PWD Pune Bharti 2023: सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे PWD पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना पदांनुसार अर्ज करता येणार आहेत. भरतीबाबतच्या अधिकची माहिती PWD विभागाच्या अधिकृत बेवलाईटवर अपडेट करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे विभागात एकूण तब्बल ३१३ पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याबाबत राज्यशासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित

हेही वाचा- पोलीस कॉन्स्टेबल भरतीची तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!

सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांपासून विविध पदांची भरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. याचा कामांवर परिणाम होत असून अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कनिष्ठ अभियंता हा पुणे विभागात गेल्या महिन्यात मान्यता दिलेल्या रस्त्यांची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा- केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासांठी भरती सुरु, ९२ हजारांहून अधिक पगार मिळणार

पुणे विभागातील २४ हजार १०७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जिओ फेसिंग करण्यात येणार आहे, त्यामुळे या रस्त्यांवर कोणत्याही भागात खड्डा पडल्याची तक्रार आल्यास त्याची संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्या रस्त्यांच्या दर्जावर ऑनलाइन निरीक्षण केले जाणार आहे.

पुणे विभागात कनिष्ठ अभियंता पदाची १२४, तर स्थापत्य अभियंत्यांची १८९ पदे रिक्त असून याबाबतची माहिती राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून, लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.