सुहास पाटील
१) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांतून १० वी, १२ वी, पदवी, इंजिनीअरिंग पदवी/पदविका उत्तीर्ण, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांची केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ पदांवर भरती केली जाते. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे कॅलेंडर त्यांच्या www. ssc. nic. in या संकेतस्थळावर साधारणत ६ महिने ते १ वर्ष अगोदर प्रसिद्ध केले जाते. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या २०२४-२५ मधील परीक्षांचे कॅलेंडर २ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर झाले आहे.
( I) १० वी उत्तीर्ण पात्रतेच्या निकषानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षा –
(१) मल्टि टास्कींग (नॉन-टेक्निकल स्टाफ) एक्झामिनेशन, २०२४ ( MTS) अॅण्ड हवालदार ( cbic cbN)
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक ७ मे २०२४. परीक्षा – जुलै-ऑगस्ट २०२४ दरम्यान घेण्यात येईल.
पात्रता – १० वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – mts आणि cbn मधील हवालदार पदांसाठी १८ ते २५ वर्षे (CBIC मधील हवालदार पदांसाठी आणि MTS च्या काही पदांसाठी १८ ते २७ वर्षे).
वेतन – पे-लेव्हल – १, अंदाजे वेतन रु. ३३,०००/-.
परीक्षा पद्धती – सर्व पदांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटराईज्ड एक्झामिनेशन ( CBE) सत्र (Session) – १ व सत्र २. हवालदार पदांसाठी CBE नंतर शारीरिक क्षमता चाचणी ( PET) आणि शारीरिक मापदंड चाचणी (PST) घेतली जाईल. CBE हिंदी, इंग्रजीबरोबर, मराठी, कोंकणी, कन्नड, गुजराती आणि तेलुगू इ. १३ रिजनल लँग्वेजमधून घेतली जाईल.
CBE सत्र-१ – ( i) न्यूमरिकल अॅण्ड मॅथेमॅटिकल अॅबिलिटी, ( ii) रिझनिंग अॅबिलिटी अॅण्ड प्रॉब्लेम सॉल्विंग प्रत्येकी २० प्रश्न, वेळ ४५ मिनिटे.
सत्र-२ – ( i) जनरल अवेअरनेस, ( ii) इंग्लिश लँग्वेज अॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – प्रत्येकी २५ प्रश्न, वेळ ४५ मिनिटे, प्रत्येक प्रश्नास ३ गुण असतील. उइए मध्ये एकूण ९० प्रश्न आणि २७० गुण असतील. सत्र-१ मधील चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. सत्र-२ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
हवालदार पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी (PET) – पुरुषांसाठी १,६०० मीटर अंतर १५ मिनिटांत चालणे. महिलांसाठी १ कि.मी. अंतर २० मिनिटांत चालणे.
हवालदार पदासाठी शारीरिक मापदंड चाचणी ( PST) – पुरुष – उंची – १५७.५ सें.मी. (अनुसूचित जमाती (अज) – १५२.५ सें.मी.), छाती – ७६ ते ८१ सें.मी.
महिला – उंची – १५२ सें.मी. (अज – १४९.५ सें.मी.), वजन – ४८ कि.ग्रॅ. (अज – ४६ कि.ग्रॅ.) PET व PST मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
(२) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) इन सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस ( CAPFs), नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ( NIA), सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स ( SSF) अॅण्ड रायफलमन इन आसाम रायफल्स एक्झामिनेशन २०२४.
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दि. २७ ऑगस्ट २०२४. परीक्षा डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घेतली जाईल.
पात्रता – १० वी उत्तीर्ण. पुरुष उमेदवार उंची – १७० सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.) छाती – ८०-८५ सें.मी. (अज – ७६-८१ सें.मी.) महिला – उंची – १५७ सें.मी. (अज – १५० सें.मी.)
वयोमर्यादा – १८ ते २३ वर्षे.
वेतन – पे-लेव्हल – ३, अंदाजे वेतन दरमहा रु. ४२,०००/-.
परीक्षा पद्धती – (१) संगणक आधारित परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाईप – जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, जनरल नॉलेज अॅण्ड जनरल अवेअरनेस, इलेमेंटरी मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिश/हिंदी भाषा प्रत्येकी २५ प्रश्न/२५ गुण. एकूण १०० गुण. वेळ ९० मिनिटे.
( II) १२ वी उत्तीर्ण पात्रतेच्या निकषानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षा –
(३) कंबाईंड हायर सेकंडरी (१० २) लेव्हल एक्झामिनेशन, २०२४ –
जाहीरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २ एप्रिल २०२४. परीक्षा जून-जुलै २०२४ दरम्यान घेतली जाईल.
पात्रता – १२ वी उत्तीर्ण (डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी डेटा एन्ट्री स्पीड टेस्ट) ( DEST).
वयोमर्यादा – १८-२७ वर्षे.
वेतन – काही DEO पदांसाठी पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/- व पे-लेव्हल – ५, अंदाजे वेतन रु. ५५,०००/- LDC/ JSA पदांसाठीचे पे-लेव्हल – २, अंदाजे वेतन दरमहा रु. ३६,०००/-.
परीक्षा पद्धती – संगणकावर आधारित परीक्षा ( CBT). पद क्र. १ ते ३ साठी २०२३ पासून परीक्षा हिंदी/इंग्रजी आणि मराठी, कोंकणी, गुजराती, तेलुगू, कन्नड इ. १३ रिजनल लँग्वेजेसमधून घेतल्या जात आहेत.
(४) स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ अॅण्ड ‘डी’ एक्झामिनेशन, २०२४ – जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक १६ जुलै २०२४. परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ दरम्यान घेतली जाईल.
पात्रता – १२ वी उत्तीर्ण. (स्टेनोग्राफी टेस्ट – स्टेनोग्राफर ग्रुप ‘डी’ साठी ८० श.प्र.मि.; स्टेनोग्राफर ग्रुप ‘सी’ पदांसाठी १०० श.प्र.मि.) वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.
वेतन – स्टेनोग्राफर ग्रुप ‘डी’ पदांसाठी पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-; स्टेनोग्राफर ग्रुप ‘सी’ पदांसाठी पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.
परीक्षा पद्धती – (१) संगणकावर आधारित परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप – जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग – ५० प्रश्न, जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, इंग्लिश लँग्वेज अॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – १०० गुण. प्रत्येक प्रश्नाला १ गुण, एकूण २०० गुण, वेळ २ तास.
टायर-१ –ऑब्जेक्टिव्ह टाईप – इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (प्राथमिक अंकगणित), जनरल अवेअरनेस – प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण २०० गुण, वेळ ६० मि.
टायर-२ – वर्णनात्मक स्वरूपाची लेखी परीक्षा – पेन अॅण्ड पेपर मोड – १०० गुण, वेळ १ तास.
टायर-३ – DEO पदांसाठी डेटा एन्ट्री स्पीड टेस्ट इतर पदांसाठी टायपिंग टेस्ट.
(५) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) मेल अॅण्ड फीमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन, २०२३ साठीची जाहिरात दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर झाली आहे. परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात येईल. एकूण रिक्त पदे – ७,५४७.
पात्रता – १२ वी उत्तीर्ण. पुरुष – उंची – १७० सें.मी. (अज – १६५ सें.मी.), महिला – उंची – १५७ सें.मी. (अजा/अज – १५५ सें.मी.) वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.
वेतन – पे-लेव्हल – ३, अंदाजे वेतन दरमहा रु. ४२,०००/-.
परीक्षा पद्धती – (१) संगणक आधारित लेखी परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाईप जनरल नॉलेज – करंट अफेअर्स – ५० प्रश्न, रिझनिंग – २५ प्रश्न, न्यूमरिकल अॅबिलिटी – १५ प्रश्न, कॉम्प्युटर फंडामेंटल्स – १० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला १ गुण, एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ९० मिनिटे.
(२) शारीरिक क्षमता चाचणी ( PET),
(३) शारीरिक मापदंड चाचणी.
SSC ने जाहीर केलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या कॅलेंडरमध्ये या परीक्षेचा समावेश केलेला नाही.