युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ( UPSC) ‘इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (आयईएस)/ इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (आयएसएस)’ परीक्षा, २०२४ ( IES/ ISS Exam, २०२४) दि. २१ जून २०२४ पासून घेणार आहे. या परीक्षेतून वरील सर्व्हिसेसमधील ज्युनियर टाईम स्केलवरील (असिस्टंट डायरेक्टर/रिसर्च ऑफिसर) आयईएस – १८ पदे व आयएसएस – ३० पदे (३ पदे दिव्यांग (कॅटेगरी बी/ एलव्ही; डी/एचएच आणि एसएलडी / एमडी प्रत्येकी १)) भरली जाणार आहेत. ( Examination Notice No. ०७/२०२४- IES/ ISS dt. १०.४.२४) परीक्षा – मुंबई व देशभरातील इतर १८ केंद्रांवर घेतली जाईल.

पात्रता – (अ) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिससाठी – इकॉनॉमिक्स/ ॲप्लाईड इकॉनॉमिक्स/ बिझनेस इकॉनॉमिक्स/ इकॉनोमेट्रिक्स या विषयांतील पदव्युत्तर पदवी.

(ब) आयएसएससाठी – स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ ॲप्लाईड स्टॅटिस्टिक्स यांपैकी एक विषय घेवून पदवी उत्तीर्ण किंवा स्टॅटिस्टिक्स / मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ ॲप्लाईड स्टॅटिस्टिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी.

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४० वर्षेपर्यंत).

परीक्षा शुल्क – रु. २००/- (महिला/ अजा/ अज/ दिव्यांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – (१) पार्ट-१ – लेखी परीक्षा – १,००० गुणांसाठी.

इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (IES) साठी (१) जनरल इंग्लिश – १०० गुण, (२) जनरल स्टडीज – १०० गुण, (३) जनरल इकॉनॉमिक्स – I – २०० गुण, (४) जनरल इकॉनॉमिक्स – II – २०० गुण, (५) जनरल इकॉनॉमिक्स – III – २०० गुण, (६) इंडियन इकॉनॉमिक्स – २०० गुण. प्रत्येक पेपरसाठी वेळ ३ तास. सर्व पेपर्स सब्जेक्टिव्ह टाईप असतील.

इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (ISS) साठी – (१) जनरल इंग्लिश – १०० गुण, वेळ ३ तास; (२) जनरल स्टडीज – १०० गुण, वेळ ३ तास; (३) स्टॅटिस्टिक्स – I (ऑब्जेक्टिव्ह) – २०० गुण, वेळ २ तास; (४) स्टॅटिस्टिक्स – II (ऑब्जेक्टिव्ह) – २०० गुण, वेळ २ तास; (५) स्टॅटिस्टिक्स – III (वर्णनात्मक ( Descriptive) स्वरूपाची) – २०० गुण, वेळ ३ तास; (६) स्टॅटिस्टिक्स – IV – (डिस्क्रीप्टिव्ह टाईप) – २०० गुण, वेळ ३ तास. स्टॅटिस्टिक्स- क व स्टॅटिस्टिक्स- II पेपर्समध्ये ८० प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप. एकूण २०० गुणांसाठी (प्रत्येकी), वेळ प्रत्येकी २ तास.

IES आणि ISS दोन्ही परीक्षांमध्ये जनरल इंग्लिश व जनरल स्टडीज पेपर कॉमन असतील. जे सब्जेक्टिव्ह टाईप असतील.

कन्व्हेन्शनल टाईप टेस्ट व ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टसाठी विशेष माहिती जाहिरातीमध्ये अपेंडिक्स- III व अपेंडिक्स- IV मध्ये दिलेली आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमधील सेक्शन- II मध्ये दिलेला आहे.

(२) पार्ट-२ – मुलाखत ( Viva- Voce) – २०० गुण.

ऑनलाइन अर्ज https:// www. upsconline. nic. in या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी कार्यालयीन वेळेत (१०.०० ते १७.०० वाजेपर्यंत) संपर्क साधा. फोन नं. ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३.

मेडिकल ऑफिसर पदांची भरती

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत ‘कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन २०२४’ (CMSE-२०२४) दि. १४ जुलै २०२४ रोजी पुढील ८२७ मेडिकल ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेतली जाईल. ( Advt. No. ०८/२०२४ – CMS dt. १०.४.२०२४)

कॅटेगरी- I – मेडिकल ऑफिसर्स ग्रेड इन जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर्स सब कॅडर ऑफ सेंट्रल हेल्थ सर्व्हिसेस – १६३ पदे (दिव्यांग – एकूण ६ पदे राखीव. एल्डी – ३ पदे; एसएलडी/ मल्टिपल डिसएबिलिटी – ३ पदे).

कॅटेगरी- II –

( i) असिस्टंट डिव्हीजनल मेडिकल ऑफिसर (भारतीय रेल्वेमध्ये) – ४५० पदे (दिव्यांग एलडी कॅटेगरीतील बीएल, ओएल, ओएसाठी १८ पदे राखीव).

( ii) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (नवी दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिलमध्ये) – १४ पद.

( iii) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड- II (दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये) – २०० पदे. (८ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव. एलडी/ एसएलडी/ सीपी/ LC/ Dw/ AAV/एमडी)

पात्रता – एम.बी.बी.एस. उत्तीर्ण. (अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी ३२ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – पार्ट-१ – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांसाठी (प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.) एकूण ५०० गुण (पेपर-१ जनरल मेडिसिन – ९६ प्रश्न, पेडिअॅट्रिक्स – २४ प्रश्न, एकूण १२० प्रश्न, एकूण – २५० गुण; पेपर-२ – सर्जरी, गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्ट्रेट्रिक्स, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन प्रत्येकी ४० प्रश्न, एकूण १२० प्रश्न – २५० गुण) (प्रत्येक पेपरसाठी कालावधी २ तास). पार्ट-२ – पर्सोनॅलिटी टेस्ट – १०० गुण.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, रायपूर, पणजी (गोवा), धारवाड, अहमदाबाद इ. देशभरातील एकूण ४१ परीक्षा केंद्र.

ऑनलाइन अर्ज http:// www. upsconline. nic. in या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.

एसीईएम’मधील संधि

ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल्स ( ACEM), डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ( DRDO) (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) अंबे हिल, ओझर, नाशिक. ( Advt. No. ACEM/ HRD/ APPRENTICESHIP/२०२४-२५). ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत १ वर्षाच्या कालावधीसाठी ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता अॅप्रेंटिसेसच्या एकूण ४१ पदांची भरती. ( I) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस ( B. E./ B. Tech.) – ३० पदे. स्टायपेंड – दरमहा रु. १२,०००/-.

(१) B. E./ B. Tech. केमिकल इंजिनीअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी – ७ पदे.

(२) B. E./ B. Tech. एअरोस्पेस/एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग – २ पदे.

(३) B. E./ B. Tech. कॉम्प्युटर अॅण्ड इन्फॉरमेशन सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा B. Sc. (कॉम्प्युटर सायन्स) – २ पदे.

(४) B. E./ B. Tech. इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल ॲण्ड इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स – ३ पदे.

(५) B. E./ B. Tech. मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ७ पदे.

(६) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेली कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – ३ पदे.

(७) बी.एस्सी. (फिजिक्स) – २ पदे.

(८) बी.एस्सी. (केमिस्ट्री) – ४ पदे.

( II) टेक्निशियन ॲप्रेंटिस (डिप्लोमा) – ११ पदे. स्टायपेंड – दरमहा रु. १०,०००/-.

(१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा – ४ पदे.

(२) केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा – २ पदे.

(३) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा – २ पदे.

(४) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फारमेशन टेक्नॉलॉजी/वेब डिझायनिंग डिप्लोमा – १ पद.

(५) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा – २ पदे.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार इंटरह्यूकरिता निवडले जातील. अंतिम निवड इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ऑफर लेटर मार्फत सूचित केले जाईल. स्थानिय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

उमेदवारांनी NATS Portal ( www. nats. education. gov. in) रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य. फक्त २०२२/२०२३ मध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. शंकासमाधानासाठी संपर्क साधा apprentice. acem@gov. in.

अर्जाचा विहीत नमुना www. drdo. gov. in या संकेतस्थळावरील (Application for engagement of Apprentices for FY २०२४-२५ in ACEM, Nashik) जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. विहीत नमुन्यातील टाईप केलेल्या अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ चिकटवावा आणि अर्जावर सही करून त्याची स्कॅण्ड कॉपी आवश्यक त्या कागदपत्रांसह PDF format मध्ये apprentice. acem@gov. in या ई-मेल आयडीवर दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावेत.