NTPC Recruitment 2024 :नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC ने E4 स्तरावर प्रकल्प उभारणी / बांधकाम क्षेत्रात उपव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविले आहेत. अर्जाची प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ मार्च आहे. इच्छुक उमेदवार careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
NTPC Recruitment 2024 : या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा आणि रिक्त पदे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
१. रिक्त जागा आणि पदे- ११० रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल इरेक्शन)- २० पदे
उपव्यवस्थापक (मेकॅनिकल इरेक्शन)- ५० पदे
डेप्युटी मॅनेजर (सी ॲण्ड आय इरेक्शन)- १० पदे
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल कन्स्ट्रक्शन)- ३० पदे
२. वयोमर्यादा- अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षे असावे.
३. अर्ज शुल्क- सामान्य / ईडब्ल्यूएस (EWS) / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांनी ३०० रुपयांचे विनापरतीचे अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी (PWBD) / एक्सएसएम (XSM) श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही.
४. अर्ज कसा करावा?
- http://www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
- पुढे (E4 स्तर) येथे प्रकल्प उभारणी / बांधकाम क्षेत्रात डेप्युटी मॅनेजर म्हणून अनुभवी व्यावसायिकांची भरती या अर्ज लिंकवर क्लिक करा.
- (Advt. क्र. ०५/२४. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे. )
- त्यानंतर उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरावा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे येथे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा.
- फॉर्म सबमिट करा.
- संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.