सुहास पाटील

रुग्णालयांतील संधी

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांचे अधिनस्त नागपूर जिह्यातील शासकीय वैद्यकीय/ दंत/ आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील ‘गट-ड’ (वर्ग-४) समकक्ष संवर्गातील रिक्त पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ६८० (अजा – १००, अज – ५४, विजा-अ – ३१, भज-ब – १९, भज-क – ३७, भज-ड – १९, विमाप्र – १९, इमाव – १६०, आदुघ – ७३, खुला – १६८) (दिव्यांग – २१, अनाथ – ३, महिला – २०४, माजी सैनिक – ९५, पदवीधर अंशकालीन – ६४, खेळाडू – ३० पदे राखीव). संस्थानिहाय रिक्त पदांचा तपशील –

१)        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर -६६ पदे.

२)        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर – ३४४ पदे.

३)        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर – १९ पदे.

४)        ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सावनेर, नागपूर – ११ पदे.

५)        इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – ५७ पदे.

६)        इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर – १३५ पदे.

७)        शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,नागपूर – २२ पदे.

८)        शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर -३ पदे.

९)        शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नागपूर – २३ पदे. 

पात्रता – (दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी) १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी) खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू – १८ ते ४३ वर्षे, दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १८ ते ४५ वर्षे. अंशकालीन पदवीधारक – १८-५५ वर्षे.

वेतन श्रेणी – एस-१: १५,००० – ४७,६०० अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते.

निवड पद्धती – ऑनलाईन (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट) स्पर्धा परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० प्रश्न २०० गुणांसाठी, वेळ २ तास).

मौखिक परीक्षा (मुलाखत) घेण्यात येणार नाही. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. उमेदवारास फक्त एकच अर्ज सादर करता येईल. एकापेक्षा जास्त संस्थेकरिता अर्ज केल्यास ते अपात्र ठरविण्यात येतील. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना 

https:// gmcnagpur. Org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरील जाहिरातीच्या परिच्छेद-८ मध्ये अर्जासोबत अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी दिलेली आहे. परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय व आदुघ – रु. ९००/-, माजी सैनिकांना शुल्क आकारले जात नाही.)

ऑनलाईन अर्ज  https:// gmcnagpur. Or या संकेतस्थळावर दि. ३० जानेवारी २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. (अंतिम तारीख २० जानेवारी २०२४ वरून ३० जानेवारी २०२४ पर्यंत वाढविली आहे.)

(नोंदणी & gt; अर्जावरील माहितीचे पूर्वालोकन & gt; ऑनलाइन शुल्क भरणा & gt; अर्जाची पिंट्रआऊट)