Maharashtra SSC and HSC Result 2024 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. २०२४ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे.

Maharashtra SSC And HSC Result 2024: ‘या’ तारखेला जाहीर होऊ शकतात निकाल

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.

दरम्यान तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी आणि बारावी २०२४ चा निकाल पाहू शकता. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
३. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२वी निकाल २०२४ साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
४. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा.

निकालानंतर किती दिवसांनी मिळतील गुणपत्रिका ?

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केल्यांतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात गुणपत्रिकेची ओरिजनल हार्ड कॉपी देण्यात येईल.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकाल २०२४ मध्ये नमूद केलेले तपशील खालीलप्रमाणे

१. विद्यार्थ्याचे नाव
२. पालकांची नावे
३. हजेरी क्रमांक
४. जन्मतारीख
५. शाळेचे नाव
६. विषयांची नावे
७. प्रत्येक विषयासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये मिळालेले गुण
८. एकूण गुण मिळाले
९. निकालाची स्थिती
१०. शेरा

हेही वाचा >> Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता अन् वेतन

Maharashtra SSC 10th Result 2024: गेल्या वर्षीचा निकाल

गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावी २०२३ चा निकाल २ जूनला जाहीर झाला होता. या परीक्षेसाठी एकूण १५.४९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी १५.२९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आणि १४.३४ लाख विद्यार्थी पास झाले होते. याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी तुम्ही बोर्डाची अधिकृत वेबसाईट पाहू शकता.