NABARD recruitment 2024 : १७ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेअंतर्गत नोकरीसाठी भरती सुरू आहे. एकूण ३१ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. तसेच नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहे आणि अर्जाची अंतिम तारीख काय असेल याची माहिती खाली पाहा.

NABARD recruitment 2024 : रिक्त पदांची माहिती

 • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – रिक्त जागा- १
 • प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन – रिक्त जागा- १
 • लीड ऑडिटर – रिक्त जागा- २
 • अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक – रिक्त जागा- १
 • वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स – रिक्त जागा- १
 • जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम रिक्त जागा- २
 • जोखीम व्यवस्थापक- मार्केट जोखीम – रिक्त जागा- २
 • जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम – रिक्त जागा- २
 • जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा – रिक्त जागा- १
 • सायबर आणि नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ – रिक्त जागा- २
 • डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम विशेषज्ञ – रिक्त जागा- २
 • IT पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ – रिक्त जागा- २
 • अर्थशास्त्रज्ञ – रिक्त जागा- २
 • क्रेडिट अधिकारी – रिक्त जागा- १
 • कायदेशीर अधिकारी – रिक्त जागा- १
 • ETL विकसक – रिक्त जागा- १
 • डेटा सल्लागार – रिक्त जागा- २
 • व्यवसाय विश्लेषक – रिक्त जागा- १
 • पॉवर BI अहवाल विकसक – रिक्त जागा- १
 • विशेषज्ञ – डेटा व्यवस्थापन – रिक्त जागा- १
 • आर्थिक समावेशक सल्लागार (तांत्रिक) – रिक्त जागा- १
 • आर्थिक समावेशक सल्लागार (बँकिंग) – रिक्त जागा- १

हेही वाचा : MAFSU recruitment 2024 : नागपुरात नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात भरती सुरू, पाहा

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

NABARD recruitment 2024 – अर्जाची थेट लिंक –
https://regdemo.sifyitest.com/nbardsbnov23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started.

NABARD recruitment 2024 – अधिकृत वेबसाइट –
https://www.nabard.org/

NABARD recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1Y1DzGTIrGlLmvV159ijlslfG4c3tVMdE/view

NABARD recruitment 2024 : वयोमर्यादा आणि अर्जाची प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठीची वयोमर्यादा ही ४५ ते ६२ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.
वरील पदांचे नोकरीचे स्थळ हे मुंबई शहर असणार आहे.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे काही शुल्क भरावे लागणार आहे.

एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी [SC/ ST/ PWBD] मध्ये येणाऱ्या उमेदवारांना ५०/- रुपये असे शुल्क अर्जासाठी भरावे लागणार आहे.
तर याव्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ८००/- रुपये असणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
तसेच अर्ज भरताना त्यामध्ये आवश्यक ती सगळी माहिती भरावी.
अर्जातील माहिती अर्धवट किंवा अपूर्ण असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
तसेच अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेच्या आधी भरणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ अशी आहे.

वरील पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती नोकरीच्या अधिसूचनेत वाचावी. तसेच उमेदवारास इतर कोणतीही माहिती हवी असल्यास राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अधिकृत वेबसाईट, अधिसूचना, तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक वर देण्यात आली आहे.