गेल्या दोन लेखांमध्ये आपण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस आणि क्रिकेट या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहिलं आहे. आजच्या लेखात आपण फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल आणि बास्केटबॉल या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहणार आहोत.
संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतल्या, व्यक्तिमत्त्व चाचणीची तयारी कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखमालेमध्ये घेत आहोत. व्यक्तिमत्त्व चाचणी ही २७५ मार्कांची असते. यात मिळणाऱ्या गुणांमुळे उमेदवाराच्या गुणवता यादीतल्या स्थानावर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. मुख्य परीक्षेचा निकाल लागला की व्यक्तिमत्त्व चाचणी दोन तीन आठवड्यात सुरू होतात. व्यक्तिमत्त्व हे १५ दिवस तयारी करून घडत नसतं. व्यक्तिमत्त्वाला पैलू लहानपणापासूनच पडत असतात.
नागरी सेवा परीक्षेच्या तयारीची प्रक्रियादेखील आव्हानात्मक असल्यामुळे त्याचाही उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतोच. व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी जो डिटेल्ड ?प्लिकेशन फॉर्म भरला जातो त्यातली माहिती अतिशय विचारपूर्वक भरायची असते. या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे बरेचसे प्रश्न व्यक्तिमत्त्व चाचणीत विचारले जात असतात.
गेल्या दोन लेखांमध्ये आपण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस आणि क्रिकेट या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहिलं आहे. आजच्या लेखात आपण फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल आणि बास्केटबॉल या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहणार आहोत. भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे इतर कुठल्याही खेळाची क्रिकेटशी तुलना करणारे प्रश्न विचारले जाण्याच्या शक्यता नेहेमीच असतात.
उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराने बास्केटबॉल खेळतो असं डिटेल्ड ?प्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलं असेल तर त्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्रिकेटमध्येच सर्व रिसोर्सेस जात असणाऱ्या या देशात तुम्ही बास्केटबॉलचा देशभर प्रसार व्हावा म्हणून कोणती ५ पाऊले उचलाल? बास्केटबॉल खेळात उंचीला महत्त्व असले तरी एका कमी उंच असलेल्या भारतीय बास्केटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली, त्या खेळाडू विषयी आपणास काय माहिती आहे? बास्केटबॉल कोर्टचा आकार, खेळाडूंची संख्या आणि खेळाचे नियम या विषयी काय माहिती आहे? बास्केटबॉल खेळ जगात प्रथम कोणत्या देशात सुरू झाला? या खेळासंदर्भात देश विदेशात कोणकोणत्या स्पर्धा आयोजित केल्या जातात? बास्केटबॉल खेळात आशियातील खेळाडू पेक्षा आफ्रिका अमेरिका देशातील खेळाडूंचे वर्चस्व का आहे? बास्केटबॉल अकॅडमीत मुलांना पाठवावे यासाठी तुम्ही पालकांना कसे प्रेरित कराल?
प्रत्येक खेळामध्ये भारताचे कोणते महत्त्वाचे खेळाडू आहेत हे उमेदवाराला माहीत असले पाहिजे. त्या खेळांच्या जागतिक स्तरावर स्पर्धा होत असतील त्याची माहिती असली पाहिजे. भारतीय खेळाडू त्यात भाग घेत असतील, महत्वाच्या स्पर्धा जिंकले असतील तर त्याबद्दलही जाणीव उमेदवाराला असली पाहिजे.
व्हॉलीबॉल हा खेळ जगात कोठे सुरू झाला आणि भारतात ग्रामीण भागातही कसा लोकप्रिय झाला? व्हॉलीबॉल खेळाशी संबंधित काही क्रीडा संस्था भारतात आहेत का? त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? व्हॉलीबॉल आणि बीच व्हॉलीबॉल यात काय फरक आहे? व्हॉलीबॉल मध्ये किती खेळाडू असतात? त्यांच्या पोझिशन्स आणि रोल काय असतात? या खेळाचे नियम, कोर्टचा आकार, खेळाडूंची संख्या आणि या सांघिक खेळात जिंकण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता असते?
फुटबॉल जगभरात अतिशय लोकप्रिय खेळ आहे , भारतात तो क्रिकेट इतका लोकप्रिय का नाही? फुटबॉल,सॉकर आणि रग्बी यात काय फरक आहे? हॅन्ड ऑफ गॉड ही काय संकल्पना आहे?फुटबॉलमध्ये उंच खेळाडूंना इतर खेळाडूंपेक्षा काही फायदा असतो का? १९५६ ते १९६० या कालखंडाला भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ का म्हणतात? कोलकात्यामध्ये हा खेळ सर्वात लोकप्रिय कसा झाला आणि आजकाल कोलकाता शहरात त्याला पूर्वीसारखे महत्त्व का राहिले नाही? वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये कोणत्या देशाने विजेतेपद मिळवले आणि कोणत्या खेळाडूंना ह्यगोल्डन बॉलह्ण आणि ह्यगोल्डन बूटह्ण हे किताब मिळाले? फुटबॉलमध्ये तुमचा आवडता आंतरराष्ट्रीय संघ कोणता किंवा कुठच्या क्लब ला तुमचा पाठिंबा आहे? तुमचा सर्वात आवडता फुटबॉल खेळाडू कोण? किंग पेलेचे फुटबॉल मधले योगदान काय आहे? भारतात फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर काय प्रयत्न झाले आहेत?फिफा या संस्थेबद्दल काय माहिती आहे ? फिफा कप केव्हा झाला आणि त्यात कुठची टीम जिंकली? फुटबॉल मैदानाचा आकार, कीती खेळाडू असतात आणि त्यांची मैदानावर पोझिशन या विषयी माहिती द्या? बायचुंग भूतीया आणि सुनील छेत्री या दोन भारतीय फुटबॉलपटू विषयी आपणास काय माहिती आहे? भारतात फुटबॉलचे कोणकोणते क्लब आहेत?
हॅण्डबॉल हा खेळ इनडोअर आहे की आउटडोअर आहे? यात प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू असतात? बॉल वापरून खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांपेक्षा हॅण्डबॉलचं वेगळेपण काय आहे? हॅण्डबॉल या खेळाबद्दल तुम्हाला आवडणारी गोष्ट कोणती?
इतर काही क्रीडा प्रकारांबद्दल विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नांबद्दल माहिती पुढच्या काही लेखांमधून आपण घेऊ.
mmbips@gmail. com, supsdk@gmail. com