बीएसएफमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यां उमेदवारांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे बीएसएफमध्ये लवकरच बंपर भरती केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीमा सुरक्षा दल BSF लवकरच कॉन्स्टेबल (ट्रेडसमन) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. ज्या अंतर्गत सुमारे १४१० पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्हीसाठी जागा असणार आहेत.

भरती संबंधित अर्ज आणि निवड प्रक्रियेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडसमन भरती २०२३ चा ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होणार असून त्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. तर अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

हेही वाचा- Recruitment 2023: १२ वी उत्तीर्णासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी संधी, १ लाखापर्यंत मिळणार पगार

अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा –

बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडसमन २०२३ –

बीएसएफ कॉन्स्टेबल भरती २०२३ साठी एकूण १४१० जागांवर भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल (पुरुष) १३४३ आणि हेड कॉन्स्टेबल (महिला) ६७ अशा महिला आणि पुरुष दोघांसाठीच्या जागा आहेत.

हेही वाचा- SAIL Recruitment 2023: SAIL मध्ये १०० पेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख

BSF Constable Tradesman Recruitment 2023 साठी अर्ज करण्यासाठी पात्रता-

BSF कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय कोर्स केलेला असावा. त्यानुसार जे उमेदवार पात्र असतील ते सर्व या जागेसाठी अर्ज करु शकतात.

वयाची अट –

या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. दरम्यान, या भरतीबाबतची अधिकची आणि नेमकी माहिती मिळवण्यासाठी https://rectt.bsf.gov.in/ या बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.