महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आस्थापनांत गट-ब संवर्गातील पुढील एकूण १३२ पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमार्फत केली जाईल. मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक) आणि प्राचार्य/उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट-ब (तांत्रिक) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब एकूण रिक्त पदे – १३२ (अजा – १७, अज – ८, विजा-अ – ५, भज-ब – ३, भज-क – ५, भज-ड – ३, इमाव – २४, विमाप्र – ३, साशैमाव – १३, आदुघ – १३, खुला – ३८) (आरक्षित पदे – महिला – ४०; खेळाडू – ६, अनाथ – १)) (५ पदे अपंग उमेदवारांसाठी राखीव).

पात्रता – (१५ ऑक्टोबर २०२५ रोजी) इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजी डिप्लोमा किमान दुसऱया वर्गासह उत्तीर्ण.

अनुभव – प्रोफेशनल किंवा टिचिंग किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव. (अनुभवाच्या दाव्याबाबत उमेदवाराने कामाचे स्वरूप प्रोफेशनल किंवा टिचिंग किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे.)

वयोमर्यादा – (१५ ऑक्टोबर २०२५ रोजी) किमान – १८ वर्षे

वेतन श्रेणी – वेतन स्तर एस-१७ (रु. ४७,६०० १,५१,१) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. ९०,०००/-.

निवड प्रक्रिया – अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करणेसाठी पात्रता/अनुभव पाहून उमेदवार शॉर्टलिस्ट करून अथवा चाळणी परीक्षेद्वारे केली जाईल. मुलाखतीमध्ये किमान ४१ टक्के गुण मिळविणे आवश्यक.

चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम इ. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित करून, चाळणी परीक्षा न घेतल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल.

अर्जाचे शुल्क – खुला – रु. ७१९/-;

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. १५ ऑक्टोबर २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत – https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा १२ मध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर दि. १५ ऑक्टोबर २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.