scorecardresearch

Premium

नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत ‘या’ पदाच्या ११४० जागांसाठी भरती सुरु, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

Northern Coalfields Limited Bharti 2023
नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Northern Coalfields Limited Bharti 2023 : नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ११४० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड भरती २०२३ –

Why is dot on identity card controversial What are the objections to egg-banana scheme for student nutrition
विश्लेषण : ‘ओळखपत्रावरील ठिपका’ वादात का? विद्यार्थी पोषण आहारासाठी अंडी-केळी योजनेवर कोणते आक्षेप?
Gyanvapi Case
ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने
Reserve Bank is indifferent to prevent cyber crimes
सायबर गुन्हे रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकच उदासीन; ऑनलाइन बँकिंगविषयक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी अपुऱ्या उपाययोजना
Objection of Candidates on Talathi Recruitment Final List Nagpur
तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप; सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

पदाचे नाव – शिकाऊ प्रशिक्षणार्थी

पदाचे नाव आणि पद संख्या –

पदाचे नावपद संख्या
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक१३
इलेक्ट्रिशियन३७०
फिटर५४३
वेल्डर१५५
मोटर मेकॅनिक४७
ऑटो इलेक्ट्रिशियन १२

पद संख्या – ११४० जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी पास, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून ITI.

वयोमर्यादा – १८ ते २६ वर्षांपर्यंत.

हेही वाचा- TIFR मुंबई येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना २२ हजारांपर्यंत पगार मिळणार

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०२३

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)

अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in

पगार – शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवरांना पदानुसार महिना ७ हजार ७०० रुपये ते ८ हजार ५० रुपये पगार दिला जाईल.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1cOK45aTN_UuVGjEV6kPxx4ueR1t__PlX/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Northern coalfields limited is recruiting qualified candidates for various vacancies of apprentice trainee jap

First published on: 28-09-2023 at 17:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×