scorecardresearch

Premium

दहावीच्या निकालाच्या वेळी व नंतर ‘ही’ कागदपत्रे जवळ असायलाच हवीत! उद्या रिझल्ट लागणार, त्याआधी वाचा

Maharashtra SSC Board Result 2023 Declared Tomorrow: दहावीचा निकाल व FYJC म्हणजेच अकरावीच्या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Maharashtra 10th Result 2023 Tomorrow How and Where to check
महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल २०२३ तारीख आणि वेळ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra 10th Result 2023 Declared Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) दहावीचा निकाल उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला जाहीर होणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in व mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा २३ हजार १० शाळांमदील जवळपास १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे निकालानंतर आता १५ लाख हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता लागणाऱ्या निकालाच्या वेळी आपल्याला वेळ वाचवण्यासाठी काही तपशील जवळ बाळगणे अत्यावश्यक असणार आहे तर FYJC म्हणजेच अकरावीच्या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

दहावीच्या निकालाच्यावेळी आवश्यक तपशील (SSC Results Important Details)

महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा हॉल तिकीट क्रमांक व आईचे नाव (जे दहावीचा फॉर्म भरताना नोंदवलेले असेल तेच) आवश्यक आहे. जेव्हा तुम्हा दहावीच्या निकालाच्या अधिकृत बेबसाईटवर मार्कशीट दिसेल तेव्हा त्यात विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी, उत्तीर्ण/अनुत्तीर्ण स्थिती यांचे तपशील नमूद केलेले असतील याची खात्री करून घ्या.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…
tanushree dutta on nana patekar
“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

दहावीच्या निकालानंतर FYJC च्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (FYJC Admission Important Documents)

१) दहावीची मार्कशीट (मूळ, व फोटोकॉपी)

२) आधार कार्ड, पॅनकार्ड (फोटोकॉपी)

३) पासपोर्ट साईज फोटो

४) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ व फोटोकॉपी)

५) रहिवासी पुरावा, घरचा पत्ता असलेला पुरावा (रेशनकार्ड, लाईट बिल)

६) जात प्रमाणपत्र (लागू होत असल्यास)

गरजेनुसार इतर काही कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते.

हे ही वाचा<< ठरलं! दहावीचा निकाल २ जूनला जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ऑल द बेस्ट!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 16:16 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×