Mumbai Job Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. इच्छुक उमेदवार आज १५ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
Mumbai Port Trust Bharti 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेऊ.
रिक्त पदे आणि पदसंख्या –
संगणक ऑपरेटर (Computer Operator ) आणि प्रोग्रामिंग असिस्टंट {Programming Assistant (COPA)} – ५० पदे, पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) – ५ पदे, टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) – ६ पदे. म्हणजेच एकूण ६२ रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता –
१. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदाच्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी किंवा १२ वी आणि ITI चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
२. पदवीधर अप्रेंटिस या पदाच्या उमेदवारांनी मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी पदवी प्राप्त केलेली असावी.
३. टेक्निशियन अप्रेंटिस या पदाच्या उमेदवारांनी मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
अर्ज करण्यापूर्वी खाली जोडलेली अधिसूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
लिंक – https://mumbaiport.gov.in/writereaddata/linkimages/7052801857.pdf
अधिकृत वेबसाईट – https://mumbaiport.gov.in/
अर्ज फी – या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी १०० रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010
या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.