Railway Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड फर्स्ट सिग्नलसाठी आणि टेक्निशियन ग्रेड थर्डच्या ९००० हून अधिक रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार आज ८ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी ९ मार्चपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.rrbapply.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

RRB टेक्निशियनभरती २०२४ मध्ये, टेक्निशियन ग्रेड फर्स्ट सिग्नलसाठी १०९२ आणि टेक्निशियन ग्रेड थर्डसाठी ८०५२ रिक्त जागा आहेत. रेल्वेच्या या बंपर भरतीसाठी अर्जदार १०वी आणि ITI उत्तीर्ण असावेत.

RRB टेक्निशियन भरती २०२४

RRB Technician Bharti 2024 : वयोमर्यादा

टेक्नीशियन ग्रेड फर्स्ट सिग्नल- १८ से ३६वय
टेक्नीशियन ग्रेड थर्ड- १८ से ३३ वय

SC/ST उमेदवाराला ५ वर्षे, OBC (नॉन-क्रिमी लेयर)३ वर्षे, माजी सैनिकांना ३ ते ८ वर्षे आणि PWD उमेदवारांना ८ ते १ वर्षे सूट मिळेल.

हेही वाचा – UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ १४७ पदांसाठी होणार भरती; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या सविस्तर

RRB Technician Bharti 2024 : अर्ज शुल्क

SC/ST, माजी सैनिक, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांसाठी RRB टेक्निशिअन भरती २०२४ साठी अर्ज शुल्क २०पये आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी ५०० रुपये आहे.

अर्ज करण्याची लिंक – https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

आरआरबी टेक्नीशियन भरती नोटिफिकेशन २०२४ – https://www.rrbapply.gov.in/assets/documents/cen2.pdf

हेही वाचा – IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६६० पदांसाठी भरती; अशा प्रकारे करता येणार अर्ज

रेल्वे टेक्निशियनचे काम

रेल्वे टेक्निशियनचे काम लोकोमोटिव्ह, वॅगन्स, कॅरेज आणि इतर उपकरणे जसे की रेल्वे रोलिंग स्टॉक इत्यादींची देखभाल, दुरुस्ती करणे हे आहे. तसेच, सुरक्षा मानके आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे रोलिंग स्टॉकची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे.