – ३० वर्षे, अजा/अज – ३२ वर्षे, दिव्यांग – ३७/४०/४२ वर्षे).
वेतन श्रेणी – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Group B : E-r Level) ४०,००० – ३ टक्के – १,४०,०००/-, अंदाजे वेतन रु. १३ लाख प्रती वर्ष ( CTC).
निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी (Application Number) AAI च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनकरिता उमेदवारांना कॉल लेटर त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल. ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनच्या वेळी मूळ कागदपत्र तपासून GATE २०२४ स्कोअरच्या आधारे प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी बनविली जाईल. प्रोव्हिजनली सिलेक्टेड उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
अर्जाचे शुल्क – रु. ३००/-. (अजा/अज/दिव्यांग/महिला/ AAI मध्ये १ वर्षाची अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेले उमेदवार यांना फी माफ आहे.)
ऑनलाइन अर्ज www. aai. aero या संकेतस्थळावर दि. १ मे २०२४ पर्यंत करावेत.