सुहास पाटील

रेल्वे मंत्रालयांतर्गत १९ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्समध्ये एकूण ९,१४४ ‘टेक्निशियन’ रिक्त पदांची भरती. (CEN No. ०२/२०२४) रिक्त पदांचा तपशील –

394 m additional central tunnel for bullet train completed
मुंबई : बुलेट ट्रेनसाठी ३९४ मीटरच्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याचे काम पूर्ण
liquor, sale, High Court,
४ जून रोजी निकालानंतर मद्यविक्रीस परवानगी द्या, मागणीसाठी आहार उच्च न्यायालयात
Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
vacancies in railway protection force
नोकरीची संधी : ‘आरपीएफ’मधील भरती
Delay in Mumbai Metro 3, Aarey BKC Route, Metro 3 Aarey BKC Route, Mumbai Metro 3 expected to Start by End of July, Mumbai metro, Mumbai metro 3, Mumbai metro news,
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो प्रवासासाठी जुलै अखेरपर्यंत प्रतीक्षा, सुरक्षा प्रमाणपत्राची प्रक्रिया जूनमध्ये
pune tata advance systems limited jobs
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक…
in Mumbai 11 thousand houses sold in April decrease in house sales compared to March
मुंबईतील ११ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री, मार्चच्या तुलनेत घर विक्रीत घट
461 crore property Tax arrears to Metro One
मुंबई : ‘मेट्रो वन’कडे ४६१ कोटींचा थकीत मालमत्ता कर

( I) टेक्निशियन ग्रेड- I सिग्नल – एकूण १,०९२ पदे (माजी सैनिक – ११४ पदे, दिव्यांग – ३० पदे कॅटेगरी LD साठी राखीव). (वेतन श्रेणी – लेव्हल-५ (२९,२००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५५,७००/-). रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ( RRB), मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे – १५२ (CR – १०६, SCR – ९, WR – ३७). माजी सैनिकांसाठी एकूण १५ (CR – १०, SCR – १, WR – ४ पदे राखीव). दिव्यांग २ पदे (कॅटेगरी LD साठी) राखीव.

पात्रता – (दि. ८ एप्रिल २०२४ रोजी) बी.एस्सी. (फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्स्ट्रूमेंटेशन या विषयांसह उत्तीर्ण किंवा एकत्रितपणे यापैकी विषयांसह उत्तीर्ण किंवा वरीलपैकी विषयांसह किंवा एकत्रितपणे यापैकी विषयांसह ३ वर्षं. कालावधीचा इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री.

( II) टेक्निशियन ग्रेड- III – एकूण ८,०५२ पदे (माजी सैनिक – ९३३ पदे, दिव्यांग – २७३ पदे कॅटेगरी LD – १६५, VI – ३, HI – ८५, MD – २० पदे राखीव). (वेतन श्रेणी – लेव्हल-२ (१९,९००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३६,०००/-). ( RRB), मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे – १,१३२ (माजी सैनिक – ११३, दिव्यांग – १४ (कॅटेगरी LD आणि HH साठी प्रत्येकी ७ पदे) राखीव.

पात्रता – (दि. ८ एप्रिल २०२४ रोजी) १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय किंवा १० वी आणि संबंधित ट्रेडमधील ॲक्ट ॲप्रेंटिसशिप पूर्ण. ट्रेडनुसार RRB मुंबई अंतर्गत टेक्निशियन ग्रेड- III मधील रिक्त पदांचा तपशील – (पदाच्या नावापुढे संबंधित ट्रेडची नावे कंसात दिली आहेत.)

(१) ब्लॅकस्मिथ (फोर्जर ॲण्ड हिट ट्रीएटर/ फाऊंड्रीमॅन/ पॅटर्न मेकर/ मॉड्युलर रिफ्रॅक्टरी) – ३६ पदे ( CR- ३० (३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), SCR-३, WR-३).

(२) ब्रिज (फिटर/ फिटर स्ट्रक्चरल/ वेल्डर) – २० पदे ( CR – १७ (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), WR – ३).

(३) कॅरिएज ॲण्ड वेगॉन (फिटर/ कारपेंटर/ वेल्डर/ प्लंबर/ पाईप फिटर) – ५७ पदे ( WR – ६ पदे माजी सैनिक, दिव्यांग LD – १ व HI – १ साठी राखीव).

(४) क्रेन ड्रायव्हर (मेकॅनिक मोटर वेहिकल/ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर/क्रेन ऑपरेटर/ ऑपरेटर लोकोमोटिव्ह ॲण्ड रेल क्रेन्स) – २ पदे ( CR).

(५) डिझेल इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) – ४१ पदे ( CR – ३७ (४ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), WR – ४).

(६) डिझेल मेकॅनिकल (फिटर/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक रिपेअर मेंटेनन्स ऑफ हेवी वेहिकल्स/ मेकॅनिक ऑटोमोबाईल ॲडव्हान्स्ड डिझेल इंजिन/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ट्रक्टर मेकॅनिक/ वेल्डर/ पेंटर) – ६१ पदे ( CR – ५८ (६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), WR – ३).

(७) इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ मेकॅनिक- HT, LT इक्विपमेंट्स ॲण्ड केबल जॉईंटर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) – ११० पदे ( CR – ८० (७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), WR – ३० (४ पदे माजी सैनिकांसाठी राखीव)).

(८) इलेक्ट्रिकल/ TRS (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ मेकॅनिक- HT, IT इक्विपमेंट्स ॲण्ड केबल जॉईंटर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ फिटर/ वेल्डर/ पेंटर जनरल/ मशिनिस्ट/ कारपेंटर) – १६१ पदे ( CR – ११८ (१२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), WR – ४३ (४ पदे माजी सैनिकांसाठी राखीव, ३ पदे दिव्यांग कॅटेगरी LD – १, MD – १ साठी राखीव).

(९) ईएमयू (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिक – HT, LT इक्विपमेंट्स ॲण्ड केबल जॉईंटर/ फिटर/ वेल्डर/ पेंटर जनरल/ मशिनिस्ट/ कारपेंटर/ ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टूल) – २९१ पदे ( CR – १४३ (१४ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), WR – १४८ (१५ पदे माजी सैनिक व प्रत्येकी ३ पदे दिव्यांग कॅटेगरी LD/ HI साठी राखीव)).

(१०) फिटर (फिटर) – ८८ पदे ( CR – ९ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

(११) रेफ्रिजरेटर ॲण्ड ए.सी. (रेफ्रिजरेटर ॲण्ड ए.सी. मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) – ५१ पदे ( CR – ३८ (४ पदे माजी सैनिक राखीव), WR – १३ (१ पद दिव्यांग कॅटेगरी HI साठी राखीव).

(१२) एस ॲण्ड टी (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ १२ वी (फिजिक्स आणि मॅथ्स)) – १६८ पदे ( CR – १२४ (१३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव), SCR – १० (१ पद माजी सैनिक), WR – ३४ (४ पदे माजी सैनिक व २ पदे दिव्यांग कॅटेगरी LD साठी राखीव)).

(१४) टर्नर (टर्नर/ऑपरेटर ॲडव्हान्स्ड मशिन टूल) – ० पदे.

(१५) वेल्डर (वेल्डर/वेल्डर गॅस ॲण्ड इलेक्ट्रिक/गॅस कटर/वेल्डर स्ट्रक्चरल/वेल्डर पाईप/वेल्डर TIG/ MIG) – ३० पदे ( CR – २३, WR – ७ (प्रत्येकी १ पद CR/ WR मधील माजी सैनिकांसाठी राखीव)).

वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२४ रोजी) टेक्निशियन ग्रेड- I सिग्नल – १८ ते ३६ वर्षे, टेक्निशियन ग्रेड- III – १८ ते ३३ वर्षे. उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९८८ ते १ जुलै २००६ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती – भरती प्रक्रियेमध्ये (१) कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT), (२) कागदपत्र पडताळणी ( DV), (३) मेडिकल एक्झामिनेशन ( ME).

टेक्निशियन ग्रेड- I – सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड- III पदांसाठी वेगवेगळी CBT घेतली जाईल.

टेक्निशियन ग्रेड- I – सिग्नल पदांसाठी CBT परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे, एकूण प्रश्न १००. (जनरल अवेअरनेस – १० प्रश्न, जनरल इंटेलिजन्स ॲण्ड रिझनिंग – १५ प्रश्न, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर्स आणि ॲप्लिकेशन्स – २० प्रश्न, मॅथेमॅटिक्स – २० प्रश्न, बेसिक सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग – ३५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.

टेक्निशियन ग्रेड- III पदांसाठी CBT (मॅथेमॅटिक्स – २५ प्रश्न, जनरल इंटेलिजन्स ॲण्ड रिझनिंग – २५ प्रश्न, जनरल सायन्स – ४० प्रश्न, जनरल अवेअरनेस – १० प्रश्न, १०० गुण, वेळ ९० मिनिटे.) CBT परीक्षेचे माध्यम हिंदी/इंग्रजी आणि १३ रिजनल भाषांपैकी एक भाषा उमेदवारांनी निवडायची आहे. CBT मधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांइतके उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. वैद्याकीय तपासणीत पात्र ठरलेले उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व पूर्वचारित्र्य पडताळणीनंतर नेमणूक दिली जाईल. उमेदवार फक्त एका RRB मधील विशिष्ट ( specific) पे-लेव्हल वरील (टेक्निशियन ग्रेड- I सिग्नल किंवा टेक्निशियन ग्रेड- III) पदासाठी अर्ज करू शकतात. एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक RRB मध्ये अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरविले जातील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार देशभरातील १.५ लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) ची मदत घेवू शकतात. जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर शोधण्यासाठी https:// findmycsc. nic. in/ csc/ या वेबसाईटवरील Find My CSC या लिंकवर क्लिक करा.

RRB मुंबईमधील पदांसाठी ऑनलाइन अर्ज www. rrbmumbai. gov. in या वेबसाईटवर करावेत. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर मॉडिफिकेशन फी भरून अर्जात काही बदल करण्यासाठी Modification Window दि. ९ एप्रिल ते १८ एप्रिल २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत उपलब्ध असेल.

अजा/अजच्या उमेदवारांना CBT साठी प्रवास मोफत करण्यासाठी अशा उमेदवारांनी ई-कॉल लेटर व मूळ ओळखपत्र घेवून रेल्वे बुकिंग खिडकीशी संपर्क साधावा.

कागदपत्र पडताळणीपूर्वी उमेदवारांना आवश्यक ती कागदपत्रे https:// oirms- ir. gov. in/ rrbdv या पोर्टलवर अपलोड करा.